Author: आदित्य कोरडे

काश्मीर

काश्मीर – धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही – भाग ३

विलीनीकरण झाल्यावर आणि भारतीय सैनिकांनी रक्त सांडल्यावर काश्मीर पाकिस्तानात जाणे शक्य नाही, ते स्वतंत्र होणे हि शक्य नाही हे वास्तव शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या काश्मिरी जनतेने आंधळेपणाने नाकारले, काश्मीर भारतापासून तोडणे कालत्रयी शक्य नाही हे पाकिस्तानने कधी समजून घेतले नाही, आणि काश्मिरी लोकांना पूर्वीही आणि आजदेखील भारतात राहायचे नाही हे भारतीय जनतेला कळत नाही.

शाकाहार मांसाहार

शाकाहार विरुद्ध मांसाहार…. हि तर फक्त खाद्यसंस्कृती!! खा आणि खाऊही द्या.

आम्ही पूर्ण पणे Vegetarian आहोत असे म्हटले तर मग दुध, तूप, लोणी, मध असे प्राणीजन्य पदार्थ खाणं टाळावे लागेल. आश्चर्य म्हणजे आपल्या धर्मात ह्या गोष्टी उपासाला देखील चालतात. अन्न हे फक्त पोषक द्रव्याची सरमिसळ न राहता ते माणसाच्या जीभ, नाक, डोळे, त्वचा अशा सर्व संवेदनांना उद्दीपित करणारा उच्च प्रतीचा शृंगार बनून जातो. इतर कोणत्या प्राणीमात्रात हे आढळते?

पहिले महायुद्ध

पहिले महायुद्ध! (प्रशियन युद्ध ते राणी विक्टोरियाचा इंग्लिश द्वेष्टा नातू कैसर विल्हेल्म दुसरा)

मात्र ह्या जर्मनीचा एक मोठा प्रोब्लेम होता. अक्ख्या युरोपात तो एकटा पडू लागला होता. वर्गात मध्येच नवीनच दाखला घेतलेल्या हुशार मुलाकडे जसे सगळे संशयाने पाहतात आणि सुरुवातीला त्याला सवंगडी मिळायला त्रास होतो तो एकटा पडतो तसे त्याचे झाले होते. पश्चिमेला असलेला फ्रांस तर त्याचा आधी पासूनचा वैरी.

पहिले महायुद्ध

पहिले महायुद्ध!….. संघर्षाचा आरंभ

यंदा म्हणजे २०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण होताहेत. त्यानिमित्त ही लेखमाला, त्या महान घटनेचा हा संक्षिप्त इतिहास…. ११ नोव्हे १९१८ रोजी सकाळी ११ वाजायला एक मिनिट बाकी असताना हेन्री निकोलस जॉन गुंथर हा अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगनच्या माऱ्याला बळी पडला. आश्चर्य असे कि तो जन्माने जर्मन-अमेरिकन होता.

आपण स्वप्न का बघतो.....

आपण स्वप्न का बघतो….. स्वप्नात पूर्वसंकेत मिळतात का?

आता स्वप्नांबद्दल एव्हढे लिहिल्यावर  DeJaVu ह्या प्रकाराबद्दल काही लिहिणे क्रमप्राप्त आहे……..काही जणांना हा दे-जा-वू  काय प्रकार आहे हे माहिती नसेल. म्हणजे अनुभव बहुतांश सगळ्यांना असतो फक्त त्याला दे-जा-वू म्हणतात हे माहिती नसते. तर ह्यात होतं काय, कि एखादी घटना, अगदी साधी सुधी घटना घडताना आपण पाहत असतो आणि अचानक असं आठवायला लागतं कि हे सगळं पूर्वी कधी तरी घडलंय…..

aarakshan

आरक्षण -भूमिका आणि गरज!

दारिद्र्य, विपन्नावस्था, गुलामी, मागासलेपणा हि तितकी भयानक गोष्ट नाही जितकी ‘आपण दारिद्र्यात, गुलामीत आहोत आणि आपल्याला यातून हरप्रयत्नाने बाहेर पडलेच पाहिजे हि जाणीवच नसणे’ हि आहे. आपल्या समाजातला एक फार मोठा वर्ग पिढ्यानुपिढ्या सामाजिक, धार्मिक गुलामीत, दारिद्र्यात, अज्ञानात खितपत पडला आहे.

पानिपतची लढाई

पानिपतची (न झालेली) ४थी लढाई….

इंग्रज इथून गेल्यावर त्यांचे उत्तराधिकारी कोण होणार? त्यांच्या नंतर भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर सत्ता कुणाची येणार? असे प्रश्न समोर येऊ लागले होते. त्यातच हा देखिल ऐतिहासिक प्रश्न समोर आला कि ब्रिटीशांनी हा देश नक्की कुणाला हरवून काबीज केला? ह्याचे स्पष्ट, सरळ असे एकच एक उत्तर नव्हते. हिंदू लोक मुसलमानांची शेकडो वर्षांची सत्ता झुगारून देण्याच्या प्रयत्नात असताना आणि त्यात त्याना यश येऊ लागले असतानाच  ब्रिटीश इथे आले. असे बहुसंख्य हिंदूंचे मत होते

plauge rand

प्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक-बदनामीचे नवे षडयंत्र!

टिळकांनी सुरुवातीला जनतेला सरकारला ह्या कामी सहकार्य करावे असेच आवाहन  केलेले आढळते, तसेच एवढे पुरेसे नसून ह्या संसर्गवर्जक तळावरील लोकांची आबाळ होऊ नये म्हणून त्याचे व्यवस्थापन पालिकेकडे असावे म्हणून मुंबई राज्याचे गवर्नर लॉर्ड सँडहर्स्ट  ह्याना अर्ज दिला होता. तो अर्थात मान्य झाला नाही.

dattakprakriya kashi aste

दत्तकप्रक्रियेतले वास्तव…. मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया सोपी कधी होणार?

मूल दत्तक घेणे हा एक मूर्खपणा खरंतर नाही. पण तयारी नसताना मूल दत्तक घेणे हा ठार मूर्खपणा आहे. म्हणजे समुद्रात पोहायला जाणे हा मूर्खपण नाही पण पोहायला येत नसताना पोहायला जाणे हा नक्कीच मूर्खपणा आहे. आमच्या आयुष्यात मिहिका आल्यापासून ती आमची जैविक (कसला भंगार शब्द आहे का – Biological Child जरा तरी बरं आहे.) मुलगी नाही हे जणू विसरूनच गेलो आहोत.

gurudatta

गुरुदत्त!!

गुरुदत्त म्हटलं कि ज्यांना त्याच्याबद्दल फारसं काही माहिती नसते असे लोक त्याने आत्महत्या का केली असावी? यावर गप्पा मारू लागतात. आत्महत्या करणे हा भ्याडपणा कि नैराश्याचा अतिरेक? तुम्ही गुरुदत्तच्या आत्महत्येला काय वाटेल ते नाव द्या. मुळात ती आत्महत्या होती कि अपघात यावरच एकमत नाही.

error: © Copyrights 2022. All rights reserved!