मॅच्युअर माणसामध्ये असलेले हे सहा गुण त्याला इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरवतात

माणसाच्या यशस्वी असण्यामागचं महत्त्वाचं कारण, ‘त्याचं मॅच्युअर असणं किंवा इमॅच्युअर असणं हे असतं’ तर असा मॅच्युअर आणि इमॅच्युअर माणूस कसा ओळखावा? यशस्वी होण्याच्या मार्गातली पहिली पायरी म्हणून मॅच्युअर होण्यासाठी स्वतःमध्ये कोणते गुण असावेत याबद्दल आजच्या लेखात बोलू.

चार लोकांमध्ये वावरताना कधीतरी तुम्ही हे वाक्य नक्कीच ऐकलं असणार….”नुसतं वय वाढलंय, पण डोक्याने अजून काही वाढला नाही बघा.”

म्हणजेच वय वाढलं की तो माणूस विचाराने परिपक्व होईलच ह्याची काही गॅरंटी नसते.

विचाराने परिपक्व होणं म्हणजे नक्की काय?

हे बऱ्याच लोकांना कळत नाही असं म्हणावं लागेल. तुम्ही प्रौढ असाल, तर तुम्ही विचारांनी परिपक्व झाला आहात काय?

त्या साठीच हा लेख आहे. ह्या लेखातून ते आपल्याला जाणून घ्यायचंय.

यातून आपल्याला स्वतःला मॅच्युअर्ड होण्यासाठी आणि दुसऱ्यांना एनलाईझ करण्यासाठी मदत होईल.

आपलं वय एकेका सेकंदाला वाढतच असतं, ते वाढणारं वय थांबवायचं कसं ह्यात काही अजून तरी संशोधन झालेलं नाही.

जन्म झाला की वयाचं मिटर चालू होतं. दर वर्षी ठराविक तारखेला आपले वाढदिवस साजरे होतात. ते एक एक वर्ष मोजलं जातं. म्हणजेच आपलं वय वाढत जातं.

शाळा कॉलेज पासून ज्ञान मिळायला सुरुवात होते. नोकरी, व्यवसाय करताना सुद्धा सगळीकडून आपल्या ज्ञानात भर पडत जाते.

नंतर लग्न, दोनाचे चार हात, चार चे सहा, आठ होतात. ज्ञानात भर पडतच असते.

ह्यातलं कोणतं ज्ञान मिळवायचं, आणि कोणतं सोडून द्यायचं हे तुम्ही तुमच्या मनाने ठरवता.

कोणी दुसऱ्याचा सल्ला घेऊन ठरवतात, तर कोणी कसं…. पद्धत आणि मार्ग प्रत्येकाचा वेगळा.

ह्या सगळ्या काळात तुमचं वय हे वाढतच असतं. ते वाढत असताना ज्ञान सुद्धा तसंच वाढायला हवं.

खरं की नाही?… तुमचं वय वाढत असतं. तुम्ही प्रौढ होत जाता.

आपल्याकडे असं म्हटलं जातं की माणूस प्रौढ झाला की त्याच्या विचारांमध्ये परिपक्वता (मॅच्युरिटी) आलेली असते.

त्याला आलेल्या अनुभवातून तो एक समजदार माणूस होतो, किंवा सभ्य माणूस म्हणून ओळखला जातो.

एक जबाबदार व्यक्ती सारखं त्याचं वागणं, बोलणं ह्यात फरक होत जातो…. निदान अपेक्षित तरी असंच असतं.

पण हे सगळ्यांच्या बाबतीत खरं आहे का? काही लोक तसं वागताना, बोलताना दिसत नाहीत.

मग शंका येते. काही लोक अशी शंका येण्यासारखंच वागतात. तर काही लोक प्रौढ होण्या आधीच प्रौढांसारखं अगदी जबाबदारीनं वागतात.

मग समोरची व्यक्ती प्रौढ आणि विचारांनी परिपक्व (मॅच्युअर) आहे किंवा दुसरी एखादी व्यक्ती प्रौढ आहे, पण विचार परिपक्व नाहीत (इमॅच्युअर) हे कसं कळणार?

तुम्ही सुद्धा मॅच्युअर आहात का? का अजून इमॅच्युअर आहात? जाणून घ्याच… म्हणजे गरज असेल तर स्वतःत बदल करता येतील. आणि आपली पर्सनॅलिटी खुलवता येईल.

१- परिपक्व विचार असलेले लोक हे सभोवतालच्या परिस्थितीशी नेहमी मिळतं जुळतं घेत असतात. परिस्थिती चा काहीही भरोसा नसतो हे समजून ते आपलं काम सतत करत असतात.

अशा लोकांची एखादेवेळी नोकरी जरी गेली तरी ते घाबरून जाऊन किंवा घरातल्या लोकांना घाबरवून टाकत नाहीत.

उलट ह्याला एक चॅलेंज समजून दुसरी नोकरी शोधून किंवा जमेल त्या कामाची संधी हेरून पुन्हा गाडी रुळावर आणतात.

आणि इमॅच्युअर लोक परिस्थिती जर बदलली तर एकदम निराश होतात. परिस्थितीतला बदल ते सहन करू शकत नाहीत.

हातपाय गाळून नशिबाला दोष देत बसतात. काही प्रयत्न करायचं सोडून कधी कधी जिवाचं बरं वाईट करून घेतात किंवा काहीही काम न करता हरलो म्हणून कबुली देतात आणि जबाबदारी पासून लांब पळतात.

म्हणजेच ते वयानं प्रौढ झालेले असतात पण त्यांचे विचार, ज्ञान, मानसिकता, कार्यक्षमता, निर्णय क्षमता ह्यात वाढच झालेली नसते असं सिद्ध होतं.

२- दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक इमॅच्युअर असतात ना ते जरा आक्रमकच असतात. समोरच्या व्यक्तीशी सरळ बोलत नाहीत.

आवाज चढवून जोरजोरात बोलतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालतात.

समोरून कुणी एखाद्या बाबतीत त्यांना नकार दिला तर ते तो नकार पचवू शकत नाहीत, उलट त्या गोष्टीवरून आकाश पाताळ एक करतात.

भांडायला लागतात. पण त्यामागचं कारण समजून घेत नाहीत.

पण मॅच्युअर लोकांची विचार करण्याची पातळी वरच्या दर्जाची असते. त्यांची भाषा सौम्य असते.

कोणी नकार दिला तर त्याचा स्वीकार करून दुसरा प्रयत्न सुरू करतात. पण वाद घालून प्रश्न वाढवत नाहीत, तर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात.

३- जे लोक विचारांनी परिपक्व झालेले नसतात ते लोक आपलं अज्ञान किंवा आपली चूक लपवण्यासाठी आधीच आरडा ओरडा सुरू करतात.

म्हणजे समोरची व्यक्ती त्यांच्यावर काही आरोप करू नये म्हणून असा आपल्या बचावाचा पवित्रा आधीपासूनच घेतात आणि आपली काहीच चूक नसल्याचं वातावरण तयार करून ठेवतात.

असंच काही बाबतीत जर अज्ञान असेल तरी अशी माणसं आधीच सुरुवात करतात, “माहितीये, माहितीये, आम्हाला सगळं, तुम्ही नाका सांगू.”

“हां आम्हाला सगळं कळतंय, तुम्ही सांगायची गरज नाही” असं बोलून समोरच्या व्यक्तीला गप्प बसवायचा प्रयत्न करतात. वास्तविक त्यांना त्यातलं काहीच माहिती नसतं किंवा सगळं काही कळतही नसतं.

हेच जर एखाद्या मॅच्युअर व्यक्ती बद्दल सांगण्याचं झालं तर मॅच्युअर व्यक्ती नेहमी जपून बोलते.

दुसऱ्या व्यक्तीने जरी टीका केली तरी ते मनाला लावून घेत नाहीत. ह्या लोकांचा स्वतःवर संयम असतो.

दुसऱ्याचा दृष्टिकोन कसा आहे ह्याचा विचार करूनच ते एखाद्या प्रश्नाचं अगदी बिनचूक उत्तर देतात.

म्हणजे दुसऱ्याला सुद्धा मान देतात, आणि आपला मान ठेऊन घेतात.

४- जो माणूस इमॅच्युअर असतो ना, तोच स्वतःला मॅच्युअर असल्या सारखं समजतो.

त्याला दुसऱ्यांच्या चुका कशा शोधायच्या हे चांगलं कळतं, ते दुसऱ्यांनाच त्यांच्या चुका सारख्या दाखवत असतात, आणि आपल्या चुका झाकून ठेवतात.

तशा अर्थाची एक म्हण आपल्याकडे नेहमी वापरली जाते ती म्हणजे “दुसऱ्याचं बघा वाकून आणि आपलं ठेवा झाकून” ही म्हण अशा इमॅच्युअर लोकांना अगदी तंतोतंत लागू पडते.

असले लोक हे विसरून जातात की ते स्वतः काही सर्व गुण संपन्न नाहीत.

अगदी ह्याच्या उलट मॅच्युअर लोक असतात. ते सारासार विचार करतात.

ते सर्व गुण संपन्न असून सुद्धा कोणाला चुका दाखवून दुखावत नाहीत. ते आपली चूक असेल तर ती चूक मान्य करतात.

समोरच्याचं बोलणं ऐकून घेतात, परिस्थितीचा विचार करतात, योग्य असेल ते स्वीकारतात. त्यांचं बोलणं इतकं योग्य असतं की समोरचा आपली चूक कबूल करून गप्प बसतो, पण उलट उत्तर देऊ शकत नाही.

ही त्या लोकांची परिपक्वतेची, विचारांची ताकद असते.

५- इमॅच्युअर लोकांमध्ये संयम नसतो. एखादा व्यवसाय त्यांनी सुरू केला की लगेच त्यात त्यांना यश मिळायला पाहिजे असतं.

लगेच त्यातून नफा मिळाला पाहिजे असं ते गृहीत धरून बसतात. आणि तसं नाही झालं तर लगेच त्यातून काढता पाय घेतात.

नाही जमणार म्हणून मोकळे होतात. कारण संयम (पेशन्स) नावाची गोष्ट ते आयुष्यात कधी शिकलेलेच नसतात.

मॅच्युअर लोकांचं तसं नसतं, ते व्यवसाय निवडताना आधी त्याचा सगळ्या बाजूने विचार करतात.

आपल्याकडे असलेलं ज्ञान, क्षमता, मेहेनत, फायदा, तोटा, सगळा विचार करून निवड करतात. स्वतःचा व्यवसाय करताना दिवस रात्र मेहेनत करावी लागेल ह्याची तयारी ठेवतात.

कोणत्याही उद्योगात यश सहजासहजी मिळत नाही हे सुद्धा त्यांनी माहीत करून घेतलेलं असतं. ह्यातून फायदा मिळायला वेळ लागणार आहे हे पण ते ओळखून असतात.

त्याची तयारी पण आधीच करून ठेवतात. येणाऱ्या अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी त्या संयम राखून सोडवतात आणि पाहिजे तसं यश खेचून आणतात.

मिळवलेल्या ज्ञानाचा ते योग्य उपयोग करून मॅच्युअर लोकांच्या लिस्टमधे येतात.

६- सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी घेणं. जे मॅच्युअर म्हणून ओळखले जातात ते आपण निवडलेल्या कामाची, पूर्ण जबाबदारी घेतात.

काहीही कमी मनाप्रमाणे नाही झालं तरी ते दुसरं कोणाला जबाबदार धरत नाहीत. दुसऱ्यांच्या भावनांची कदर करतात.

दुसऱ्यांनी सुचवलेल्या उपायांचं नेहमी स्वागत करतात. स्वतः उत्साही असतात. दुसऱ्यांना सुद्धा त्यांचा उत्साह बघून स्फूर्ती मिळत जाते.

आपल्या घरात सुद्धा ह्या मॅच्युअर लोकांची एक वेगळी इमेज असते. घरातल्या सगळ्याच व्यक्ती त्यांच्या शब्दाला किंमत देतात.

घरात आनंद, उत्साह सतत राहील ह्याची ते काळजी घेतात. आपल्या अपेक्षांचं ओझं असे लोक कोणावर लादत नाहीत.

मॅच्युअर होणं म्हणजे खूप मोठं असं काहीतरी करायचं नसून अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा अनुभव घ्यायचा आणि मिळवलेल्या ज्ञानातून आणि अनुभवातून आयुष्यात येणाऱ्या सगळ्या चढ उतारांप्रमाणे स्वतःला लवचिक बनवायचं, प्रसंगा प्रमाणे जुळवून घ्यायचं. आणि आयुष्यात भरभरूनआनंद आणि भरपूर समाधान मिळवायचं.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय