आयुष्यातलं कोणतंही ध्येय गाठण्यासाठी ह्या १० महत्वाच्या गोष्टींचा आधार घ्या

तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात, तुमच्या यशासाठी, ध्येय गाठण्यासाठी तुमच्यात काही बदल करून घाऊक यश मिळवायचंय???

मग ह्या दहा गोष्टी अगदी मनापासून करायला सुरुवात करा, निश्चितच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जबाबदारीची ताकत कळेल आणि तुम्ही यशाच्या शिखराकडे तुमची वाटचाल करू शकाल.

आपली बुद्धिमत्ता, आपलं धैर्य, जिद्द, चिकाटी, ह्या गोष्टी जीवनात प्रगती साठी मौल्यवान गोष्टी ठरल्या आहेत.

पण जर तुलना केली तर तुमच्या आयुष्यात “यश” मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे ‘आपली स्वतःची जबाबदारीची जाणीव’ ही एक नंबरवर असायला पाहिजे.

आपली स्वतःची जबाबदारी म्हणजे ‘पर्सनल अकाऊंटॅबिलिटी’.

काही वर्षांपूर्वी मी पण खूप कठीण परिस्थिती अनुभवली. या नशिबाच्या फेऱ्यातून आता यांची सुटका नाही असाच लोकांचा समज होता.

पण आपलं ध्येय गाठून कुठलीही प्रतिकूल परिस्थिती आटोक्यात आणणं आणि यशस्वी होणं आपल्याला काही छोट्या छोट्या प्रयत्नातून साध्य करता येऊ शकतं, हे मला माझ्या अनुभवातून जाणवलं.

मित्रांनो तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात, तुमच्या यशासाठी, ध्येय गाठण्यासाठी तुमच्यात काही बदल करून घाऊक यश मिळवायचंय???

मग ह्या दहा गोष्टी अगदी मनापासून करायला सुरुवात करा, निश्चितच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जबाबदारीची ताकत कळेल आणि तुम्ही यशाच्या शिखराकडे तुमची वाटचाल करू शकाल.

१: आपल्या स्वतःच्या जबाबदारीची व्याख्या आपल्याला पाहिजे तशी पुन्हा तयार करायची

‘जबाबदारी’ हा शब्द ऐकला की तुमचे हातपाय थरथर कापायला लागतात???? तर ही तुमच्यातली नकारात्मकता आहे.

म्हणजे कसं? तर आपल्याला न आवडणारी गोष्ट जर कोणी आपल्यावर सोपवली तर ती जबाबदारी आपल्याला नको वाटते.

पण जर आपल्यावर सोपवलेली जबाबदारी ही आपल्याला मिळालेली एक गिफ्ट आहे असं समजा आणि त्यात गुंतून घ्या.

तुमच्यात सकारात्मकता येईल. ते जमणार नसेल तर स्वतः आपल्याला आवडेल अशी जबाबदारी निवडून कामाला सुरुवात करा.

आता तुम्हाला तो शब्द ऐकल्यावर हातपाय थरथर कापायचा प्रश्नच उरणार नाही. म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे आपली मानसिकता तयार होईल आणि पूर्ण जबाबदारी तुम्ही सहज पेलू शकाल.

म्हणजे त्या कामात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता, आणि त्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही जबाबदार आहात. म्हणजेच ती तुमची स्वतःची जबाबदारी ठरेल.

२: तुमचं संपूर्ण आयुष्यच ह्या कामावर अवलंबून आहे.

तुम्ही तुमची जबाबदारी स्वीकारलीत की आपोआप तुमची सतत काम करण्याची मानसिकता तयार होईल. म्हणजे धडपड सुरू होईल.

ते करत असताना तुम्ही जर सतत डोक्यात ठेवलंत की “ह्याच कामावर माझं आयुष्य अवलंबून आहे” तर काय होईल?

ह्या पूर्वी जर तुम्हाला कधी असं वाटलं असेल की हे काम आपल्याला जमणार नाही, किंवा आपल्या ताकदी बाहेरचं आहे.

तर तेच काम तुम्हाला आता सहज जमणार आहे, कारण तुमचं आयुष्य त्या कामावर अवलंबून आहे. अगदी जन्म – मरणाचा प्रश्न नाही पण तुमच्या आत्मविश्वासाने समोर येणारे सगळे प्रश्न तुम्ही अगदी सहज सोडवू शकाल.

कारण तुम्ही तुमचं आयुष्य म्हणजे तुमचं सर्वस्व इथं लावलंय. त्यामुळे तुमच्या कामात तुम्हाला सगळे सकारात्मक रिझल्ट मिळायला लागतील.

आणि तुमच्या आयुष्यातली ‘रिस्क’ कमी कमी होत जाईल, आणि जास्तीत जास्त आनंदाचे क्षण यायला लागतील. तुम्ही तुमच्या कामावर, यशावर, खुश व्हाल.

३: तुमच्या वाटचालीत एखादे वेळी परिस्थिती जर तुमच्या हाताबाहेर गेली तरी प्रतिकूल परिस्थितीला तुमच्यावर स्वार होऊ देऊ नका…

परिस्थिती कोणत्या कारणाने बदलेल हे आजपर्यंत कोणीही ठाम सांगू शकलेलं नाही. कधी कधी परिस्थिती आपल्या कंट्रोल च्या बाहेर सुद्धा जाऊ शकते.

अशावेळी घाबरून, हताश होऊन जाऊ नका, त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी धडपड करत रहा. हातावर हात ठेवून कोणी मदत करेल आणि तुम्हाला त्यातुन बाहेर काढेल म्हणून बसून राहू नका.

सतत प्रतिकूल परिस्थिती विरोधात प्रयत्न करा. अशी परिस्थिती फार काळ नसते. त्यातून मार्ग निघतो आणि तुम्ही पुन्हा त्याच ताकदीने स्वतःला उभं करू शकता हे कायम लक्षात ठेवा.

४: तुमच्याकडे तुम्हाला करायच्या गोष्टींपेक्षा न करायच्या गोष्टीच जास्त असतात…

थोडक्यात सांगायचं तर, तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे म्हणजे ही करायची गोष्ट. पण तुम्हाला त्या साठी व्यायाम करायचा नाही किंवा तुमचे आवडते पदार्थ खाणे सुद्धा बंद करायचे नाहीत म्हणजे ह्या न करायच्या गोष्टी.

तुम्हाला नोकरीत प्रमोशन पाहिजे आहे पण त्यासाठी जास्त वेळ बसून, जास्त काम करायचं नाही.

आता तुम्हीच पहा:- तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे त्यासाठी तुम्ही तुमचे आवडते पदार्थ खाणे बंद केले आणि रोज नियमित व्यायाम केलात तर काय होईल?

तुमचं वजन हळू हळू कमी होईल. असंच तुमच्या यशाचं आहे . यश मिळवायचं आहे तर तुमचे कष्ट, तुमची ताकद, तुमचं सहनशक्ती, आणखी काही गोष्टी ह्या खर्च कराव्या लागतील. हे सर्वमान्य आहे.

बरोबर की नाही? यश तुमच्या हातात कधी येतं? ज्यावेळी तुम्ही ध्येयापर्यंत पोचायला किती कष्ट करावे लागतील ह्या भीती पेक्षा, बेधडक त्याच्या शिखराकडे चालायला सुरुवात कराल त्यावेळी तुम्ही असंख्य अडथळे पार करत ते गाठाल.

आणि केलेल्या कष्टाची तुम्हाला जाणीव सुद्धा होणार नाही.

५: कोणत्याही गोष्टी तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखराकडे जाताना खाली खेचणार नाहीत ह्याची काळजी घ्या.

तुमची यशाकडे जाणारी वाट ही उंच जाणारी आहे. त्यात मधे मधे छोटी छोटी संकटं, अचानक समोर येणारे प्रश्न येत रहातील.

तुम्हाला तुमचं ध्येय गाठायचंय, असल्या छोट्या संकटांना, प्रश्नांना घाबरू नका. त्यावर मात करून पुढे जा. यशाची चमक ही खूप वेगळी आहे…..

६: आपले प्रत्येक छोटे छोटे यश हे मोठे यश मिळवण्यासाठी पुढे नेणारे सुखद धक्के आहेत.

चांद्रयान चंद्राकडे जाताना जसे एक एक टप्पा पार करण्यासाठी त्याला स्फोट घडवून धक्के दिले जातात तेंव्हा ते चंद्रा पर्यंत यशस्वी वाटचाल करते. आपलं यश सुद्धा छोट्या छोट्या यशाच्या सुखद धक्क्यानेच गाठलं जातं.

एक एक यश मिळवत, आत्मविश्वास वाढत जातो आणि आपण यशस्वी होतो.

७: आपण करत असलेल्या कामाचा आढावा घ्या…

आपण आपली कामं करत करत पुढे जातो आहोत हे आपल्याला कळत असतं, पण ते काम आपण योग्य पद्धतीने करतो आहोत, का त्यात काही बारीक-सारीक चुका आहेत हे आपले मेंटॉर, आपले सहकारी, आपले मित्र ह्यांना सुद्धा कळत असतात.

वेळोवेळी आपल्या कामाचा आढावा त्यांच्याकडून सुद्धा घेतला तर आपली प्रगती कळत जाते.

८: तुम्हालाच तुम्ही प्रश्न विचारा- तुम्ही मालक आहात का भाडेकरू?

कोणतीही गोष्ट आपण जेव्हा भाड्याने घेतो त्या गोष्टींची फार काळजी घेत नाही. कारण त्या गोष्टी आपण तात्पुरत्या वापरासाठी भाड्याने घेतो. तुम्ही कधी भाड्याची कार धुता का? कधीच नाही.

कार किंवा घर किंवा एखादे काम, कॉन्ट्रॅक्ट, स्वतः चे असेल तर आपण किती काळजी घेतो त्या सगळ्याच गोष्टींची. आपलं यश हे आपल्या मालकीचं असायला पाहिजे.

९: ध्येय गाठायचं तर भरपूर कष्ट करायची तयारी ठेवा लवकरच स्वर्गसुख देणारं यश तुमच्यासमोर उभं राहील.

सोन्याची खाण खोदायला सुरुवात करताना आधी खूप मोठे मातीचे थर हटवायला लागतात, नंतर खडक दिसायला लागतो, तो खोदून बरेच आत पर्यंत शोधायला लागते तेंव्हा अगदी तोळाभर सोनं हाती लागतं.

आणि मग पुढे पुढे थोडं थोडं सोनं सापडत जातं. आधी भरपूर कष्टाची तयारी ठेवा, नंतर यशाची खाण हाती लागणारच आहे.

१०: हे सगळं घडवून आणा….

ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून तुम्ही हे सगळं घडवून आणा. कोणतंही मोठं ध्येय गाठणं हे कष्टाचं आहे पण ते मिळवल्या नंतर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जबाबदारीची (Personal Accountability) खरी ताकद कळेल.

‘यश’ हे कुठून बाहेरून आपल्याकडे येत नाही तर ते आपल्या जवळच असते. ‘यश’ म्हणजे कोणतीही जादू किंवा चेटूक नाही तर ती तुमच्या स्वतःच्या जबाबदारीची कमाल आहे.

मग आता वाट कोणाची पाहताय? घ्या जबाबदारी आणि सुरू करा तुमच्या ध्येयाची वाटचाल. तुमच्या यशस्वी वाटचाली साठी “मनाचेTalk” कडून मनापासून शुभेच्छा.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “आयुष्यातलं कोणतंही ध्येय गाठण्यासाठी ह्या १० महत्वाच्या गोष्टींचा आधार घ्या”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय