Author: किरण कृष्णा बोरकर

रक्षाबंधन

असेही रक्षाबंधन….

आज रक्षाबंधन होते तेव्हा नक्षलवाद्यांचा म्होरक्या माखन बहिणीला भेटायला येणार याची खबर तिला मिळाली होती आणि म्हणून आपल्या वीस साथीदारांसह रात्रीपासून त्याच्या वस्तीजवळ दबा धरून बसली होती.

Marathi Lalit lekh

गणेशाचे दुखणे

“काही वर्षापासून खाली जाऊच नसे असे वाटते. हल्ली काहीजण दोन तीन दिवस आधीच मला न्यायला येतात… का ….?? तर म्हणे ट्रॅफिक असतो आणि मग मनासारखे नाचायला मिळत नाही. अरे… तुमच्या समाधानासाठी मला हि शिक्षा का…??

manachetalks

दिवस

“ठीक आहे….. मी शोध घेतो आणि काही महिन्यासाठी तुमची बदली करतो. पण लक्षात ठेवा जिथे जाल तिथे नीट वागा. परवा एकाची बदली केली तो एका घरी सकाळी सहा वाजता जाऊन काव काव करू लागला तेव्हा वहिनीने गरम पाणी अंगावर ओतले त्याच्या…

ती आणि राखी

ती आणि राखी

आज चांगलाच मूड बनवून त्याची पावले तिकडे वळली. नवीन पाखरू आल्याची साखरबातमी त्यालाही कळली होतीच. तिला बघायला, स्पर्शायला तो आतुर झाला होता. नेहमीप्रमाणे ऍडव्हान्स देऊन तो तिच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. तेवढ्यात कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र आवाजाने दार उघडले तसे त्याचे डोळे चमकले.

सुखी संसार

‘हाऊसवाईफ’ जशी असते तसा हा प्रसाद आहे ‘हाऊस हसबंड’

आमचे प्रश्नार्थक चेहरे पाहून तो हसला “माझे लग्न ठरले ते इंटरनेटवर. बायको डॉक्टर आहे..… म्हणजे शास्त्रज्ञ आहे….. खूप शिकलेली आणि सतत अभ्यासाच्या आणि संशोधनाच्या मूडमध्ये… तिने लिहिले होते मला सहकारी हवाय जो माझ्या गरजा भागवू शकेल…… मला मदत करेल…. संसारात मला बायकोची भूमिका पाळणारा नवरा पाहिजे.

Janaaji

जनाआजी……

कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या आपल्या बहिणीला त्याने फोन केला तेव्हा तीही म्हणाली “अरे असे कसे अचानक झाले ….?? तुला आधी कळवता येत नाही का…. ?? लक्ष कुठे असते तुझे आईकडे ..?? काहीतरी लक्षणे आधी दिसत असतील ना ..?? मला किती त्रास होईल आता येताना. काही घडले तर माझ्यासाठी खोळंबून राहू नका ह्यांच्या मीटिंग आहेत, आणि मलाही सुट्टी मिळणार नाही. आम्ही आताच सुट्टी घेऊन अमेरिका फिरून आलो. काळजी घे आईची “, असे म्हणून फोन ठेवला.

malika

मराठी मालिका

रात्रीचे दोन वाजलेत माझा दारावरची बेल वाजली म्हणून मी घाईत दरवाजा उघडला तर समोर विक्रम उभा. अर्थात स्वारी फुल होती ते सांगायलाच नको. “बायको घरात घेत नाही म्हणून तुझ्याकडे आलो. बाहेर झोपतो सकाळी जाईन.” असे म्हणत आत शिरला.

dut

दूत

“फार काम नाही राहिले इथे. सिरीयस लोक येतात पण अत्यानुधिक उपकरणे. मनापासून मेहनत करणारे डॉक्टर्स आणि नवीन औषधे यामुळे बऱ्याचदा माणूस वाचतोच. त्यामुळे घेऊन जायला फारच कमी माणसे असतात. काल तर मोजून दोन जण सापडले त्यातही एक म्हातारा…. कितीतरी दिवस त्याचे नातेवाईक विनवणी करत होते घेऊन जा घेऊन जा..

sainik

सैनिक

“काय बोलायचे …..??? पहिल्याने शांतपणे विचारले. ह्या एसीबद्दल बोलू. राजस्थानमधील वाळवंटात ४६℃ हातात ऐ. के. ४७ घेऊन दोन दोन दिवस उभा राहिलोय मी… ह्यापेक्षा भीषण गर्मी तुम्ही अनुभवली आहे का…. ??? मी नुकताच सियाचेनमधून येतोय. तीन महिने सीमेच्या रक्षणासाठी होतो तिथे. उणे १५℃ वातावरण होते. चहूकडे बर्फच बर्फ. हरवून जाऊ नये म्हणून एकमेकांच्या कमरेला दोरी बांधून होतो. समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट बर्फात उभे होतो.

Target Marathi Humar

Target पूर्ण का होत नाही …..?

“इतकेच नव्हे साहेब…. तर जुने काही भयानक आजार नष्टच झाले आहेत. त्यावर तर जन्माला आल्याबरोबरच औषध निघाली आहेत. शिवाय आपण नवनवीन रोग काढले तर त्यावरही उपाय निघाले आहेत. हल्ली तर जुने अवयव काढून त्याजागी नवीन अवयव ही बसविता येतात”.

error: © Copyrights 2023. All rights reserved!