अमेरिका, इराणची परिस्थिती आणि नॉस्त्रदमसचं तिसऱ्या महायुध्दाचं भाकीत

सध्याची अमेरिका इराणची परिस्थिती पाहता तिसऱ्या महायुद्धाची भीती वाटतेय? पण नॉस्त्रदमसच्या भाकितानुसार ते तर अटळ आहे. त्यामुळे जर तिसऱ्या महायुद्धाचे भविष्य कोणी सकारात्मक रित्त्या उलगडू शकले किंवा ते खोटे ठरले तरच आपले भले..!! नाही का..??

सध्याची अमेरिका इराणची परिस्थिती पाहता तिसऱ्या महायुद्धाची भीती वाटतेय? पण नॉस्त्रदमसच्या भाकितानुसार ते तर अटळ आहे.

भाकीत, भविष्य ह्यावर नाही नाही म्हणतानासुद्धा अनेक लोकांचा विश्वास असतो..

भारतातील अभ्यासूंना, ज्यांना ज्योतिषशास्त्र खास अवगत आहे असे कित्येक लोक ह्या शास्त्रावर विश्वास ठेवतात..

पण भाकितं करणे आणि त्यावर विश्वास ठेवणे हे फक्त भारतातच घडत नाही..

जगभरात कित्येक जिज्ञासू स्वतःचे, कुटुंबाचे, देशाचे इतकेच काय तर संपूर्ण चराचराचे भविष्य जाणून घेण्यास उत्सुक असतात..

काही भविष्यवेत्ये तंतोतंत भविष्य सांगण्यात यशस्वीही ठरतात.

ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे नॉस्त्रदमस… हा कोण, किंवा ह्याने काय भाकीत वर्तवले ते आपण आज जाणून घेऊयात..

नॉस्त्रदमस हे नाव जगाला कळले ते अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या टेररिस्ट हल्यानंतर..

प्रत्येक न्यूज चॅनेल वर आणि वर्तमानपत्रात एकच बातमी..

हा अमेरिकेतील हल्ला किमान तीनशे वर्षांआधी वर्तवला गेला होता आणि त्याचा भाकीतकार होता नॉस्ट्रेडमस..!!!

होय.. सोळाव्या शतकात म्हणजेच इसवीसन १५०३ मध्ये फ्रांस मध्ये जन्मलेल्या ह्या नॉस्त्रदमस ने स्वतःच्या पुस्तकात विसाव्या एकविसाव्या शतकातील घडणाऱ्या बऱ्याच घडामोडींचा उल्लेख करून ठेवला आहे..

जसे प्रिन्सेस डायनाचा आकस्मिक मृत्यू, एडॉल्फ हिटलरचा उदय, पाहिले आणि दुसरे जागतिक महायुद्ध आणि हो तिसरे महायुद्ध सुद्धा..

२०१९ ते २०२० च्या दरम्यान तिसरे महायुद्ध होऊ शकते असेही नॉस्त्रदमस चे भाकीत आहे..

तर दोस्तांनो त्याच्या ह्या भाकितावर अचानक सगळ्यांना विश्वास का वाटू लागलाय असं तुम्हाला नक्कीच वाटेल..

पण कारणच तसे आहे..

ह्या नॉस्त्रदमस भाऊंनी प्रोफेसी नावाच्या पुस्तकात ९५० भविष्यावाण्या लिहून ठेवल्या आहेत.

आणि त्याने वर्तवलेले भविष्य खूप वेळा खरे ठरले आहे..

खरे वाटत नसेल तर खालील काही घटना वाचून पहा.. त्या सगळ्या नॉस्त्रदमस कडून आधीच नोंदवण्यात आल्या होत्या.

१. नॉस्त्रदमसने फ्रान्सची राणी कॅथरीन हिच्या मुलांचे भविष्य सांगितले होते की ते लहान वयातच स्वर्गवासी होतील ते अगदी खरे ठरले.

२. फेलिसी पेरिन नावाच्या लहानग्याला नॉस्त्रदमस ने सांगितले की मोठा होऊन तू ख्रिस्ती धर्मगुरू होशील. आणि तो खरेच मोठा होऊन १५८५ मध्ये पोप झाला.

३. नेपोलियन बोनापार्ट, हिटलर ह्यांच्या उदयास येण्याबद्दल आणि त्यांच्या अंताबद्दल देखील नॉस्त्रदमसच्या पुस्तकात नोंदी आढळतात.

४. जॉन एफ केनेडी ह्या अमेरीकन राष्ट्राध्यक्षांच्या हत्येबद्दलचे भाकीत नॉस्त्रदमसच्या पुस्तकात आहे.

५. भारताचा स्वातंत्र्य लढा, सुभाषचंद्र बोस , इंदिरा गांधी आणि राजीव गांधी ह्यांच्या बाबतीतली भविष्यवाणी नॉस्त्रदमसने स्वतःच्या पुस्तकात नोंदवून ठेवली होती आणि ते सगळे खरे ठरले आहे.

नालंदा तक्षशिला ह्यांच्या जळण्याबाबत असो किंवा भारतावरील परकीय आक्रमणं असो हे सगळे ४०० वर्षांपूर्वीच नॉस्त्रदमसला ठाऊक होते आणि तेही भविष्य खरे ठरले.

६. जगभरात २०१९ पासून हाहाकार माजेल अशीही नॉस्त्रदमसचे भविष्य कथन सांगते.

भूकंप, पूर अशा नैसर्गिक अडचणी आणि अणुयुद्ध ह्यामुळे जगात अशांती नांदणार आहे.

असेही भविष्य आपल्याला नॉस्त्रदमस च्या पुस्तकात वाचायला मिळेल.

७. नॉस्त्रदमसने स्वतःच्या मृत्यूचे सुद्धा परफेक्ट भाकीत करून ठेवले होते आणि अगदी त्याच पद्धतीने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.

एवढ्या सगळ्या उदाहरणातून त्याने वर्तवलेल्या भविष्याबद्दल नक्कीच विश्वास वाटू शकतो.

जगभरात वाढत जाणारा धार्मिक दहशतवाद हा संपूर्ण जगाच्या नाशाला कारणीभूत ठरणार आहे असे तो पुस्तकात सांगतो.

ह्यातच तिसऱ्या महायुध्दाबद्दल त्याने चिंताजनक भविष्य वर्तवले आहे. सध्या अमेरिका आणि इराण मधला तणाव, इसिस चा दहशतवाद, पाकिस्तान-कोरियाच्या अणुबॉम्बच्या धमक्या पाहता तिसरे महायुद्ध दूर नाही असेही जाणवते.

ह्या महायुध्दाबद्दल नॉस्त्रदमस म्हणतो की हे युद्ध २०१९ नंतर सुरू होऊ शकते ते जवळजवळ २७ वर्षे चालेल.

पृथ्वीवर दोन गट पडतील आणि त्यांच्यात तुंबळ युद्ध होईल. अगदीच नगण्य लोक ह्यात जिवंत राहतील.

ह्या युद्धा नंतर पुढच्या चाळीस एक वर्षात जगाचा नाश अटळ आहे. ‘अणुबॉम्ब’ ज्याबद्दल देखील त्याच्या पुस्तकात नोंदी आढळतात त्याच्या उपयोगामुळे तिसरे महायुद्ध महाविनाशक होईल.

आता हे भाकीत खरे ठरते की खोटे हे पाहणेच काय ते आपल्या हातात आहे. कारण भविष्य वाचूनच अंगावर सरसरीत काटा येईल.

पण ते खरेच ठरेल असा विचार करून घाबरण्याचे काहीही कारण नाही. भारत हा अलिप्ततावादी देश आहे.

फक्त कुठल्याही राजकीय विचारांची गुलामगिरी न करता, सारासार विचार करून धर्मांध शक्तींना फोफावू न देणं हे तेवढं गरजेचं आहे.

अमेरिका, रशिया यांसारखे बलाढ्य देश या युद्धात सक्रिय असल्याने या काळात शांततेच्या मार्गाने भारत जगातली महाशक्ती होऊ शकतो हे सांगायला कुठल्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही, हे मात्र नक्की.

अर्थात हे तिसऱ्या महायुद्धाचे भविष्य खरे ठरणार जरी असेल तर ते पाहायला आपण जिवंत असू की नाही तेही सांगता येणे अशक्य आहे.

ह्या युद्धामध्ये भयंकर मोठी जीवित हानी होणार असल्याचे भाकीत असल्याने ते खरे न व्हावे असेच कोणालाही वाटेल.

तर मित्रांनो ह्या भविष्यवाण्यांबद्दल तुम्हाला त्यांच्या पुस्तकातून देखील खरी खुरी आणि सविस्तर माहिती कळू शकेल.

मात्र ती माहिती समजून घेणे म्हणजे दिव्य कर्म आहे.

कारण हे सगळे भविष्य एक कोडे/कविता/छंद स्वरूपात लिहिण्यात आले आहे.

जो जसा अर्थ लावेल ते तसे उलगडताना दिसेल.

त्यामुळे जर तिसऱ्या महायुद्धाचे भविष्य कोणी सकारात्मक रित्त्या उलगडू शकले किंवा ते खोटे ठरले तरच आपले भले..!! नाही का..??

चला तर विश्वशांतीची प्रार्थना आपण सगळेच करूयात…

Image Credit: https://steemitimages.com/

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय