प्रेम असावं आई-बाबांसारखं….

प्रेम असावं आई-बाबांसारखं,
लेकरांसाठी रात्रंदिन झुरणारं…
नको,वासनेनं झपाटलेलं.
प्रेम असावं आई-बाबांसारखं,
लेकरांच्या सुखासाठी जीवाचं रान करणारं…
नको, अपेक्ष्यांच्या ओझ्यांनी लादलेलं.
प्रेम असावं आई-बाबांसारखं,
स्वतः रिकामे असताना लेकरांना भरभरून देणारं…
नको, सारं असताना अजून घेण्यासाठी हव्यासलेलं.
प्रेम असावं आई-बाबांसारखं,
लेकरू जिथं असेल तिथं लेकरांना आनंदी पाहण्याचा छंद असणारं…
नको, समोरच्याच्या आनंदामुळे आसुयेनं भारलेलं.
प्रेम असावं आई-बाबांसारखं,
निखळ,निस्वार्थ सागरासम भरलेलं…
नको, स्वार्थाने बरबटलेलं.
प्रेम असावं आई-बाबांसारखं…..

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा