कल, आज और कल… तीन पिढ्यांची गोष्ट….
तीन पिढ्यांच्या विचारात झालेल्या बदलांचा परिणाम हा नकळत घरातील लहान मुलांवर अथवा तिसऱ्या पिढीवर खूप दूरगामी परिणाम करत असतो. ते कधी कधी असे रूप धारण करते की नक्की कोण चुकीचं आणि कोण बरोबर ह्या पेक्षा आपल्या हातातून काहीतरी निसटत जाते आहे ह्याची खंत आपल्याला वाटत रहाते.