Author: पंकज कोटलवार

पंकज कोटलवार

लेखक व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. जीवनातील बर्‍यावाईट घटनांवर, आठवणींवर आणि अनुभवांवर लेख लिहण्याची त्यांना आवड आहे. रोजच्या जीवनातल्या, आजुबाजुला घडणार्‍या घटनांमध्ये, छोट्यामोठ्या प्रसंगामध्ये, आयुष्याचे बहुमुल्य धडे लपलेले असतात, यावर त्यांचा विश्वास आहे, असे हलकेफुलके प्रसंग आणि त्यातुन आयुष्याला समृद्ध करणारे, लपलेले नवनवे अर्थ शोधुन, त्यांची नर्मविनोदी शैलीत मांडणी करणं, हा त्यांचा आवडता छंद आहे......

उधारी कशी वसुल करावी 0

पेमेंटची रिकव्हरी, उधारी वसूल करण्यात अडचण येते का तुम्हाला?

व्यवसायात मिळालेल्या कडु वाईट अनुभवांनी मी हे शिकलो की, उधारी मागणे, गोड बोलुन वेळेवर पैसे काढुन घेणे, ही सुद्धा एक कला आहे. हे एक शास्त्र आहे. उधारी कशी वसुल करावी, एखाद्याकडे अडकलेले पैसे कसे वसुल करावेत ह्या संबंधीच्या एकदम साध्या सोप्या टिप्स!

विचार करा आणि श्रीमंत व्हा 1

विचार करा आणि श्रीमंत व्हा! (Think And Grow Rich)

माणसं श्रीमंत कशी होतात? आणि श्रीमंत होण्यासाठी एखाद्याने आपल्यामध्ये कोणकोणते गुण जोपासावेत? ह्या विषयावर नेपोलियन हीलने त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा तरुण नेपोलियनची जिज्ञासुवृत्ती, चिकाटी आणि ह्या विषयातला रस पाहुन एन्ड्रु कार्नेजी प्रसन्न होतात.

श्रीमंत लोक 10

करोडपती मेंदुचं रहस्य या पुस्तकात सांगितलेले श्रीमंत बनण्यासाठीचे अकरा नियम

त्या दिवसांपासुन त्याने झपाटुन मेहनत घेतली, त्याची रोमहर्षक कथा मुळ पुस्तकात वाचता येईल, पण थोडक्यात सांगायचे तर पुढच्या फक्त दोन वर्षांनी हार्वची कंपनी, “फॉर्चुन ५००” मध्ये जाऊन पोहचली, गरीबीवर मात करुन हार्व ‘श्रीमंत कसे व्हावे’ हे शिकवणारा मोटीव्हेटर टिचर झाला.

युद्ध 0

युद्ध नको आहे आपल्याला, पण झालेच तर मानसिक तयारी हवी ना!!!

आपला सैनिक गमावल्यास हुरहुर….. त्यांचा सैनिक किंवा दहशतवादी मेल्यास उन्माद…. हे सगळं इथेच थांबेल का अजुन अनर्थ…. होईल का अशी भीती!…… आतुन बैचेनी आणि बाहेरुन युद्ध सज्जता!…. मनात एक द्वंद!

स्टीव्ह जॉब्ज 0

या लेखात वाचा स्टीव्ह जॉब्ज ला जगावेगळं बनवणाऱ्या सात सवयी! (प्रेरणादायी कहाणी)

स्टीव्हला एका जोडप्याने दत्तक घेतलं, स्टीव्हच्या वयाच्या सातव्या वर्षी गल्लीतल्या मुलीने त्याला चिडवले की तो दत्तक आहे, स्टीव्हने त्याच्या आईवडीलांना अर्थ विचारला. तेव्हा स्टीव्हच्या आईवडीलांनी त्याला खरे खरे सांगितले आणि म्हणाले. “तु साधारण मुलगा नाहीस, तु खुप ‘स्पेशल मुलगा’ आहेस, तुझे आयुष्य ‘असाधारण’ असणार आहे.”

लॉ ऑफ अट्रॅक्शन 0

द सिक्रेट मध्ये सांगितलेला लॉ ऑफ अट्रॅक्शन; किती खरा? किती खोटा?

द सिक्रेट मध्ये सांगितलेला लॉ ऑफ अट्रॅक्शन खरा आहे का? का पुर्णपणे फेकाफेकी आहे? का पुस्तके, मुव्ही सुपरहीट करण्यासाठी वापरलेली चलाख खेळी आहे? लॉ ऑफ अट्रेक्शन वर प्रवचन देणारे, आपले यशाचे ढोल वाजवतात, मग ते हा सिद्धांत वापरुन मिळालेल्या प्रत्येक अपयशाबद्द्ल का बोलत नाहीत?

प्रेरणादायी कहाणी 2

रॉबर्ट मॅनरी – स्वप्नांच्या सफारीवरचा खराखुरा खलाशी ! एक प्रेरणादायी कहाणी

त्या दिवशी एक वेगळ्याच प्रकारची छोटीशी, पिटुकली, बोट फालमाऊथ ह्या ठिकाणी मॅसुच्युसेटस समुद्रकिनार्‍यावरुन इतर महाकाय बोटींच्या ताफ्यातुन निसटली आणि मोकळ्या समुद्रात घुसली. त्या बोटीवर रॉबर्ट मॅनरी हा एकटाच होता. कोण होता हा रॉबर्ट मॅनरी? आणि आपली लाकडाची रंगबेरंगी, पण विलक्षण देखणी बोट घेऊन तो कोणत्या प्रवासावर निघाला होता?

मराठी प्रेरणादायी लेख 1

दुःख मिटविण्याचे सात सोपे उपाय – मराठी प्रेरणादायी लेख

कमी अधिक प्रमाणात का असेना, पण आपण सगळेच जण आपल्या आयुष्यात कसल्या न कसल्या कठिण प्रसंगाना रोजच सामोरे जात असतो, कोणी दाखवतो, कोणी मनातल्या मनात ठेवतो, इतकचं! कितीही वाईट प्रसंग असला तरी आपण आपला तोल ढळु न देता, आनंदी, हसतमुख राहु शकतो, त्यासाठी एक खास प्रकारचं ट्रेनिंग मनाला आवश्यक असतं.

नवरा-बायको 1

नवरा-बायको मधल्या छोट्या छोट्या कुरबुरी मिटविण्याचे काही उपाय वाचा या लेखात

माझं माझ्या लाईफ पार्टनरशी जमत नही, अशा प्रकारच्या प्रश्णावर माझ्याकडे एकच उत्तर आहे. “प्रेम करा, अजुन प्रेम करा, अजुन खुप खुप खुप प्रेम करा,“ इतकं प्रेम करा की, केलेलं प्रेम हजार पटीने चक्रवाढ होवुन आपल्या कडे वापस येईल. मनं मोकळी होतील.

श्रीमंतीकडे वाटचाल 6

हे सात धडे गिरवले तर तुमची श्रीमंतीकडे वाटचाल निश्चितच होईल!!

मोक्ष प्राप्त केलेल्या, समाधीअवस्थेत पोहोचलेल्या ज्ञानी महापुरुषांना, किंवा पैशाची किंमत न समजणार्‍या निरागस बाळाला सोडलं तर, ह्या जगात प्रत्येकालाच आता आहेत त्यापेक्षा जास्त श्रीमंत व्हायला आवडत असतं! त्यासाठीच तर आपली सकाळपासुन संध्याकाळपर्यंतची धावपळ चाललेली असते, पण तरीपण प्रत्येकजण हवा तेवढा श्रीमंत का होत नाही?