परीक्षांच्या आधीच स्मरणशक्तीला डबल बुस्टरचा डोस कसा द्याल..!!

दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रकं जाहीर झाले तसे बऱ्याच वाचकांचे मेसेजेस यायला लागले कि परीक्षेचा अभ्यास मुलांना लक्षात राहील यासाठी काहीतरी लेख पाठवा. तर परीक्षेच्या वेळी हसत खेळत अभ्यास करून तयार होण्यासाठी काही टिप्स या लेखात बघा.
‘परीक्षा’ हा एक असा बागुलबुवा आहे ज्याला विद्यार्थी तर घाबरतातच पण त्यांचे पालक जास्ती धस्तावलेले असतात. कारण परीक्षेत फक्त पास होणं ह्याला यश मानले जात नाही हल्ली.
हवे तितके मार्क्स पोत्याने मिळाले तरच परिक्षेत यशस्वी आहे असे मानले जाते.. अन्यथा नापास आणि कमी मार्क्स दोन्हीला एकाच तराजूत तोलले जाते.. हो ना..?
तुम्ही देखील ह्या बागुलबुवाच्या जाळ्यात फसला आहात का..? उत्तर होच असणार ह्याची आम्हाला खात्री आहे. कारण अभ्यास केला तरी विद्यार्थ्यांना परिक्षे आधी खूप टेन्शन असतं.
वाचलेले लक्षात राहील ना? उत्तरं सगळी आठवतील ना..?? उत्तर लिहिताना अर्ध्यातच अडखळलो तर काय होईल..?
ह्या भीतीपोटी आधीच झोपा न लागणारे विद्यार्थी आपण पाहतोच. नव्हे आयुष्याच्या एका टप्प्यावर आपणही ह्या व्यथेतून गेलेलोच आहोत. स्मरणशक्तीचा बाऊ आपणही केला आहे.
असे काय असेल ज्याने आपण सगळेच ह्या विसारभोळे पणातून बाहेर पडू शकू? आहे का कोणाकडे हॅरी पॉटर सारखा मॅजिक वॉंन्ड जो फिरवल्यावर आमचा मेंदू सगळ्या आघाड्यांवर चमकेल?
दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रकं जाहीर झाले तसे बऱ्याच वाचकांचे मेसेजेस यायला लागले कि परीक्षेचा अभ्यास मुलांना लक्षात राहील यासाठी काहीतरी लेख पाठवा.
तर मित्रांनो, आज मनाचेTalks ने तुमच्यासाठी खास या टिप्स आणल्या आहेत.
‘टिप्स..’ स्मरणशक्तीला बुस्टर चा डबल डोस देण्यासाठी..!! परीक्षेला मुलांना हसत खेळत अभ्यासाला सामोरं जाता येण्यासाठी!!
“तो पॅसेंजर्स, क्रिपया अपनी कुर्सी कि पेटी बांध ले😍🛫” आणि ऐकन-एक सूचनेचा अवलंब करून पहा.
आणि हो या गोष्टी आपल्या मुलांच्या परीक्षेसाठी वापराल… तेव्हा परीक्षेचा आणि अभ्यासाचा बाऊ न करता सहज सहज हा त्यांच्या सवयीचा भाग बनेल असे पहा….
१. परीक्षेच्या काही काळ आधी शांत निवांत वॉक घ्या: विविध व्यायाम हे आपल्या शरीयष्टीला सुदृढ करतातच पण आपल्या मेंदूला तरतरी आणायचे देखील काम देखील करतातच.
साधासा १५ ते २० मिनिटांचा चालण्याचा व्यायाम सुद्धा तुमचा परीक्षेचा परफॉर्मन्स उंचावू शकतात. मन एकाग्र करा आणि शांत पणे फेऱ्या मारा.. बघा तर इफेक्ट..!!
२. वाचनाची पद्धत बदला: अरेच्च्या…! वाचनाची पद्धत कशी काय बदलायची बुवा..? सोप्प आहे.
आपण मनातल्या मनात वाचन करतो. त्या ऐवजी एकेक शब्द मोठ्याने वाचा. सगळा अभ्यास मोठमोठ्याने वाचन करून संपवा.
मोठ्याने वाचणे हे ५०% नी अधिक स्मरणशक्ती वाढवण्यात उपयुक्त ठरते हे अनेकांनी आपल्या अनुभवातून सांगितले आहे.
४. शिका आणि शिकवा: हो जमवा आपली मित्रमंडळी आणि जे तुम्ही समजून घेऊन पाठ केलंय ते आपल्या मित्राला व्यवस्थित समजावून सांगा. म्हणजे तुमची उजळणी तर होतेच पण समोरच्याला समजावताना नवीन नवीन पद्धती अवलंबल्याने आपल्यालाच सगळे पक्के पाठ होऊन जाते.. अगदी झोपेतून उठवले तरी कोणीही सांगेल इतके..!!
५. सचित्र अध्ययन करा: चित्रकला चांगली असो वा नसो.. काही विषयांमध्ये आकृत्या काढल्याशिवाय त्या विषयाचे अध्ययन पूर्ण होत नसते.
जसे ‘विज्ञान’ ह्या विषयात एखादे उत्तर पाठ करायचे झाल्यास त्याची आकृती (डायग्राम) लक्षात राहिला तरच उत्तर हवं तसं आपल्या शब्दात लिहू शकतो.
डायग्राम्स शी उत्तर जोडून लक्षात ठेवायला एकदम भारी मदत होते. मॅनेजमेंट, इतिहास भूगोल, कॉम्पुटर अशा बऱ्याच विषयांमध्ये ब्लॉक डायग्राम्स, फ्लोचार्ट हे लागतातच आणि एकदा ते लक्षात राहीले की आपली मेमरी एक स्वतःचा माईंड मॅप तयार करते..
हे सगळे उत्तराशी आपल्या आपण जोडते आणि आपल्याला परीक्षेत सगळं ओघवत्या भाषेत लिहिणे सोप्पे होते.
६. सोशल मीडिया पासून काही दिवस लांब रहा: छोट्या मित्रांनो हा सोशल मीडिया म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. जरा वेळ पाहावं म्हटलं तरी २-३ तास त्यातच मोडतात.
शेवटी आपल्या अभ्यासाचा वेळच संपून जातो. स्मरण शक्तीवर ह्याचा नक्कीच परिणाम होतो. त्यामुळे अभ्यासाचे मटेरियल शोधण्यापूरते इंटरनेट वापरावे बाकी त्याला रामराम ठोका.
नही तो ये भस्मासुर आपकी मेमरी को खा जायेगा..!! मात्र अभ्यासाचे काही व्हिडीओ, डॉक्युमेंटरी नक्की पहा.
ऑडिओ विझ्युअल्स हे आपल्या मेमरी साठी अत्यंत उपयुक्त असतात. सध्या ‘बैजूज’ सारखे ऍप्स, गूगल सर्च हे तर वरदानच आहेत. त्याचा वापर करण्याची सवय मुलांमध्ये आवर्जून लावावी.
स्वतः पुढाकार घेऊन मुलं जेव्हा विषय समजून घेतात तेव्हा अभ्यास हि आपली जवाबदारी आहे हे त्यांना समजते.
तो विषय समजणे आणि लक्षात राहणे ह्यासाठी मर्यादित प्रमाणात इंटरनेट वापरल्यास स्मरणशक्ती वाढते हे नक्की.
७. अभ्यास करताना ब्रेक तर हवाच: सतत तासंतास अभ्यास करत राहिले तर बुद्धीवर ताण येतो.. शरीराला थकवा जाणवतो.
म्हणून मेमरी सेव्ह करायला एक ब्रेक तो बनता है दोस्तो.. घरातल्या पेट अनिमल शी खेळणे, एखादा गेम खेळणे, , नृत्य करणे, एखादी कला जोपासणे, घरच्यांशी संवाद साधणे, कॉफी चहा घेणे, एक फेरफटका मारून येणे हे मधल्या वेळेत केल्यास पुन्हा तरतरी येते आणि नवीन अध्ययनासाठी आपण ताजे तवाने होतो.
८. संगीत हे स्मरणशक्तीला मिळालेले वरदान आहे: सॉफ्ट म्युझिक, संगीतातील राग, इन्स्ट्रुमेंटल संगीत तर कधी आवडीची गाणी ऐकणे म्हणजे मेंदूला रिफ्रेश करणे. बहुतांश लोकांचा असा अनुभव आहे की गाणी ऐकत केलेला अभ्यास लक्षात राहतोच.
९. अभ्यासाची जागा उदासीन असू नये: एकच एक टेबल, तो स्टडी लॅम्प आणि समोरचा तो चार्ट हे किती बोरिंग आहे नाही का..?
पण जर घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनी मध्ये बसून अभ्यास करून पाहा. किंवा घर बाहेर अंगणात, झाडाखाली, एखाद्या शांत बागेत जाऊन अभ्यास करता येईल.
मन प्रसन्न असेल तर बुद्धी व्यवस्थित काम करते. चिडचिड, ताण, गोंगाट ह्या मुळे स्मरणशक्ती विचलित होते आणि केलेला अभ्यास कधीच लक्षात राहत नाही. आणि हो वाचन लायब्ररी सुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
१०. मेडिटेशन करून पहा: शांत बसून ध्यान लावून पहा. पहिल्यावेळेस फारसा परिणाम जाणवणार नाही पण हळू हळू मन एकाग्र करायची सवय लावली तर मेडीटेशन हा स्मरशक्तीला वाढवणारा उत्तम उपाय आहे. ह्याची पद्धत मात्र आपल्याला स्वतःच डेव्हलप करावी लागते.
११. परिक्षेच्या आदल्या दिवशी जागरण नकोच: परीक्षेच्या आधी जागरण करायची वेळ तेव्हाच येते जेव्हा आपण रोजच्या रोज अध्ययन करत नाही. रोजच्या रोज काही काळ अभ्यास केला, सतत प्रॅक्टिस केली तर परीक्षेच्या वेळी आपल्याला जी सगळं विसरून जाण्याची भीती असते ती राहणारच नाही मुळी..
खरे तर आदल्या दिवशी जागून आपण स्मरणशक्तीचा नाश करत असतो. त्यामुळे हवं तर पॉवर नॅप ची सवय लावा पण जगरणं नकोच.
ह्यातील काही गोष्टी जरी आपल्याला परिक्षेआधी करता आल्या तर मेमरी बुस्ट तो पक्का है..!! आपण नेमकं विरुद्ध काहीतरी करतो.
एकटे उदासीन खोलीत अभ्यास करतो ते ही आदल्यादिवशी, त्या विषयाचा भयंकर ताण घेतो, आधीच उद्या काय होणार ह्याची चिंता करत बसतो.
स्मरणशक्तीला खुराक द्यायच्या ऐवजी त्यातली सगळीच एनर्जी घालवून टाकतो. त्यामुळे दोस्तांनो परीक्षेच्या ह्या बागुलबुवाला भिऊ नका.
त्याला वरील स्मरणशक्तीच्या भन्नाट मंत्रांनी पळवून लावा. परीक्षा देताना प्रसन्न मनाने जा. बघा यश तुमचेच असेल…!!
तुम्हाला हवे तसे यश मिळवण्यासाठी मनाचेTalks कडून खूप खूप शुभेच्छा..
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा