वैवाहिक जीवन जरा चटपटीत करायचं आहे..?? तर ह्या गोष्टी करून पहा..

लग्न हे दोन जीवांचे मिलन आहे हे सतत लक्षात ठेवले पाहिजे. संसाराच्या रगाड्यात हे विसरता कामा नये. नाहीतर संसार निरस होऊन जातो. एकमेकांचा कंटाळा येऊ लागतो किंवा एकमेकांना आपण गृहीत धरू लागतो. तिथे संघर्षाची ठिणगी सुद्धा पडू शकते.

म्हणून कायम हे लग्नबंधन टवटवीत ठेवले पाहिजे. वय काहीही असो पण सहजीवनातले तारुण्य टिकवता आले पाहिजे…. रोज एकमेकांना पाहताना आपण किती नशीबवान आहोत आपल्याला असा जोडीदार मिळाला अशी भावना जागृत झाली पाहिजे आणि त्या साठी दोघांनीही सारखेच प्रयत्न केले पाहिजेत..

लग्न झाल्यानंतर हनिमूनला जाणे ही एक उत्तम प्रथा आहे.

कारण तो काळ, त्यात मिळणारी प्रायव्हसी सगळ्यांनाच हवीहवीशी असते.

जोडप्यांना एकमेकांसोबत वेळ घालवता येतो, खूप गप्पा मारत येतात, एकमेकांना जाणून घेता येते, प्रेमाचे क्षण अनुभवता येतात आणि नात्याची पकड घट्ट होण्यास ह्याची मदत होते.

हनिमून वरून आल्यावर सुद्धा काही काळ सगळ्यांमध्ये राहूनही हनिमून पिरियडचा अनुभव काही मंडळींना घेता येतो.

मात्र कालांतराने रोजचे दिनक्रम चालू झाले की हाच स्वप्नांचा काळ संपायला लागतो आणि रुटीन लाईफ ला सुरुवात होते.

पुढे मुलेबाळे झाल्यावर एकमेकांना द्यायला वेळच नसतो. मुलांचे जन्म, त्यांचे पालन पोषण, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, लग्न होई पर्यंत नवरा बायको स्वतःचे खाजगी आयुष्यच विसरून जातात हे आपण पाहतो.

किंबहुना स्वतः अनुभवतो देखील..!

पण मित्रांनो ही सगळी कर्तव्ये पार पडतानाही आपण आपला हनिमून पिरियड नेहमी जपू शकतो.

कसे तेच आज मी ह्या लेखात मांडणार आहे. ते म्हणतात ना spice up the life.. अगदी तस्सेच चटपटीत वैवाहिक जीवन असल्यावर कोण मज्जा येईल..!!

आणि फार काही अवघडही नाहीये ते.. रिलेशनशिप एक्सपर्ट्सच्या काही भन्नाट टिप्स आज येथे मी तुम्हाला सांगणार आहे.

जेणेकरून तुम्हाला तुमच्या नात्यातला गोडवा पुन्हा आणत येईल आणि त्याच बरोबर त्याची रंगतही वाढवता येईल..

कसा वाटतोय हा विचार..?? Savvy..?

मग एकवार हया टिप्स वर नजर टाका आणि बघा कोणती आयडिया भावते ते..

१. पुन्हा एकदा एकेमकांना डेट करा: म्हणजे लग्नाआधी कसे फिरायला जायचा. मग डिनर करून, चाट किंवा आईस्क्रिम खाऊन अथवा एका नारळात 2 स्ट्रॉ घालून नारळ पाणी प्यायचा?

नंतर समुद्रकिनारी भटकून, पोटभर गप्पा मारून आपापल्या घरी जायचा..??

अगदी तसेच पुन्हा पुन्हा डेट वर जा. दर वेळी डिनर हवंच असे नाही. कधी कॉफी घ्यायला जा.

तर कधी नुसते चणे फुटाणे खात भटकून या.. कधीतरी नुसते कट्ट्यावर जाऊन गप्पा हाणून या.. बघा कसे तरुण व्हाल पुन्हा..

असे दिवस फक्त आठवायचे नसतात तर पुन्हा पुन्हा वेळ काढून जगायचेही असतात..

आणि हो हे फक्त प्रेमविवाह केलेल्यांसाठीच आहे असं काही समजू नका. अगदी ठरवून कांद्यापोह्याचा कार्यक्रम करून लग्न ठरलेलं असेल तरी नात्यात तरतरी आणण्यासाठी हे करून पाहायला काहीही हरकत नाही.

२. एकत्र व्यायाम करा: जोडीने जिमचे पॅकेज घ्या. किंवा एखादा झुंबा क्लास लावा. ह्याची अगदीच आवड नसेल तर घरातच दोघे मिळून एकत्र योग करा.

एकमेकांना प्रोत्साहित करा. फिट तर राहालच पण एकेमकांना छान क्वालिटी टाईम देता येईल.

काही व्यायाम एकमेकांच्या मदतीने केले जातात तेव्हा पुन्हा रोमान्स करण्याची आयती संधी असेलच.. 🤗

३. एकत्र स्वयंपाक करून सहभोजन करा: महिन्यातून एखादा दिवस तरी फक्त दोघेच किचनचा ताबा घ्या.

मुलांना लवकर झोपी घाला….. हसू नका मुलं मोठी असतील तर हे शक्य नाही मान्य!!! मग दुसरी काहीतरी युक्ती करा. आपल्या पेजच्या #३०डेजचॅलेंज मध्ये हि ऍक्टिव्हिटी योग्य वेळी आहेच.

(मनाचेTalks चे पेज फॉलो करताना See First चा पर्याय निवडायला विसरू नका म्हणजे म्हणजे #३०डेजचॅलेंज चा कुठलाही भाग राहून जाणार नाही.)

आणि स्वतःसाठी काहीतरी भन्नाट बनवा.

एकत्र जेवा, एकमेकांना भरवा. बडे बुजुर्ग केह गये है, जी एकत्र स्वयंपाक करू शकतात ती जोडपी कायम एकत्र सुखाने नांदतात..

तर मंडळी आजच ट्राय करा एखादी नवीन डिश आणि मज्जा लुटा एकांतात. हवे तर एखादा कमी काळाचा कुकिंग क्लास देखील एकत्र लावू शकता.

तिकडे शिका नवीन काही. तेवढाच बिझी आयुष्यातला एखादा तास जोडीदाराच्या नावे..!!

४. एकत्र घर सजवा: हल्ली घर घेतल्यावर ते इंटिरिअर डिझायनर कडूनच चकाचक घडी घालून घ्यायची प्रथा आहे..

म्हणजे त्याचे सजवणे हे सर्वस्वी त्या डिझायनरच्या कल्पनांवर अवलंबून असते.

आपली इनवोल्व्हमेंट फक्त पैसा ढिला करण्यापूरती. त्या ऐवजी एखादा कोना आपल्या साठी राखून ठेवा.

त्याला स्वतःच पेंट करा, त्या भिंतींवर लावायला लागणारे आयटम्स जोडीदाराबरोवर जाऊन खरेदी करा.

संगनमताने तो कोपरा सजवा. तिथे स्वतःला बसून वेळ घालवता यावा म्हणून बसायची सोय सुद्धा करा. एक वेगळीच मनःशांती ह्यातून तुम्हाला मिळेल. ‘आपले’ पण नक्कीच वाढेल.

त्यातून ही ऍक्टिव्हिटी करताना एकमेकांसोबत घालवलेले क्षण अमूल्य असतील. ते फील करा..!!

५. एकत्र नृत्य करा: कधीतरी ‘ते’ आवडतं गाणं लावून हातातली कामं बाजूला ठेवून जोडीदाराचा हात हातात घेऊन रोमॅंटिक नृत्य करून पहा.

एकत्र गाणे गात एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून, जगाला विसरून काही काळ एकमेकांचे व्हा.

जोडीदाराला कवेत घेऊन बॅले डान्स होऊन जाऊद्या. नाही लागला ताल, ठेका तरी कुठे बिघडलं? जर असे कधीच केले नसेल तर मग किती अरसिक आहात तुम्ही.. थोडे रसिक होऊन तर बघा..!!

६. पुस्तक वाचन एकत्र करा: आपल्या आवडत्या लेखकाचे पुस्तक गादीवर पडल्या पडल्या एकमेकांच्या कुशीत झोपून एकत्र वाचा..

एखाद्या आवडलेल्या पुस्तकाबद्दल एकमेकांशी गप्पा मारा. एखादा आवडलेला उतारा, रोमँटिक कविता एकमेकांना म्हणून दाखवा.

अगदी स्वतःहून एकमेकांवर प्रेमपूर्ण चारोळ्या बनवा.. त्यासाठी कवी असायलाच पाहिजे असे नाही. दोघे मिळून शब्द जुळवा आणि बघा कसे यमक जुळता जुळता तुम्ही दोघे जवळ येता..

७. एखादा खेळ खेळा: पत्ते, कॅरम किंवा अगदी व्हिडीओ गेम एकत्र बसून खेळा. एकमेकांना हारवण्यात किंवा स्वतःच्या जोडीदाराला मुद्दाम जिंकवण्यात सुद्धा मौज असते.

८. एकत्र आराम करा: दर वेळी आराम करायला मोबाईल घेऊन एकलकोंडे दुसऱ्या खोलीत जाऊन बसण्यापेक्षा जोडीदाराची कामं संपवायला मदत करा.

एकत्र सोफ्यावर किंवा बेडरूम मध्ये एक मस्त दुलई घेऊन निवांत पडून रहा..

दिवे मंद करून, हलके फुलके संगीत एका.. एकमेकांना हेड मसाज द्या.. एकमेकांना मिठीत ठेऊन स्वतःच्या स्वप्नांबद्दल गप्पा मारा.

पॉपकॉर्न टब घेऊन एखादा जुना सिनेमा, एखादी वेबसिरीज एकत्र एन्जॉय करा.

सगळे गॅजेट दूर ठेवून फक्त एकमेकांच्यात गुरफटून जा. स्पा किंवा रिसॉर्ट पेक्षाही एकमेकांच्या सोबत रिलॅक्स करतांना घालवलेले हे क्षण लाख मोलाचे असतात ह्याचा अनुभव घ्या..!!

९. कधी जमल्यास हनिमून प्लॅन करा: जोडीदाराच्या नकळत वीकएंड किंवा शॉर्ट हॉलिडे ट्रिप प्लॅन करा.

लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून फिरायला जा. जिथे फक्त तुम्ही दोघे असाल आणि ओळखीचे आजूबाजूला कोणीच नको.

दिवस भर कोणत्या चिंता नाहीत की कामाचा व्याप नाही. दोनच दिवसाची ट्रिप असली तरी चालेल पण कधीतरी हे औटिंग तुमच्या नात्याला अजून घट्ट बांधते.

पुन्हा एकदा असा हनिमून पिरियड जगणे म्हणजे आठवणींचा संचय करून घेण्यासारखे आहे..

१०. लग्नाबांधनातले सगळे सण साजरे करा: लग्न व्हायच्या आधी आणि झाल्यावर एकेक माईलस्टोन आपल्या आयुष्यात येत असतात.

वाढदिवस आणि सणवार सोडले तर आपण सहसा इतर कोणते दिवस कधीच साजरे करत नाही.

पण लग्न बंधनानंतर येणारे सुंदर क्षण साजरे केले पाहिजेत. एकमेकांचे झालेले प्रमोशन, एखादी आचिव्हमेंट, तुम्ही पहिल्यांदा भेटला होता तो दिवस किंवा एकमेकांना लग्नासाठी प्रपोझ केले तो, पहिल्या ओळखीचा दिवस कॅलेंडर वर मार्क करून टाका.

आणि दर वर्षी त्याचे सुंदर सेलिब्रेशन करा. असे छोटे छोटे क्षण साजरे करण्याने आपण एकमेकांबद्दल आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करत असतो आणि नकळत समोरच्याचे मन जिंकत असतो.

तर मित्रांनो लग्न हे दोन जीवांचे मिलन आहे हे सतत लक्षात ठेवले पाहिजे.

संसाराच्या रगाड्यात हे विसरता कामा नये. नाहीतर संसार निरस होऊन जातो. एकमेकांचा कंटाळा येऊ लागतो किंवा एकमेकांना आपण गृहीत धरू लागतो. तिथे संघर्षाची ठिणगी सुद्धा पडू शकते.

म्हणून कायम हे लग्नबंधन टवटवीत ठेवले पाहिजे. वय काहीही असो पण सहजीवनातले तारुण्य टिकवता आले पाहिजे.

रोज एकमेकांना पाहताना आपण किती नशीबवान आहोत आपल्याला असा जोडीदार मिळाला अशी भावना जागृत झाली पाहिजे आणि त्या साठी दोघांनीही सारखेच प्रयत्न केले पाहिजेत..

शेवटी लग्न हा असा खेळ आहे जो सतत जिंकण्यासाठी स्किल असावे लागते आणि मेहनती खेळाडूच त्याला जिंकू शकतात.. नाही का..??!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “वैवाहिक जीवन जरा चटपटीत करायचं आहे..?? तर ह्या गोष्टी करून पहा..”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय