ऍमेझॉन सेलर बनण्यासाठी काय करावे लागते? ऑनलाईन सेल कसे करायचे?

Amazon वर कसे सेल करायचे

आम्हाला वाचकांचे रोज जे बरेच मेसेजेस, मेल्स येत असतात त्यात सर्वात जास्त मेसेजेस असतात ते काहीतरी साईड बिजनेस करण्याबद्दल आयडिया सांगा… घरातून करता येईल असे काम सांगा वगैरे. म्हणूनच आज ऍमेझॉन वर आपले दुकान कसे चालू करायचे याबद्दल सविस्तर माहिती या लेखात समजावून सांगणार आहे.

आम्हाला वाचकांचे रोज जे बरेच मेसेजेस, मेल्स येत असतात त्यात सर्वात जास्त मेसेजेस असतात ते काहीतरी साईड बिजनेस करण्याबद्दल आयडिया सांगा…

दुकानातली विक्री वाढवता कशी येईल याबद्दल टिप्स द्या…

बरेचदा महिला विचारतात कि घरून सुरु करता येईल असे काही काम सांगा….

आज एक मेसेज आला कि जॉब गेल्यामुळे काही काम सुरु करायचे आहे तर त्याबद्दल आयडिया द्या…

तर मित्रांनो आज एक भारी, ट्राईड अँड टेस्टेड मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे.

तो आहे ऍमेझॉन वरून विक्री कशी सुरु करायची?

तुमचं जर काही दुकान असेल, तर आणखीनच छान. आता फक्त या लेखात तुम्हाला मी सांगेल तशी सर्व सेटिंग करायची आणि कॅशफ्लो सुरु करायचा.

तुम्ही जर गृहिणी असाल आणि काही काम सुरु करायचे असेल तर एक मोठा श्वास घ्या आणि तयार व्हा. कारण तुमच्या मनाची तयारी असेल तर हे करणे तुम्हाला अगदी सहज शक्य आहे.

बरं आता तुम्हाला जर प्रश्न असेल कि विकायचं काय?

तर उत्तर सोपं आहे… ऍमेझॉनवर तुम्ही काहीही विकू शकता.

अगदी शेणाच्या गवऱ्यांपासून टी.व्ही. लॉपटॉप, पुस्तकं किंवा अगदी किराणा माल सुद्धा तुम्ही ऍमेझॉन वर विकू शकता.

फक्त हा लेख पूर्ण वाचा आणि त्यात दिलेल्या इमेजेस नीट समजून घ्या. काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा.

आता आपण ऍमेझॉन चे विक्री चे स्ट्रक्चर जरा समजावून घेऊ.

ऍमेझॉन वर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी दिसतात.

तर त्यासाठी ऍमेझॉन बरोबर वेगवेगळे विक्रेते जोडले गेलेले असतात. अगदी सध्या भाषेत सांगायचे झाले तर या विक्रेत्यांनी अमेझॉनच्या रिक्वायरमेंट नुसार सर्व गोष्टींची पूर्तता केलेली असते.

आणि त्यांचे प्रोडक्ट छानसे प्रेझेंट करून या दुकानात ठेवलेले असते.

Amazon वर कसे सेल करायचे

तर हे सुरु करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ऍमेझॉन वर सेलर अकाउंट बनवावे लागेल. ते कसे करायचे तेच आता सविस्तर या लेखात बघा.

ऍमेझॉन सेलर म्हणून काम सुरु करण्याची पद्धत स्टेप बाय स्टेप बघा…

https://sellercentral.amazon.in/ या वेबसाईट वर जा.

खाली दिलेल्या इमेज प्रमाणे विंडो ओपन होईल त्यात Register Now या ठिकाणी क्लिक करून पुढे येणाऱ्या विंडो मध्ये Start Selling यावर क्लिक करून पुढे आपले नाव, मोबाईल नम्बर, इ मेल ID टाकून ऍमेझॉन सेलर म्हणून अकाउंट सुरु करा.

Amazon Seller Marathi

 

हि झाली छानशी सुरुवात.

दिलेला इ मेल ID, मोबाईल नम्बर आणि पासवर्ड हि तुमच्या या डिजिटल दुकानाची चावी असणार आहे तेव्हा हे नीट लक्षात ठेवा.

१) सेलर अकाऊंट बनवण्यासाठी या गोष्टी तयार ठेवा

  • ID प्रूफ
  • पॅन कार्ड
  • GST नम्बर
  • बँक अकाउंट

आता खाली दिलेल्या इमेज प्रमाणे आपल्या स्टोअरचे नाव, आपल्याला जे प्रॉडक्ट विकायचे आहे त्याची कॅटेगरी, पत्ता हे सर्व नमूद करा.

पत्ता देताना हे लक्षात घ्या कि आता तुम्ही दिलेल्या पत्त्यावरच ऑर्डरच्या पीक अप साठी कुरियर बॉय येणार आहे. तेव्हा हा तुमच्या तुम्ही सुरु करत असलेल्या कामाचा ऑफिशिअल पत्ता असणार आहे.

Amazon-seller-marathi

आता तुम्हाला तजवीज करायची आहे ती आलेल्या ऑर्डरला कुरियरने पाठवण्याची. पुढे दिलेला 👇 स्क्रीन शॉट बघा त्यात ‘Amazon easy ship service’ असे जे ऑप्शन दिसेल ते न चुकता टिक करून सिलेक्ट करायचे आहे.

amazon-seller-marathi

यानंतर तुमच्याकडून तुमच्या अकाऊंटच्या सेफ्टी साठी Two Step Authentication करवून घेतले जाईल.

पुढची स्क्रीन टॅक्स डिटेल्स देण्यासाठी असेल. जर तुमच्याकडे GST नम्बर नसेल तर तुम्ही फक्त GST एक्साम्प्टेड वस्तूच विकू शकाल. पण हे रेस्ट्रिक्शन ठेवायचे नसेल तर GST नम्बर काढून ठेवावा.

Amazon Seller Marathi

GST एक्साम्प्टेड कॅटोगेरी मध्ये विक्री करण्याचे ऑप्शन जर तुम्ही निवडले तर तुम्हाला फक्त तुमचा पॅन नम्बर विचारला जाईल.

म्हणजे बँक अकाउंट डिटेल्स तेवढे द्यायचे.

Amazon-seller-marathi

याशिवाय तुमच्या शिपिंग फी चा प्रेफरन्स काय याबद्दलची माहिती अपडेट करून लाँच करून टाकायचं आपलं दुकान. ज्या वेळी तुमचं मोटिव्हेशन शिगेला पोहोचलेलं असेल ते खरं मुहूर्त बरोबर ना!!

all-the-best

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

3 Responses

  1. मी श्री गंगाराम सावंत मे मछिंद्रनाथ क्रेडिट अँड रेसोलुशन प्रायव्हेट लिमिटेड ही बँक कर्ज वसूली व बँकेत तारण असलेल्या मालमत्ता न्यायालयीन आदेशाने ताब्यात घेऊन सदर बँकेला वसूली साठीमदत करण्यासाठी गेली 11 वर्ष काम करतोय… तर मला सांगावेसे वाटते की आम्ही ताब्यात घेतलेल्या मालमत्ता बँक लिलाव काढून विकते तरी सदर मालमत्ता बाजार भावाच्या कमी दरात मिळते तरी कोणी स्वतः व नातेवाईकांना इच्छा असेल तर कृपया मला संपर्क करू शकता
    9820886661/8850290923

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!