ती शांत वाहत होती…
तळाशी साचलेले लपवत होती
अडथळे वाटेतील चुकवत होती
चांगले वाईट सामावून स्वतःमध्ये
आजही ती….शांत वाहत होती.
तळाशी साचलेले लपवत होती
अडथळे वाटेतील चुकवत होती
चांगले वाईट सामावून स्वतःमध्ये
आजही ती….शांत वाहत होती.
माझ्या कवितेतली ती
गावची गंधित माती..
शब्दात सुगंध भरती
रीत जगण्याची सांगती.
जन्माआधी जन्म जिचा होतो
मरणानंतरही माग तिचा उरतो
चिकटते कायम भिनते रक्तात
पुरून उरते सकला ही ‘जात’…
तुझ्या जगात प्रवेश झाला
विनाअडथळा श्वास घेतला
मोकळा श्वास लाभणार कधी
उत्तर अजूनही आलं नाही….
आज सकाळी सकाळी मोबाईल वर मेसेज वाचला. तुमच्या नंबरची आऊटगोईंग कॉलची वैधता उद्या समाप्त होत आहे. प्लॅन चालू ठेवण्यासाठी कमीतकमी XXX रकमेचा रिचार्ज करा…. मला समजेना, माझा बॅलन्स तर शिल्लक आहे मग वैधता कशी काय संपणार.?