Author: दासू भगत

दासू भगत

लेखक दासू भगत यांनी सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् मधून कला शाखेतील पदवी घेतलेली आहे. १९७२ ते १९८० या काळात हंस, नवल, सारीका, अस्मितादर्श, पूर्वा, मराठवाडा, अबकडई, इत्यादी विविध मासिकांसाठी रेखाटने. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत कला दिग्दर्शक म्हणून काही काळ काम. १९९१ पासून औरंगाबाद येथे “दैनिक मराठवाडा” या दैनिकातील कला विभाग प्रमूख म्हणून ते काम बघत. सध्या दैनिक दिव्य भारती मध्ये सम्पादकीय विभागात काम करतात.

0

हिंदी चित्रपटातील दिवाळी ची गीते

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवाळीची गाणी भरपूर आहेत. मी फक्त काही नमूने लेखासाठी घेतले. या लेखाचा समारोप करताना माझ्या ओठावर एक गाणे मात्र प्रकर्षाने रेंगाळतयं. खरे तर हे दिपावलीचे गाणी नाही आहे. मात्र यात एक सार आहे माणसाला जोडण्याचं…

मन्ना डे 0

मन्ना डे यांच्या गायकीची सुरेल सफर….

लहानपणी बाराखडी तर तुम्ही आम्ही सगळेच शिकलो. ‘अ’ अननसाचा (पुस्तकातील अननस प्रत्यक्ष बघायला २०-२२ वर्षे जावी लागली हे अल्हिदा), ‘क’ कमळाचा, ‘ज्ञ’ यज्ञाचा, ‘ब’ बाणाचा वगैरे वगैरे. अगदी रटाळ अन् निरस बाराखडी. मग मन्नादाची बाराखडी आली- “अ.. आ.. आई.. म म.. मका… मी तुझा मामा अन् दे मला मुका.’’

पहिली स्त्री दिग्दर्शिका 0

भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली स्त्री दिग्दर्शिका : फातमा बेगम

सचिन संस्थानाच्या मुस्लिम नवाबाची मुलगी हैद्राबादच्या हिंदू महाराजाची पत्नी झाली. फातमा बेगमला मलिका म्हणून नाही न्याय मिळाला मात्र मुलीला ती प्रतिष्ठा मिळाली. संजय दत्त यांची दुसरी पत्नी मॉडेल रिया पिल्लाई ही याच झुबेदाची नात आहे.

0

जिया बेकरार है…..हसरत जयपूरी

७० चे दशक येई पर्यंत जयकिशन, शैलेंद्र कायमचे निघून गेले. राजकपूरची पूढची पिढी या क्षेत्रात आली. जयकिशनच्या अचानक जाण्याने हसरत मूक झाले. त्यात आरकेचा “मेरा नाम जोकर” बॉक्स ऑफिसवर सपशेल कोसळला. चारपाच वर्षांनी मुकेश यानीही एक्झिट घेतली. आरकेच्या ताफ्यात “बॉबी”च्या निमित्ताने लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार आनंद बक्षी सह दाखल झाले

शैलेंद्र 0

किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार…… शैलेंद्र

आता मुंबईचे समुद्र किनारे घाणीने गिळंकृत केले आहेत. किनाऱ्याकडे फेसाळत येणाऱ्या लाटांमध्ये मानवी प्रगतीचा अहंकार व दर्प ये जा करतो. समुद्राची गाज तर कोलाहलात कधीच विरून जाते. मात्र ५० च्या दशकात हा समुद्र असा नव्हताच मुळी. जुहूच्या समुद्र किनाऱ्याची ओढ असलेला एक तरूण सकाळीच घरा बाहेर पडायचा.

manache talks 0

कर भला तो हो भला : कन्हैयालाल

कोणत्याही कलेचा भूंगा एकदा का डोक्यात गेला की तो मेंदू सतत कुरतडत असतो. पंडित चौबेजीच्या एका मुलाने मुंबईची वाट धरली मग या दुसऱ्याला कसे बांधून ठेवणार? सुरूवातील किराणा दुकानात बसवून बघितले पण याच्या डोक्यात वेगळेच “किराणा” घराणे !!! नाटक, संगीत, लिखाण या त्रयीने याचा ताबा घेतला. “पंधरह अगस्त्” या नावाचे एक नाटक लिहून त्याने ते बसवले.

0

आणि प्रेतातील वेताळ म्हणाला……….. कहाणी चांदोबाची

दोघेही कल्पक आणि प्रतिभावान… त्यांच्या या छानशा कल्पनेच्या बाळाचं नाव होतं- “अंबुली मामा” जुलै १९४७ रोजी या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. हेच चांदोबा पुढे १२ भारतीय भाषा आणि इंग्रजी अशा एकूण १३ भाषेत प्रकाशित झाले.

संजीव कुमार 0

हरीहर जेठालाल जरीवाला म्हणजे, संजीव कुमार चा चित्रपट प्रवास वाचा या लेखात

हरीहर जेठालाल जरीवाला हे त्यांचे मूळ नाव. हे गुजराती कुटूंब मुंबईचेच. वडील जरीचा व्यवसाय करीत म्हणून जरीवाला. त्यांच्या कुटूबांत काही विचित्र योगायोग घडले होते….. ‘कुटूंबातील मोठ्या मुलाचा मुलगा १० वर्षांचा झाला की वडीलांचा मृत्यू होत असे’ त्यांच्या आजोबा, वडील आणि भावा सोबत असे घडले होते. जरीवाला कुटूंब तसे गरीबच होते.

pt.hariprasad chaurasiya 0

दरी दरीतुन घुमू दे पावा…….

बांबू हे खरे तर अतिशय जलद गतीने वाढणारे गवत आहे. पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या हवामानांशी व पर्यावरणांशी जुळवून वाढणार्‍या या बांबूच्या जवळ जवळ १४०० जाती आहेत. बांबूच्या काही जातींची दिवसाला दोन ते तीन फुटांपर्यंतही वाढ होऊ शकते. याचे महत्व ज्या क्षणी मानवाला समजले तेव्हा पासून आमच्या जीवनात बांबूने असे स्थान पटकावले की आम्हाला शेवटच्या प्रवासातही याचीच साथ लागते.

0

मेरी दोस्ती मेरा प्यार….

सुधीर कुमारचे पूर्ण नाव सुधीर शंकर सावंत.लालबाग मधील जुन्या हाजी कासम चाळीत रहायचा. लालबाग परळ या मुख्यत्वे गिरणी कामगार मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या परीसरात सुधीर मोठा झाला. आई वडील आणि मोठी बहिण शोभा व लहान बहिण चित्रा असे चौकोनी कुटूंब.