युवराज हॅरीची पत्नी मेघन सह स्वच्छंद आयुष्यासाठी राजघराण्याला सोडचिट्ठी

राजघराण्याचं उच्च राहणीमान आणि वैभव सोडून नोकरी करून सर्वसामान्य माणसांसारखं जीवन जगायचं ठरवलंय ह्या राजपुत्रानं आणि त्याच्या कुटुंबानं. कोण आहे तो राजपुत्र?…..

वाचा म्हणजे समजेल आपलं सर्वसामान्य असणं हि पण काही साधी गोष्ट नाही.

राज घराणं म्हटलं की, उंची कपडे परिधान केलेले, आलिशान महालात राहणारे, असंख्य नोकर चाकर सेवेला तैनात असलेले, गोरे गोमटे, सतत चेहेरा हसतमुख ठेऊन, जड जवाहिर अंगावर ल्यालेले, सोन्या चांदीच्या ताटात जेवणारे, कायम श्रीमंतीच्या थाटात असलेले लोक आपल्या डोळ्यासमोर येतात.

सर्वसामान्य जनतेला त्यांचं दर्शन मिळण्याचा योग कठीणच असतो.

तरीपण ह्या लोकांना जगातले सगळेच लोक ओळखतात. आपण त्यांना आपल्या उभ्या आयुष्यात सुद्धा कधी पाहिलेलं नसतं.

सार्वजनिक ठिकाणी ते कधी जातही नाहीत म्हणून आपल्याला दिसत नाहीत. वर्तमानपत्रात त्यांचे फोटो झळकले की आपण त्यांना नावाने ओळखायला लागतो.

दिवसभर हे लोक अशाच थाटात राहतात का? काय काम करत असतील अशी शंका आपल्या मनात असतेच.

पण आपण कुठे बोलून दाखवत नाही. लोक आपल्याला हसतील म्हणून कदाचित.

पण हसणाऱ्या लोकांना तरी कुठं काय माहिती असतं?.

तर असे राहतात हे राज घराण्यातले लोक. अपल्यासारखं मनाला येईल तेंव्हा मोटारसायकलवर कुठेही फिरू शकत नाहीत.

त्यांना कुठे बाहेर जायचं असेल तर कडक बंदोबस्तात, पाच पन्नास गाड्यांचा ताफा मागे पुढे ठेऊन फिरायला लागतं.

घरात सगळी कामं ह्यांचे नोकर चाकर करत असतात. ह्यांनी फक्त इथून उठायचं आणि तिथं बसायचं. काय सुखात जगत असतात ना हे लोक.

काहीच काम करायचं नाही. ऐश्वर्य असावं तर असं. नशिबात असतं एकेकाचं.

मित्रांनो आपल्यालाही असं आयुष्य मिळावं असं वाटतं ना? साहजिकच आहे.

पण अशा राज घराण्यात जन्मलेल्या एका तरुणाला वाटतंय की नको हे असलं आयुष्य.

त्या पेक्षा एखाद्या छोट्या घरात राहिलेलं बरं. नको ते प्रोटोकॉल च्या कडक बंधनातलं जगणं.

साध्या घरात राहायचंय, आणि नोकरी करून पैसे मिळवून संसार चालवायचा….

कुठेही फिरता आलं पाहिजे. राज घराण्याचा पैसा नको आणि ते श्रीमंती शिष्टाचार पण त्यांना नको आहेत. त्या सगळ्याचा त्यांना कंटाळा आलाय.

कोण आहे हा तरुण आणि त्याचं कुटुंब? आव्हान बातम्यांमध्ये वाचून माहित झालंच असेल??

हा तरुण म्हणजे इंग्लंड च्या जगप्रसिद्ध राणी एलिझाबेथ च्या राज घराण्यातला तरुण. प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना ह्यांचा छोटा मुलगा. तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलंच ना?

ब्रिटिश राजघराणं, आणि प्रिन्स चार्ल्स, त्याची दिवंगत पत्नी लेडी डायना. बहुतेकांना परिचित आहेत.

परिचित म्हणजे त्यांनी अगदी आपल्याशी मस्त गप्पा मारून आणि हातात हात मिळवून परिचय करून दिला आहे असं काही नाही.

पण त्यांचे फोटो चुकून कधीतरी वर्तमानपत्रात किंवा मॅगेझीन मध्ये आलेले पाहून त्यांना आपण ओळखतो की. ही राणी एलिझाबेथ, हा प्रिन्स चार्ल्स, आणि ही लेडी डायना. असे परिचित निश्चित आहेत.

ह्या चार्ल्स प्रिन्स ला दोन पुत्र, मोठा विल्यम्स, आणि त्याची पत्नी केट मिडलटन. आणि धाकटा हॅरी, आणि त्याची पत्नी मेघन मार्कल.

त्या दोघांना दोन छोटे पुत्र. आणि राणी एलिझाबेथ असे हे कुटुंब बकिंगहॅम पॅलेस ह्या आलिशान वास्तूमध्ये राहतात.

जगातली सगळी सुखं ह्या परिवाराच्या पायाशी लोळण घेतात असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. इतकी समृद्धी ह्या राजघराण्यात नांदते आहे.

सगळी सुखं उपभोगताना राज शिष्टाचार सुद्धा ह्या घराण्यात पळाले जातात.

इतकं सुख असताना सुद्धा ह्या घराण्यातल्या छोट्या राजपुत्राने म्हणजेच युवराज हॅरी ने एक या पूर्वी कधीही , आणि कोणीही न घेतलेला निर्णय घेतलाय.

हा निर्णय म्हणजे युवराज हॅरी आणि त्याची पत्नी मेघन आपल्या पुत्रासह, हा पॅलेस, हे सुख, हे ऐश्वर्य, पैसा, गाड्या, सोडून जाण्याचा निर्णय.

त्यांनी राजघराण्यातून रीतसर राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

असा निर्णय सहजासहजी कोणी घेत नाही. पण ह्या राजपुत्राने तो निर्णय घेतलाय.

आणि स्वतः चांगली नोकरी करून उत्तर अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार केलाय. सर्व सामान्य माणसांसारखं आयुष्य जगायचा हा निर्णय आहे.

हे ऐकल्यावर ह्या राजघराण्यात भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हा निर्णय घरातल्या कोणत्याही मोठ्या व्यक्तींशी विचार विनिमय न करता घेतलाय. म्हणजे तडकाफडकी घेतलेला हा निर्णय आहे असे राजघराण्याचे म्हणणे आहे.

असे तडकाफडकी निर्णय का घेतले जातात ह्याचा जर आपण विचार केला तर एकच कारण आपल्या समोर येईल, आणि ते म्हणजे गृह कलह.

आपल्या सर्व सामान्य लोकांच्या भाषेत त्याला घरातली भांडणं म्हणता येईल. पण इतक्या मोठ्या घराण्यात सगळे लोक उच्च शिक्षित असताना भांडण होऊ शकतं? हा आपल्या मनात प्रश्न उभा राहू शकतो.

मोठं राजघराणं म्हटलं की जो मोठा असतो त्याला गादीवर बसवलं जातं. हे अगदी जुन्या इतिहासापासून घडत आलेलं आपण वाचलंय, ऐकलंय.

आणि ह्या घराण्यात हॅरी हा लहान आणि विल्यम्स हा मोठा असल्यामुळे आधी वारस म्हणून विल्यम्स ला गादीचा हक्क मिळणार. म्हणून हे सगळं झालं .

दोन भावांमध्ये काहीतरी बेबनाव झाला, म्हणून हा निर्णय हॅरी ने घेतला.

पण संपूर्ण घराण्याचीच मोठी पंचाईत झाली. घराण्यात फूट पडली हे जगजाहीर झालं.

खरं कारण अजून लोकांना जाहीरपणे त्या घराण्याकडून कळलं नाही. पण कनिष्ठ म्हणून वारसा मिळणार नाही. मग राजघराण्याचे नुसते शिष्टाचार पाळत काहीही काम न करता बंधनात घुसमटत रहायचं, त्यापेक्षा काहीतरी स्वतः करून मोकळ्या मनानं आणि आपल्या मर्जीने जगावं असा विचार करण्याची वेळ आली असेल, हॅरी च्या नाराजीचा हा सूर हे स्पष्ट करतोय की दोन्ही भावांमध्ये काहीतरी मोठा वाद झाला आहे.

ह्या घराण्यात राहून हॅरी ला सर्वसामान्य लोकांत वावरण्याच्या काही गोष्टी माहीत नसतील पण त्याची पत्नी ही राजघरण्यातून आलेली नाही.

ती या पूर्वी टी व्ही सिरियल्स आणि चित्रपटात काम करणारी अभिनेत्री होती. त्यामुळे तिच्या सहकार्याने हा निर्णय हॅरी ने घेतला असावा.

म्हणजे जगातली सगळी सुखं अनुभवणारे लोक सुद्धा जेष्ठ – कनिष्ठ ह्या एका कारणासाठी ह्या सुखांवर पाणी सोडून असा कठोर निर्णय घेऊ शकतात.

ह्या राजघराण्यांत बाहेरून आपल्याला सगळे आनंदी, भाग्यवान वाटत असले तरी आत काय?

आणि कोणत्या कारणाने धुसफूस चालत असेल ते कळत नाही. असं अचानक काही घडल्यावर संपूर्ण जगाला ते कळतं.

ह्या राजपुत्राच्या निर्णयाला इतकं मोठं घराणं थांबवू शकलं नाही. तर आपण काय करू शकणार?

पण आपण युवराज हॅरी आणि त्याची पत्नी मेघन, ह्यांच्या ह्या धाडसी निर्णयाला, पुढच्या यशस्वी आणि सच्छन्द आयुष्याला आपल्या शुभेच्छा मात्र जरूर जरूर देऊ..

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय