Category: व्यक्तिमत्व

विकी रॉय 0

कचरा वेचणारा विकी रॉय ते अंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त फोटोग्राफर (प्रेरणादायक कहाणी)

विश्वास बसत नाही ना!! पण हे एका कचरा वेचणाऱ्या गरीब, एकाकी मुलाने केले… मेहेनत करून विकीने आपल्या नशिबाचे दरवाजे खोलले… बरेच लोक असतात जे आपल्या नशिबाला दोष देत रडत बसतात पण थोडेच असतात जे रडत न बसता आपला मार्ग स्वतःच सुन्दर बनवतात.

अग्निपंख 0

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा रोमहर्षक जीवनप्रवास सांगणाऱ्या ‘अग्निपंख’ चा सारांश

डॉ. अब्दुल कलाम यांचा रोमहर्षक आणि रोमांचित करणारा जीवनप्रवास, ‘विंग्ज ऑफ फायर’ म्हणजे ‘अग्निपंख’ हे पुस्तक जगातल्या सर्वात चांगल्या मोटीव्हेशनल पुस्तकांपैकी एक आहे. हे पुस्तक मी लहानपणीच झपाटल्यासारखे कित्येकदा वाचुन काढले होते, परवा दिवशी पुन्हा एकदा लायब्ररीमध्ये हाती लागले आणि आता पुन्हा नव्याने वाचल्यावर, मी भारावुन गेलो आहे.

कार्नेलिया सोराबजी 0

भारतातल्या पहिल्या महिला वकील असलेल्या नाशिकच्या कार्नेलिया सोराबजी

स्त्रियांना कोणी वाली नाही अशी समाजाची स्थिती असताना या स्त्रियांसाठी ती देवदूतासारखी होती. या काळात आपल्या समाजात वारसाहक्क, इस्टेटीच्या वाटण्या, गादीचा हक्क, दत्तक व सावत्र मुलं यांचे प्रश्न मोठय़ा प्रमाणावर असत. अश्या स्त्रियांसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम करायचा निर्णय कार्नेलियाने घेतला.

प्रियंका योशिकावा 0

कोण आहे वंशवादाचा बळी ठरलेली प्रियंका योशिकावा

६ सप्टेंबर २०१६ ला ‘मिस जपान’ चा किताब मिळवणारी प्रियांका वंशवादाची शिकार होत जपानमध्ये लहानाची मोठी झाली. वंशवाद किंवा racism म्हणजे एका वंशाच्या लोकांकडून दुसऱ्या वंशाच्या लोकांबरोबर भेदभाव केला जाणं. जगभर चालणाऱ्या या वंशवादाला प्रियंकाला तोंड द्यावं लागलं याचं कारणही काहीसं वेगळंच होतं.

सुभेदार दरवान सिंह नेगी 0

बक्षीस मिळत असताना ते स्वतःसाठी न मागता देशासाठी मागणारे सुभेदार दरवान सिंह नेगी

त्यांच्या ह्या विनंतीचा मान ठेवत इंग्रज सरकारने प्रयाग मिडल शाळेची स्थापना केली ज्याला आज ‘वीरचक्र दरवान सिंह राजकीय इंटरमिडीयेट कॉलेज’ ह्या नावाने ओळखले जाते. १९१८ ते १९२४ पर्यंत इंग्रज सरकारने रेल्वे साठी पण प्रयत्न केले. पण हा प्रोजेक्ट जागेच्या अभावी पूर्ण होऊ शकला नाही. युद्धानंतर त्यांची बढती सुभेदार ह्या पदावर झाली होती.

नजत बेल्कासम 0

शेळ्या चारत मोठी झालेली नजत बेल्कासम वयाच्या ३७ व्या वर्षी शिक्षण मंत्री होते?

नजत बेल्कासम, फ्रांस मधल्या एका गरीब कुटुंबातली मुलगी. शेळ्या मेंढ्या चारत नजत लहानाची मोठी झाली. गरिबीतही आई वडिलांनी शक्य तसे शिक्षण दिले. आणि आपला अभ्यास एकाग्रचित्त होऊन नजत करत गेली. आणि हीच नजत बेल्कासम मोठी होऊन फ्रान्सची शिक्षण मंत्री झाली.

मन कौर 1

१०३ व्या वर्षी धावण्याच्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या मन कौर कोण आहेत?

मन कौर’ ह्या एका भारतीय धावपटूनेही आपल्या जिद्दीने वयाला लाजवलेलं आहे. १४ मुलांची पणजी, ९ मुलांची आजी, ३ मुलांची आई असणाऱ्या ‘मन कौर’ ह्यांनी वयाच्या १०३ व्या वर्षी ‘वर्ल्ड मास्टर’ स्पर्धेत, स्पेन इथे सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. आजवर ३० पेक्षा जास्त सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या मन कौर ह्यांनी आपल्या कर्तृत्वाने सर्वांपुढेच एक आदर्श ठेवला आहे.

होंडा 0

सायकलच्या दुकानापासून सुरु झालेली होंडा कम्पनीच्या यशाची कहाणी

Honda Motor Pvt. Ltd. Company चे संस्थापक सोइचीरो (Soichiro) होंडा यांचा जन्म जपानमध्ये १९०६ ला झाला. सोइचीरो यांचे वडील लोहारकीचं काम करायचे आणि त्याबरोबर त्यांचं सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. छोटा सोइचीरो वडिलांना सायकल रिपेअरिंगच्या कामात मदत करायचा.

दिक्षा दिंडे 0

अपंगत्वावर मात करून जगाच्या पटलावर आपलं नाव उमटवणारी दिक्षा दिंडे

व्यवसायाने काळी रिक्षा चालवणारे वडील आणि शिवणकाम करणारी आई अशी अगदी बेताची परिस्थिती असताना पण तिच्या आई- वडिलांनी सगळ्या समाजाकडून येणारे टक्के टोमणे आणि सहानभुतीच्या नजरांना झेलत दिक्षाला तिच्या पायावर उभं करण्यासाठी तिची साथ देण्याचा पण केला.

सालूमरडा थिमाक्का 0

पोटचं मूल नसल्याचं दुःख दूर करून झाडांचीच आई झालेली सालूमरडा थिमाक्का

आई बनण्याचा क्षण आपण अनुभवू शकत नाही हे शल्य कुठेतरी त्यांना आत्महत्येचा विचार करायला प्रवृत्त करत होतं. पण थिमाक्का च्या जोडीदाराने त्यांना आजूबाजूच्या निसर्गाची आई बनण्याचा सल्ला दिला. मग सुरु झाला एक असा प्रवास ज्याने सालूमरडा थिमाक्काचं आयुष्य तर पूर्ण बदललंच पण त्यासोबत निसर्गाला जोपासण्याची एक चळवळ सुरु झाली.