Author: वसुधा देशपांडे -कोरडे
‘पौगंडावस्थेतील मुला-मुलींचं प्रेम’ हा आई-बाबांसाठी काळजीचा विषय. मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडलेत हे कळल्यानंतर, ‘हे वय आहे का प्रेम करण्याचं?’ ह्या वाक्यापासून सुरुवात होते. प्रेमावर मग बंधनं घातली जातात. ‘पुन्हा त्याला भेटलीस तर बघ’, अशा धमक्या दिल्या जातात. प्रेमात पडण, अफेअर असणं म्हणजे वाया जाणं, असा समज असतो. म्हणूनच मुलांच्या प्रेमात पडण्याने आई-बाबा हवालदिल होतात.
पण विचार करण्याची, चूक सुधारण्याची संधी मात्र मिळाली. त्यामुळे मी परफेक्शनिस्ट झाले नाही, पण इतरांना स्विकारायला आणि माफ करायला शिकले. आईचं म्हणणं पटत गेलं. खोटं बोलणं, लपवाछपवी ह्याला आमच्या नात्यात स्थानच उरलं नाही.
हे लाडावणं फक्त वस्तूंच्या बाबतीत नसतं. बरेचदा, कामाच्या बाबतीतही असंच होतं. मुलांना त्रास नको, म्हणून प्रत्येक ठिकाणी स्वत:च पुढे होऊन कामं केली जातात. पाण्याचा ग्लास हातात देण्यापासून पाय चेपण्यापर्यंत मुलांची कामं करणाऱ्या, अगदी मुलाच्या मुलालाही स्वतः ची जबाबदारी समजून सांभाळणाऱ्या अनेक आई पाहिल्यायत. मुलं तुम्हाला गृहीत धरू लागतात.
पाडगावकरांच्या काही ओळी आहेत, “चिऊताई, पहाटेच्या रंगांत तुझे घरटे न्हाले, तुला सांगायला फुलपाखरू धावत आले. तुझं दार बंद होतं, डोळे असून अंध होतं..” १००% च्या नादात आपलं तसंच तर होत नाही ना? असं होत असेल तर बदलायला हवं…… प्रवासाला निघाल्यानंतर इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंतचा प्रवास आपण सुखावह करण्याचा प्रयत्न करतो. प्रवासाचा आनंद घेतो. तसंच हे आहे. शेवटी, आपण सगळेच मुसाफिर आहोत. एका ध्येयापासून दुसऱ्या ध्येयापर्यंतचा प्रवास अविरत करणार आहोत. तो आनंददायक करायलाच हवा.