कौल
तुझे नाव तर मी त्याच दिवशी टाकले ज्या दिवशी तू निघून गेला होतास. पण तू येशील अशी आशा होती मनात. पुढल्या आठवड्यात देवगडातून पत्र आले. आणि आश्चर्य म्हणजे आंतरदेशीय पत्रात एक फोटो सुद्धा होता. आम्हा सगळ्यांसाठी हे नवीनच होतं.

जमलीच तर स्वतःची नाहीतर बिनधास्त चोरलेली एखादी सुंदर कविता किंवा चारोळी लिहावी आणि एखाद्या सुरेख पाकिटात अत्तर शिंपडावं आणि बंद करून पाठवून द्यावं, खरंच प्रत्येकाने एकदातरी एखादेतरी प्रेमपत्र लिहावं… मग अगदी स्वतःच्या नवऱ्याला किंवा नवऱ्याने बायकोला ! कदाचित वेडेपणा वाटेल हे सगळं करण्याचा. पण हा वेडेपणा आनंद देणारा असेल एवढं नक्की.
मी फारसा फुडी, फूड फ्रिक वगैरे नाही. पण रसिक आणि आस्वादक आहे. समोर आलेली थाळी प्रेक्षणीय असावी एवढाच आग्रह! आणि या कसोटीवर आबाच्या थाळीने बाजी जिंकली!! थाळी टेबलवर येताक्षणी धनगरी चिकनने भरलेल्या छोट्या डिशवर दरवळणाऱ्या सुगंधाने दिल खुश केलं. आणि पहिली खात्री पटली की अगदीच काही अंदाज चुकलेला नाहीये.