Author: वसुधा देशपांडे -कोरडे
सहा वर्षांचा मुलगा शाळेसाठी तयार होत असतो. म्हणजे आई त्याला दात घासून देते, बाथरूममध्ये नेऊन आंघोळ घालते. कपडे चढवते, सॉक्स-बूट घालून देते आणि नंतर त्याची bag आपल्या पाठीवर घालून त्याला वर्गापर्यंत पोहोचवते.
आजी-आजोबा आणि नातवंड हे नातं सगळ्यात सुंदर नातं असावं. आपले आई-बाबा म्हणून जे आपल्यावर ओरडलेले असतात, ज्या गोष्टींसाठी ओरडलेले असतात, त्याच गोष्टी ते नातवंडाना अत्यंत प्रेमाने सांगत, समजावत असतात. आपली मुलंही ज्या गोष्टींसाठी आपल्याला पळवतात त्या गोष्टी आजीकडून अगदी शांतपणे करून घेतात.
“….it means you’re not my real parents… मी तुमची मुलगी नाहीचए…” हे वाक्य सारखं कानात वाजत होतं. ती सतत कूस बदलत होती. “हे बघ, शांत रहा. सगळं उद्यापर्यंत नीट होईल,” मधूनच मनूच्या बाबाचं वाक्य आठवायचं....
असे कितीतरी आजी-आजोबा आपल्याला भेटतात आणि एकमेकांसोबत ते खूप छान दिसतात. intimacy हळूहळू निर्माण करावी लागते. ह्यासाठी दुसऱ्याच्या आवडी-निवडीबद्दल आदर, विचारांबद्दल आदर, आपल्यापेक्षा वेगळं असण्याचा स्वीकार, विश्वास असणे खूप गरजेचे असते. जेंव्हा पार्टनर म्हणून समान विचारांची, समान तत्वांची व्यक्ती निवडली जाते तेंव्हा intimacy लवकर निर्माण होऊ शकते. अर्थात, त्यासाठी पुन्हा कमीटमेंट असावीच लागते.
मैत्री करतो तेव्हा प्रकाशाचा एक उबदार कवडसा दिसू लागतो. जो आपल्याला Mature व्हायला मदत करतो. आधाराचा हात देतो. थोडसं हसू देतो… और जिने को क्या चाहिये?
खूप कमी जणांशी त्यांचं जमतं. मग ते कामात झोकून देतात, चिडचिडे होतात, प्रत्येक गोष्टीला नावं ठेऊ लागतात. त्यांना काहीतरी सिद्ध करायचं असतं. काय, हे बहुदा. त्यांचं त्यांना सुद्धा कळलेलं नसतं.
का कुणास ठाऊक, पण असं वाटतं कि त्यांनी त्यांच्याच भोवती मोठ्या-मोठ्या भिंती बांधून घेतल्या आहेत……
”What is bothering you?’ माझ्या पुढ्यात चहाचा कप ठेवून तिने विचारलं. माझी ती अवस्था बहुदा तिने ओळखली असावी. माझ्याकडून काहीच उत्तर दिलं गेलं नाही. मला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं. मला आईची खूप-खूप आठवण येत होती.
तिला भेटले तेव्हा जीवात जीव आला. मला वाटलं तेवढी ती कोसळलेली नव्हती. हसतमुख चेहर्याने नवऱ्यासाठीची धडपड, सासू-सासऱ्यांची काळजी. सगळंच करत होती.
मग बोलताना म्हणाली, “डॉक्टर आज म्हणाले १०% चान्सेस आहेत तो वाचण्याचे. म्हणून मी आज खूप आनंदात आहे.”
जेंव्हा Sexting चा प्रकार आई-वडिलांच्या लक्षात येतो, तेंव्हा खूप टोकाची भूमिका घेतली जाते. क्लास, शाळा बंद केली जाते. नाही-नाही ते बोलले जाते. त्याऐवजी, मुलं (मुलगा/ मुलगी) जेंव्हा स्मार्टफोन्स वापरायला सुरुवात करतात, तेंव्हा ह्याविषयांवर बोलणे. त्यांना धोके सांगणे फार आवश्यक ठरते.
आमच्या वर्गातल्या थोड्याश्या high-class वातावरणात आम्ही तिला कधी मिसळूच दिले नाही. ती तरीही माझ्याशी बोलायची आणि मी कसलाही ताळमेळ न ठेवता तिचा अपमान करायचे…… ती पुस्तक घेऊन काहीतरी विचारण्यासाठी यायची आणि मी तिच्या बुद्धिमत्तेची कीव करत तिला उडवून लावायचे.