Author: Dr. Mangesh Desai

संक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार

संक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार

टीप :- हा लेख कोरोना विषाणूच्या साक्षात उपचाराचे मार्गदर्शन करणारा नसून स्वतःची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व स्वस्थ राहण्यासाठी मार्गदर्शन पर आहे. आयुर्वेदात व्हायरल आजारांसाठी केली गेलेली उपाययोजना यात सांगितलेली आहे. येथे दिलेली माहिती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय म्हणून नाही, कृपया वाचकांनी याची नोंद घ्यावी.

कोण म्हणतं आयुर्वेदात उशीरा गुण येतो?

कोण म्हणतं आयुर्वेदात उशीरा गुण येतो?

सर्दि, खोकला, जुलाब, ताप यांसारख्या आजारांसाठी सुद्धा रोगी जेव्हा वैद्याकडे विश्वासाने किंवा आशेने येतात. तेव्हा खरच त्यांचा गौरव करावासा वाटतो. कारण अशा रुग्णांमुळे आयुर्वेद केवळ जुनाट आजारांवर व स्लो परिणाम देणारे शास्त्र आहे, हा धब्बा पुसण्यासाठी आम्हा वैद्यांना एक सुवर्णसंधी लाभते.

तुमच्या लहान बाळाला भरवताना

तुमच्या लहान बाळाला भरवताना त्याच्या हातात मोबाईल देता का तुम्ही?

बाळाला खेळवायलाही घरात दुसरे कोणी नसल्याने जरा खाऊ घालताना बाळ रडु लागले की यु ट्यूबवर बाळांसाठीच्या गाण्यांचा व्हिडियो लावून, कसेतरी त्याचे मन रमवून त्याला चार घास भरवणे, अशी एकदा योजलेली युक्ती कधी नेहमीचीच सवय होउन जाते, कळतही नाही

घरगुती उपचार

स्वतः केलेले घरगुती उपचार सुद्धा बाधक कसे ठरू शकतात ते वाचा या लेखात

आजीबाईचा बटवा म्हणून घरगुती औषधे नको तेव्हा सल्ल्याविना करत बसू नका. वैद्यांनीही उपचार सांगणारे लेख लिहू नयेत असे मला वाटते, याने आपणच भोंदू वैद्य निर्माण व्हायला खतपाणी घालतो. कोणतेही आयुर्वेदिक औषध विना प्रीस्क्रिप्शन आपल्याकडे मिळू शकते, अगदि चाॅकलेट-गोळी मागावी तसे – हिच परिस्थिती बदलायला हवी.

केस

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी रोजच्या रोज ही काळजी घेतलीच पाहिजे

(कारण कुरळे केसवाल्यांना सरळ केस आवडतात, काळे केसवाल्यांना तांबडे केस आवडतात, अशी एकंदर तर्‍हा ! हे म्हणजे सोलापूरात भाताचे पिक नि कोकणात निवडुंगाचे पिक घेण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे केसांचे स्वरूप असते. ते काही कालावधीसाठी बदलायचा प्रयत्न करण्याऐवजी ते मूळ स्वरुप आपल्याला आवडायला हवे.) अशी अनेक कारणे केस गळतीस कारणीभूत होतात.

नवीन वर्षाचा संकल्प

नवीन वर्षाचा संकल्प करा आरोग्यासाठी या सवयी लावण्याचा

ज्यांच्यात शारीरीक किंवा मानसिक आळस ठासून भरलेला असतो त्यांनी गजर लावून घड्याळ किंवा मोबाईल लांब ठेउन द्यावा नाहितर सकाळी मला उठवले का नाहिस, गजर कोणी बंद केला म्हणून ओरड सुरु होते, गजर तर महाशयांनी स्वतःच बंद केलेला असतो !

आयुर्वेद

सवयी बदला तरच आरोग्य सुधारेल

एखादी सवय सोडल्याने विना औषधी आजार बरा होईल असे सांगितले तर काही जण, “पण हे काही आपल्याच्याने जमायचे नाही” असे म्हणतात.

indian diet

प्रमाणात जेवण्याचे महत्त्व….

सर्वत्र गोंधळ निर्माण करणारी अवस्था असताना! मग अशा वेळी आपल्या शरीराचा (अग्निचा/भूकेचा) आवाज ऐका तो बरोबर भूक असेल तेव्हा मागतो, नको असेल तेव्हा मागत नाही, आपले चुकते कोठे तर आपण  जिभेच्या चोचल्यांच्या आहारी जातो, ते थांबवायला हवे.

diet

अन्नसेवन करताना पंचज्ञानेंद्रिये सहभागी असल्यास असे नेमके काय होते बरे?

पंचज्ञानेंद्रियांच्या सहभागाने मूळात आपण जेवायला बसलो आहोत याची जाणीव अंतर्मनापर्यंत व पर्यायाने निगडीत यंत्रणांपर्यंत पोहोचते, त्यामुळे अन्नावर रुचि उत्पन्न होते, लाळ निर्माण होते.

diet

अन्नसेवन करताना पंचज्ञानेंद्रियांचा सहभाग असावा….

त्वचेने अन्नाचा स्पर्श अनुभवावा अर्थात यावरून तुम्हाला कळाले असेलच कि चमच्याने का खाऊ नये. आपल्या भारतीय पद्धती शास्त्रीय असून त्या पाश्चात्य प्रभावाने सोडून आरोग्याच्या मैलोदूर आपण जात आहोत हा ऊलटा प्रवास लवकर थांबवायला हवा अन्यथा विनाश अटळ आहे!

error: © Copyrights 2022. All rights reserved!