Author: शब्द तुझे नि माझे

शब्द तुझे नि माझे

आमचे किस्से, कथा, कविता, पत्रं आणि असंच काहीसं..

मराठी भयकथा 0

ती कोण होती? (मराठी भयकथा)

अंबरनाथला पोहोचायला संध्याकाळचे ७ वाजलेच. असे संध्याकाळी काम आले की खूप चिडचिड होते. स्टेशनच्या बाहेरच असलेल्या बँक ऑफ बडोदा च्या ए.टी.एम.मध्ये आलो आणि बघतो तर सॉफ्टवेअर गेलेलं. कायतरी लहानसं काम असेल आणि १५ मिनिटात करून निघेन अशा विचाराने मी आलेलो आणि ते बघून अजूनच डोकं फिरलं.

संगीत देवबाभळी 0

संगीत देवबाभळी: एक विलक्षण अनुभव.

तुकारामांची पत्नी, आवली, पांडुरंगाचा पराकोटीचा द्वेष करणारी. ह्या आवलीच्या पायात देवबाभळीचा काटा रुततो आणि साक्षात पांडुरंग तो काटा काढायला येतात, इतकंच नाही तर त्यांच्या पत्नीला, रखुमाईला, आवलीची जखम भरेपर्यंत तिच्या घरात राहायला पाठवतात अशी ही गोष्ट.

अबोली 0

अबोली – भाग २

खरंतर लगेचच मागे वळायचा विचार होता. पण राहवलं नाही म्हणून तुमच्या फटकापाशी आलो, जरा लांब ऊभा राहूनच तुझ्या सगळ्या रंगांना डोळ्यांत साठवलं आणि परत फिरलो तोच एक नाजूक हाक ऐकू आली, “काका! रंग?”

अबोली 1

अबोली

एकदा तुमच्या आवळ्याच्या झाडाचे आवळे काढले होते आणि तू थोडे आवळे एका पानात गुंडाळून फाटकाच्या बाहेर ठेवलेस, मला बरोबर ते कळलं कारण शाळा सुटायच्या वेळेस मैत्रिणीशी काहीतरी कुजबुजत होतीस आणि माझ्या समोरून जाताना बरोबर “आवळे पानात गुंडाळून ठेवायचे.”

खतखतं 1

खतखतं

“स्वयंपाकघरात यायस सुद्धा आमंत्रण लागते महाराणीस म्हटले. माझेच चुकले, नारळ –पत्रिका घेऊन जायस हवे होते मीच आमंत्रण द्यायला की ये बाय घरात ये जरा काय तरी हातबोट लाव कामास, म्हातारी सासू करते ते नुसतं बाहेर तरी आणून दे”

भय कथा 0

चकवा

जाऊदे कुलकर्ण्यांना काही विचारलं तर उगीच भिशीच्या बायकांमध्ये जाऊन गॉसिप करतील की रेखा देसाईला काहीही आठवत नाही. त्यांच्याकडे बघून हसून मी आत जायला निघते. नवऱ्याला पुन्हा फोन लावते. परत तीच रेकॉर्डिंग.

स्वातंत्र 0

स्वातंत्र

बाई माझ्या नजरेला नजर न मिळवता बोलल्या. खाली यायच्या गडबडीत त्यांच्या नवीन टी शर्टचा प्राईज टॅग त्या काढायला विसरल्या होत्या हे माझ्या आता लक्षात आल. तो गळ्यात मंगळसुत्रासारखा लोंबणारा प्राईज टॅग त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल मला ओरडून ओरडून सांगत होता.

भास 0

भास

अंगणाला ‘अंगण’ न म्हणता तू ‘गार्डन’ म्हणायचास. माझ्या अंगणातल्या कमळाच्या छोट्या तलावाची हौस मी तुझ्या गार्डनमधल्या ‘स्विमिंग पूल’मध्ये भागवली होती. त्याबाजूला तू दोन खुर्च्या ठेवल्या होत्यास, झोपून बसल्यासारखं बसायला. तुला तिथे बसून राहायला आवडायचं आणि मला पूलमध्ये पाय टाकून.

प्रेम 0

वळण (कथा- प्रेम, धोका आणि पुन्हा निखळ प्रेम)

मला फक्त मधुराने माझ्याकडे बघणं हवं होतं. ती बघे-पर्यंत मी कसलीच तमा न बाळगता तिच्याकडे बघत राहिलो, शेवटी गेलीच तिची नजर माझ्याकडे आणि मागासपासून अडवून धरलेल्या अश्रूंना जणू वाहून जायला अजून एक कारणच मिळालं. तिला अजून हिणवायला मी तिच्या नवऱ्याच्या दिशेने मान हलवत पूनमच्या हातात माझा हात गुंफला आणि दुसऱ्या हाताने तिला हात दाखवला.

सावज 0

सावज

“ येऊ का? ”…… पांडूने सगळा धीर गोळा करून “ये” असं उत्तर दिलं आणि त्याला जमिनीच्या खाली कसलीतरी हालचाल जाणवली. जमिनीच्या खालून काहीतरी त्याच्याकडे आलं होतं. पांडू घराच्या बाहेर आला ती हालचाल त्याला जाणवत होती. काहीतरी जमिनीखालून त्याच्या मागे येत होतं. तो झपझप पावलं टाकत घराकडे निघाला. ती जमिनीखालची सळसळ त्याला घाबरवत होती. त्याने अंगात घातलेला शर्ट घामाने पूर्ण भिजला होता, हातपाय कापत होते.