Author: पंकज कोटलवार

पंकज कोटलवार

लेखक व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. जीवनातील बर्‍यावाईट घटनांवर, आठवणींवर आणि अनुभवांवर लेख लिहण्याची त्यांना आवड आहे. रोजच्या जीवनातल्या, आजुबाजुला घडणार्‍या घटनांमध्ये, छोट्यामोठ्या प्रसंगामध्ये, आयुष्याचे बहुमुल्य धडे लपलेले असतात, यावर त्यांचा विश्वास आहे, असे हलकेफुलके प्रसंग आणि त्यातुन आयुष्याला समृद्ध करणारे, लपलेले नवनवे अर्थ शोधुन, त्यांची नर्मविनोदी शैलीत मांडणी करणं, हा त्यांचा आवडता छंद आहे...... तसेच ते मोटिव्हेशन संदर्भात व्हाट्सअप वरती काही कोर्सेस घेतात. त्यासाठी अभिप्रायातून त्यांना सम्पर्क करता येईल.

प्रेरणादायी कहाणी 0

रॉबर्ट मॅनरी – स्वप्नांच्या सफारीवरचा खराखुरा खलाशी ! एक प्रेरणादायी कहाणी

त्या दिवशी एक वेगळ्याच प्रकारची छोटीशी, पिटुकली, बोट फालमाऊथ ह्या ठिकाणी मॅसुच्युसेटस समुद्रकिनार्‍यावरुन इतर महाकाय बोटींच्या ताफ्यातुन निसटली आणि मोकळ्या समुद्रात घुसली. त्या बोटीवर रॉबर्ट मॅनरी हा एकटाच होता. कोण होता हा रॉबर्ट मॅनरी? आणि आपली लाकडाची रंगबेरंगी, पण विलक्षण देखणी बोट घेऊन तो कोणत्या प्रवासावर निघाला होता?

मराठी प्रेरणादायी लेख 1

दुःख मिटविण्याचे सात सोपे उपाय – मराठी प्रेरणादायी लेख

कमी अधिक प्रमाणात का असेना, पण आपण सगळेच जण आपल्या आयुष्यात कसल्या न कसल्या कठिण प्रसंगाना रोजच सामोरे जात असतो, कोणी दाखवतो, कोणी मनातल्या मनात ठेवतो, इतकचं! कितीही वाईट प्रसंग असला तरी आपण आपला तोल ढळु न देता, आनंदी, हसतमुख राहु शकतो, त्यासाठी एक खास प्रकारचं ट्रेनिंग मनाला आवश्यक असतं.

नवरा-बायको 0

नवरा-बायको मधल्या छोट्या छोट्या कुरबुरी मिटविण्याचे काही उपाय वाचा या लेखात

माझं माझ्या लाईफ पार्टनरशी जमत नही, अशा प्रकारच्या प्रश्णावर माझ्याकडे एकच उत्तर आहे. “प्रेम करा, अजुन प्रेम करा, अजुन खुप खुप खुप प्रेम करा,“ इतकं प्रेम करा की, केलेलं प्रेम हजार पटीने चक्रवाढ होवुन आपल्या कडे वापस येईल. मनं मोकळी होतील.

श्रीमंतीकडे वाटचाल 0

हे सात धडे गिरवले तर तुमची श्रीमंतीकडे वाटचाल निश्चितच होईल!!

मोक्ष प्राप्त केलेल्या, समाधीअवस्थेत पोहोचलेल्या ज्ञानी महापुरुषांना, किंवा पैशाची किंमत न समजणार्‍या निरागस बाळाला सोडलं तर, ह्या जगात प्रत्येकालाच आता आहेत त्यापेक्षा जास्त श्रीमंत व्हायला आवडत असतं! त्यासाठीच तर आपली सकाळपासुन संध्याकाळपर्यंतची धावपळ चाललेली असते, पण तरीपण प्रत्येकजण हवा तेवढा श्रीमंत का होत नाही?

मनाचं कम्प्युटर 0

इनपुट – प्रोसेस – आउटपुट यावर चालणारं आपल्या मनाचं कम्प्युटर

मन आणि कॉम्पूटर दोघांमध्ये खुप साम्ये आहेत. दोघेही प्रचंड शक्तीशाली आहेत, बुद्धीमान आहेत. दोघांमध्ये अफाट स्मरणशक्ती आहे. तसेच कल्पनाशक्तीही आहे. यांचा नीट वापर केल्यास प्रचंड सर्जनात्मक काम यांच्याकडुन काम करवुन घेता येते. यांचा नीट वापर न केल्यास प्रचंड संहार आणि विध्वंसही घडवुन आणला जावु शकतो.

Law of Attraction 0

मनातली फिल्म साकारणारा Law of Attraction चा कोर्स

Law of Attraction चा नवीन कोर्स ५ फेब्रुवारी २०१९ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीसाठी सुरु होत आहे. कोर्स ची फी रुपये ५००/- फक्त असून बँक डिपॉजिट आणि PayTM द्वारे फी जमा करता येईल. अधिक माहितीसाठी ८३०८२४७४८० या व्हाट्स एप नम्बर वर ‘LOA कोर्स’ असा मेसेज पाठवा.

प्रेरणादायी लेख

प्रेरणादायी लेख-नैराश्य घालवून आनंदाने जगण्याचे हे सहा नियम नक्की वाचा!!

ही निराशा पण डीसेंट्रीसारखी असते, ती यावी असं कुणालाच वाटत नाही, पण तिच्या येण्यावर कुणाचंच नियंत्रण नसतं. अशाच किंवा कसल्याही कारणाने तुम्ही नैराश्याचे डिप्रेशनचे शिकार झाला असाल, तर खालील उपाय वापरुन तुम्हीसुद्धा जगातली सर्वात जास्त आनंदी व्यक्ती बनु शकता.

अपमान 0

अपमान पचवण्याचे पाच उपाय!!

कुठल्याही मानसिक युद्धामध्ये, तिच व्यक्ती जिंकते, जी शत्रुपेक्षा मनाने अधिक शक्तीशाली, जास्त संयमी आणि तेवढीच बेफिकीर असते. जे लोक छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावुन घेतात.

सिडने शेल्डन 0

वाचा हॉलीवुडचा कथाकार सिडने शेल्डन च्या आयुष्याची प्रेरणादायी कथा

एके दिवशी तो आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो, आणि झोपेच्या गोळ्या चोरतो, तो आत्महत्या करणार इतक्यात योगायोगाने त्याचे वडील त्याच्या बंद खोलीचे दार उघडतात आणि त्याच्यासोबत एका इव्हनिंग वॉकला जातात. बोलता बोलता त्याच्या मनात स्वप्नाचं बीज पेरतात.

मनोविकार 0

मनोविकार आणि शारीरिक विकार यांचा संबंध आणि त्यांचा सामना कसा कराल

मित्रांनो, आपलं आयुष्य एका राजाच्या तालावर नाचतं, आणि ते म्हणजे आपलं मन! आपण प्रत्येकजण आपल्या मनाचे गुलाम असतो. असं तुमच्यासोबत होतं का, की सगळं काही अगदी छान चाललेलं असतं आणि अचानक आपल्याला उदास उदास वाटु लागतं? तर मग हा लेख नक्की वाचा.