प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देतील असे ‘आयर्न मॅन’ सिटी नाशिकचे सुपुत्र

आयर्न मॅन

आयर्न मॅन” हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवायचा म्हणजे जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द, आणि जीवतोड मेहेनत ह्यांचा संगम.

‘मग कोण आहे हा नवा ‘भारतीय’…., ‘महाराष्ट्रीय’…., ‘नाशिकचा’…., आणि ‘मराठी’ “आयर्न मॅन“????.’

मित्रांनो, कोणत्याही खेळात नाव मिळवायचं तर खेळाची सुरुवात आपल्या गल्लीतून करायला लागते, खरंय कि नाही?

मग शाळा, कॉलेज, तालुका, जिल्हा, राज्य, असं करत आंतर राष्ट्रीय पातळी पर्यंत पोहोचायला लागतं, आणि नंतर तिथं आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायला लागतं.

तेव्हा आपलं नाव जगभर प्रसिद्ध होतं. मग हे असं आपलं नाव जगभर व्हावं असं कोणाला वाटत नाही? सगळ्यांनाच वाटतं की. पण सगळ्यांचंच नाव आंतर राष्ट्रीय टी. व्ही. चॅनल, किंवा वर्तमान पत्रात झळकत नाही.

तुम्ही म्हणाल की नशीब लागतं असं जगभर नाव झळकायला. ज्याच्या नशिबात असतं त्याचं नाव झळकतं. पण काही असे लोक पण आपण बघतो की त्यांच्या घरात रोजच्या दोन वेळच्या जेवणाचे पण प्रश्न असतात अशा घरातल्या तरुणांनी पण जगभर प्रसिद्धी मिळवलीय.

ऑलिम्पिक मध्ये यशस्वी होणारे सगळेच काही श्रीमंत घरातले नसतात. ज्यांच्यात जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द, आणि जीवापाड मेहेनत करायची तयारी असते तेच लोक असं नाव कमावतात. मग ते श्रीमंत घरातले असतील, मध्यम वर्गीय असतील किंवा अगदी गरीब घरातले.

भारतीय सेनेमध्ये आज जे अगदी वरच्या पोस्ट वर आहेत ते सुद्धा कठोर मेहेनत करून, सैन्यात भरती व्हायचंच ह्या जिद्दीने आलेले आहेत.

म्हणजे जिद्द पाहिजेच शिवाय इच्छाशक्ती पाहिजे तरच इतकी मेहेनत करायचं बळ आपोआप तयार होतं हे आपल्याला मान्यच करायला पाहिजे, मग तिथं वय सुद्धा आडवं येत नाही.

आता “आयर्न मॅन” चा हा किताब मिळवायचा असेल तर ह्याच सगळ्या दिव्व्यातून जावं लागतं हे कदाचित काही लोकांना माहिती नसेल.

पण नाशिक सारख्या शहरातला म्हणजे महाराष्ट्रातला, एखादा सर्व सामान्य घरातला मराठी तरुण ऑस्ट्रेलियात जाऊन जर हा पुरस्कार मिळवत असेल तर तुम्हा आम्हाला सुद्धा हा पुरस्कार मिळवता यायला काय हरकत आहे? म्हणजे प्रयत्न करायला काय हरकत आहे? अगदी लगेच नाही पण पुढच्या वेळी तर हमखास मिळेल.

नाशिकच्या “किशोर घुमरे” ह्या ३४ वर्ष वयाच्या तरुणानं “आयर्न मॅन” २०१९. ही स्पर्धा अतिशय कमी वेळात पूर्ण केली.

आपल्या शारिरीक क्षमतेवर विश्वास ठेवून, भरपूर मेहेनत घेऊन पुढे जात राहणं हेच किशोरच्या यशाचं खरं गमक.

ऑस्ट्रेलियात घेतल्या गेलेल्या ह्या स्पर्धेसाठी त्याने स्पर्धेच्या आधी ६ महिने अथक परिश्रम करून अनेक देशातल्या स्पर्धकांमध्ये आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं.

“आयर्न मॅन” ही स्पर्धा नक्की असते तरी कशी? ही उत्सुकता तुम्हाला ही असणार, त्यात भाग घेणाऱ्या स्पर्धकाला नेमकं काय करायचं असतं हे जाणून घेण्यासाठीच हा लेख तुमच्या सर्वांच्या साठी “मनाचेTalks” ने सादर केलाय. ज्यामुळे महाराष्ट्रातल्या, किंवा भारतातल्या इतर अनेक लायक स्पर्धकांना ह्या स्पर्धेची माहिती मिळावी आणि त्यांना ह्या स्पर्धेत जाण्याची उत्सुकता निर्माण व्हावी हा हेतू.

ह्या तीनही गोष्टी करताना दमछाक होते कारण मध्ये थांबायचं नाही. हा प्रवास खडतर असतो, पण तेवढी क्षमता तुमची असेल तर ही स्पर्धा तुम्हाला अवघड वाटणार नाही.

समुद्रात पोहणे, सायकल चालवणे, आणि धावणे ह्या तीनही गोष्टींचा भरपूर सराव तुम्हाला करायचा आहे. ज्यांना ह्या तीनही गोष्टींची सवय असेल त्यांना कमी मेहेनत घ्यावी लागेल पण ज्यांना कशाचीही सवय नसेल त्यांना जास्त तयारी करावी लागेल.

पण अवघड असं काहीं नाही कारण वयाच्या ५० नंतर सुद्धा काही स्पर्धकांनी ही स्पर्धा जिंकली आहे.

आपली शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल. कारण शरीर तयार असले तरी मन तयार असले पाहिजे.

मन खचून गेले तर स्पर्धा जिंकणे अवघड होऊन बसेल. समुद्रात पोहताना लाटांशी संघर्ष करायचाय, तर सायकल चालवताना तुफानी वाऱ्याशी संघर्ष करावा लागतो.

पळताना शरीर थकलेलं असतं, म्हणून मानसिक क्षमता सुद्धा तितकीच महत्वाची असेल. मन खंबीर असेल तर स्पर्धा जिंकायला अवघड नाही.

शरीराची ताकत वाढवताना तुमचा आहार चांगला असायला पाहिजे. जेवणात हिरव्या भाज्या, फळं, अंडी असा सकस आहार ठेवायला पाहिजे.

बाकी खुराक नसेल तरी हिरव्या भाज्या आणि फळं तुमची शरीराची ताकत वाढवू शकतात. आहार भरपूर घेण्या पेक्षा आहार पौष्टिक असायला पाहिजे. बाकी रोज घरात जेवण असते ते चालते. म्हणजे श्रीमंती थाटाचं जेवण असायला पाहिजे असं काही नाही.

‘किशोर घुमरे’ यांनी ही १७ तासांची स्पर्धा फक्त १५ तास – ११ मिनिटं – २२ सेकंद इतक्या कमी वेळात पूर्ण केली तर किशोर घुमरे यांच्या बरोबर महाराष्ट्रातलेच आणि नाशिकमधलेच आणखी ३ स्पर्धक ह्या स्पर्धेत होते वय वर्ष ५६ असलेले उद्योजक प्रशांत डबरी ह्यांनी ही स्पर्धा १६तास-२०मिनिटं-३३सेकंदात पूर्ण केली.

त्यानंतर आणखी एक उद्योजक महेंद्र छोरिया वय ४३ वर्ष ह्यांनी ही स्पर्धा १६ तास-२० मिनिटं-४१ सेकंदात पूर्ण केली, आणि तिसरे एक बाल रोग तज्ञ डॉ अरुण गचाले वय ४० वर्ष, अशा तीन आणखी जास्त वय असलेल्या लोकांनी ही स्पर्धा जिंकली आहे. म्हणजे फक्त नाशिकच्याच चार स्पर्धकांनी ही स्पर्धा जिंकली आहे.

म्हणजे जर जबर इच्छाशक्ती असेल तर वय सुद्धा ह्या स्पर्धेला साथ देतं हे ह्या बाकीच्या तिघांनी शक्य करून दाखवलं.

अतिशय नावाजलेला हा पुरस्कार एकाच स्पर्धेत काही मिनिटं आणि सेकंदाच्या फरकाने चार नाशिककर हा किताब मिळवू शकतात, म्हणून नाशिक ही आता ‘आयर्न मॅन सिटी’ म्हणून ओळखली जाऊ शकते.

कारण ह्या पूर्वी सुद्धा नाशिक मधल्या ४ स्पर्धकांनी हा किताब मिळवलेला आहे. म्हणजे एकूण आठ “आयर्न मॅन” एकट्या नाशिक शहरात आहेत.

बाकी अनेक शहरातून अनेक आयर्न मॅन तयार होतायत. आणि ह्या स्पर्धेची रंगत आता खूप वाढत चालली आहे. काही नावाजलेले स्पर्धक तर प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन प्रत्येक वेळी हा किताब मिळवतात त्यांच्या फिटनेस ची कमाल आहे, त्याची दाद द्यावी लागेल.

खरंच ते आयर्न मॅन आहेत यात शंकाच नाही. त्यांच्या फिटनेस ला सलाम, आणि त्यांच्या पुढच्या दमदार वाटचालीला “मनाचेTalks” च्या मनापासून शुभेच्छा.

आणि हो…. हा लेख वाचून किती जणांनी ‘आयर्न मॅन’ होण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा घेतली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!