Category: म्यूचुअल फंड

पॊर्टफोलिओ मॅनेजमेंट 0

पॊर्टफोलिओ मॅनेजमेंट बद्दल हि माहिती तुम्हाला असली पाहिजे!!

हॅलो सर आपलं नाव xxx आहे का? आपला नंबर आमच्याकडे रजिस्टर झालाय. आपण ट्रेडिंग करता ना? कुणाच्या सल्ल्याने करता? करीत नाही म्हणता? का करीत नाही ? आपला खूप तोटा झालाय का यापूर्वी? आम्ही तुम्हाला चांगले कॉल देऊन तुम्हाला भरपूर फायदा करून देऊ. सध्या आमच्या काही दिवस फ्री ट्रायल चालू आहेत. आपण इंटरेस्टेड आहात का?

अक्षय्य तृतीया 0

आज अक्षय्य तृतीया, त्या निमित्ताने माहित करून घ्या सोने खरेदीचे आधुनिक पर्याय

सणावार म्हणजे सोने खरेदी असं एक समीकरण आपल्या देशात शतकानुशतकं चालत आलं आहे. त्यातही खास करून ठराविक मुहूर्तांवर म्हणजेच अक्षय तृतीया, दसरा, गुरु- पुष्यांमृत योग, अशा शुभ दिनी सोनं खरेदीला अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृती म्हणा किंवा हौस, परंपरा म्हणा किंवा गुंतवणूक; सोने कितीही महाग झाले तरी अशा शुभ मुहूर्तांवर आवर्जून सोनं खरेदी केली जाते.

Moneycontrol 0

गुंतवणुकीच्या माहितीचे सर्वसमावेशक ऍप ‘Moneycontrol’

Moneycontrol हे सर्व उपयुक्त माहितीचे सर्वसमावेशक अँप आहे. या अँप विषयी पूर्वी माहिती देताना मी त्यास गुंतवणूकदारांचा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या आशा अर्थाने ‘मितवा’ असे म्हटले होते. या अँपमध्ये अनेक उपयोगी गोष्टी असून ते पूर्ण क्षमतेने वापरले तर अन्य कोणत्याही माहितीची गरज पडणार नाही.

नवीन वर्षाची गुढी 1

उद्या नवीन वर्षाची गुढी उभारताना हे नवे आर्थिक संकल्प आवर्जून करा!!

१ एप्रिल २०१९ ला नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. आणि शिवाय उद्या गुढीपाडवा. नव्या वर्षाची सुरुवात साधारणपणे नव्या संकल्पांनी केली जाते. ज्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली नाही त्यांनी ती विनाविलंब चालू करावी. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या किमान ४०% रकमेची गुंतवणूक करायला हरकत नाही.

निवृत्ती 0

वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे का? मग हे करा

दर २–३ वर्षांनी नवीन नोकरी पकडून आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करतात. आजच्या नवीन पिढीचे स्वप्न असते की आयुष्यभर नोकरी न करता शक्यतो पन्नाशी अगोदर निवृत्ती स्वीकारायची आणि त्यानंर आपले छंद, स्वप्ने जोपासायची, वर्ल्ड टूरला जायचे वगैरे.

लाभांश 0

लाभांश (Dividend) म्हणजे काय? आणि त्याचे वाटप कसे होते?

कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes) समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

आर्थिक नियोजन 0

२०१९ साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…

खरं सांगायचं तर आर्थिक नियोजन अनावश्यक, कठीण, अशक्य अशा कुठल्याही प्रकारात मोडत नाही. ती एक साधी, सरळ सोपी गोष्ट आहे. गरज आहे ती फक्त हे नियोजन मनापासून स्वीकारण्याची आणि ते तितक्याच जिद्दीने यशस्वीपणे पूर्ण करण्याची. सुयोग्य आर्थिक नियोजन हा श्रीमंतीचा एक सोपा मार्ग आहे.

म्युच्युअल फंड 0

आपला पैसा योग्य पद्धतीने गुंतवला जाण्यासाठी म्युच्युअल फंड योजनेसबंधी माहिती

म्युच्युअल फंडाच्या किंवा त्यांच्या विशिष्ट योजनेच्या जाहिराती आपण पाहिल्या असतीलच. यातील प्रत्येक जाहिरातीचा शेवट हा सदर योजना जोखमीच्या अधीन असून आपण त्याची सर्व माहिती गुंतवणूक करण्यापूर्वी करून घ्यावी असा असतो. (Mutual fund investment are subject to market risk, read all scheme relatated documents carefully before make investments) या संबंधीची नेमकी कोणती माहिती असते? जी आपल्याला माहीत असणे जरुरीचे आहे. ही माहिती तीन प्रकारात विभागलेली असते.

प्रॉपायटरी ट्रेडींग 0

तुमचा पैसा सुरक्षित आहे का? प्रोप्रायटरी ट्रेडिंग बद्दलची हि माहिती असू द्या.

ब्रोकरेज फर्मने स्वतः साठी केलेले खाजगी ट्रेडींग  म्हणजे प्रोप्रायटरी ट्रेडिंग होय. याचा थोडक्यात उल्लेख ‘प्रो ट्रेडींग’ असाही करतात. ज्यांना हे जमले त्यांनी किरकोळ व्यवसाय बंद करून कॉर्पोरेटसाठी आणि स्वतःसाठी प्रोप्रायटरी ट्रेडिंग फर्म स्थापन केल्या तर काहींनी किरकोळ व्यवसायासपूरक म्हणून प्रो ट्रेडिंग चालू केले. मोठया प्रमाणात नफा मिळवण्यासाठी हे अपरिहार्य झाले आहे.

ELSS 0

(ELSS ) समभाग संलग्न बचत योजना की (ULIP) युनिट संलग्न विमा योजना

आज युनिट संलग्न विमा योजना (ULIP) या गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून कधीच खूप मागे पडल्या आहेत. सुरवातीच्या काळात त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासंबंधी अवास्तव दावे केले गेले आणि बाजारातील तेजीमुळे ते पूर्णही झाले परंतू 2008 मधील मंदीमुळे ते किती पोकळ आहेत याची जाणीव लोकांना झाली.