CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी काय केले पाहिजे?

CIBIL

CIBIL चा एक खराब गुण तुमची आर्थिक समस्या वाढवू शकतो आणि कर्ज किंवा क्रेडिट अप्रूव्ह करण्यासाठी कठीण जाऊ शकते. आपली पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपला क्रेडिट स्कोअर सुधारणे गरजेचे असते. त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात ते आता आपण पाहू.

क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी काही मुद्दे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे ते असे…

  • काही निश्चित कालावधीनंतर क्रेडिट अहवाल तपासत जा: आपल्या क्रेडिट अहवाल घेतल्यानंतर बरेचदा आपल्याला त्यात काही त्रुटी असल्याचे दिसते परंतु आपल्या माहितीनुसार आपली क्रेडिट हिस्टरी हि योग्यच असते तेव्हा आपली संपूर्णपणे बंद झालेली कर्जे यात प्रशासकीय चुकीमुळे अंतर्भूत केली गेली आहेत का हे प्रथम तपासून बघावे. आपण स्वतः लक्ष घालून ती चूक दुरुस्त करून घेतली तर आपल्याला नियोजित कर्ज मिळवणे सोपे जाऊ शकते.
  • संशयास्पद व्यवहारांवर लक्ष असू द्या: त्याचप्रमाणे, कोणत्याही संशयास्पद व्यवहार (उदा. आपण न घेतलेले कर्ज) हेही क्रेडिट अहवाल मागवून आपण तपासून बघू शकतो. त्यात काही त्रुटी आढळल्यास ब्युरोकडे विवाद दाखल करता येतो. तक्रारींचे निराकरण करून CIBIL स्कोअर सुधारला जाऊ शकतो.
  • देयक वेळेवर भरा: कोणतेही देयक अथवा बिल हे वेळेत भरले गेले तर CIBIL स्कोअर हा उत्तम राहण्यास निश्चितच मदत होते. कुठलेही बिल किंवा क्रेडिटकार्डची परतफेड वेळेवर न केली जाणे याचा सुद्धा CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.
  • देयक देण्याचा कालावधी लक्षात घ्या: आपण देय दिनांकापूर्वी आपल्या देयकास किमान ५ कामाच्या दिवसापर्यंत देयक म्हणजेच बिल देण्याची खात्री करणे आवश्यक आहे. आपण चेकद्वारे देयक भरण्याची योजना करत असल्यास, आपण देय तारखेच्या १० दिवस अगोदर पैसे देण्याचे निश्चित केले पाहिजे.
  • आपल्या क्रेडिट कार्डाचा वापर मर्यादित ठेवा:  आपल्या क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या क्रेडिट कार्डाचा संपूर्ण मर्यादेत वापर करणे टाळावे. शक्यतोवर आपले क्रेडिट कार्ड हे त्याच्या मर्यादेच्या ५०% च वापरले जाईल याची काळजी घ्यावी. उदा. जर तुमची मर्यादा रू. दरमहा १,००,००० असेल तर ५०००० रुपये इतकाच क्रेडिट कार्डच्या माद्यमातून खर्च दर महिन्याला होईल अशी शिस्त लावून घ्यावी. हि काळजी न घेतल्यास CIBIL गुणसंख्या कालांतराने कमी होऊ शकते.
  • थोड्या-थोड्या कालावधीनंतर क्रेडिट कार्ड किंवा कर्जासाठी अर्ज करण्याचे टाळा: जर तुमचे कमी कालावधीत बरेचदा बँकेकडून व्हॅरिफिकेशन झाले असल्यास क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

आपल्या वैयक्तिक परिस्थितीनुसार सरासरी आपल्या क्रेडिट स्कोरची दुरुस्ती करण्यासाठी ४ ते १२ महिने लागतात. तुम्हाला फक्त काही धीर, वचनबद्धता आणि आत्म-शिस्त बाळगणे आवश्यक आहे आणि तर आपण आपले क्रेडिट उद्दिष्ट नक्कीच साध्य करू शकतो .


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!