Category: ललित

lalit lekh kirana bhusar 0

किराणा व भुसार…

मी अभ्यास फारसा करायचोच नाही. आमची आई म्हणायची, अशाने मामाजींच्या दुकानात पुड्या बांधाव्या लागतील. पण खरंच पुड्या बांधणं खायचं काम नाही. बरीच वर्षे प्रयत्न करून सुद्धा अजूनही मला ते जमलेलं नाही. आता तर प्लॅस्टिक पिशव्यांनी पुड्याचा पार लगदा करून टाकला आहे.

Play Date 0

आमची Play Date वाली खवय्येगिरी…..

आता पर्यंत इतके भारी मेनू बनविले मी. जे मी कधीच केले नव्हते ते फक्त आपल्या प्ले डेट (Play Date) साठीच केले. त्या सगळ्यवार पाणी फिरविलेस तू. 😞😞😞(Play Date म्हणजे आम्ही ३ मैत्रिणी मिळून आमच्या मुलींना घेऊन एकीच्या घरी जमतो आणि दिवस भर एकमेकींच्या हातचे केलेले खमंग मेनू चे आस्वाद घेत छान वेळ घालवितो.

स्वातंत्र 0

स्वातंत्र

बाई माझ्या नजरेला नजर न मिळवता बोलल्या. खाली यायच्या गडबडीत त्यांच्या नवीन टी शर्टचा प्राईज टॅग त्या काढायला विसरल्या होत्या हे माझ्या आता लक्षात आल. तो गळ्यात मंगळसुत्रासारखा लोंबणारा प्राईज टॅग त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल मला ओरडून ओरडून सांगत होता.

गोष्ट 0

गोष्ट एका फोटोची

मी एक एक दिवस कसा तरी काढला शेवटी तो फोटो भेटण्याचा सुदिन आला मी मोठया उत्सकुतेने फोटो घ्यायला गेलो व फोटो पाहतो तर काय फोटो बराच काळा आला होता. मी लगेच म्हटले “काका फोटोत मी जरा काळा नाही दिसत काय?” तर म्हणतात कसे “एकदम ओरिजिनल काढलाना बाबू”…..

नरभक्षक 0

नरभक्षक

शेरखान बाटली समोर ठेवून बसला मग एक चिरुट काढून शिलगावला आणि अंकलला ऑफर केला. नकार देत अंकलने मोठ्या बांबूपासून बनवलेला चिरुट तोंडात धरून शिलगावला.

0

ऑनलाईन डॉक्टर

बॅगेतून एक इंजेक्शन काढून त्यांना दिले. मग त्याच्या पॅडवर काही औषधें लिहून दिलीपच्या हाती कागद दिला. ही औषधे द्या दोन दिवस. अपचन झालेय.. यावयात खाण्यावर कंट्रोल असावा. असे म्हणून हसला.

हापूस 0

पोर्तुगीजांनी आपल्याला दिलेली भेट, हापूस आणि काय आहे त्याच्या जन्माची कहाणी?

पोर्तुगीजांनी भारताला दिलेली सगळ्यात गोड प्रेमळ भेट म्हणजे हापूस आंबा. हापूस आंब्याचा जम आता जरी कोकणात बसलेला असला तरी त्याचा उगम गोव्या मधील. मग तिकडे उमेदीचा काळ घालवून कोकणातली हवा, पाणी, माती मानवल्यामुळे कोकणात स्थानापन्न झालेला आणि तेथेच प्रसिद्ध पावलेला.

नऊवारी लुगडं 0

महाराष्ट्रीयन स्त्रियांचा पारंपरिक पोशाख नऊवारी लुगडं आणि त्याचा इतिहास..

माझ्या लहानपणी मुबईत माझ्या शेजारी राहाणारे बलसाड गावचे गुजराती त्यांचं वाळत घातलेलं धोतर शोधताना ‘मारू लुगडु क्यां गयु..’, असं त्यांच्या बायकोला विचारताना मी ऐकायचो, तेंव्हा मला भारी मौज वाटायची. हा माणूस धोतराला लुगडूं का म्हणतो, असा विचार तेंव्हा मनात यायचा, कारण माझ्या तेंव्हाच्या ठाम समजुतीप्रमाणे लुगडं म्हटलं की, ते नऊवारी असतं.

वैष्णवी 0

तयारी

“खरे आहे तुझे…… पण हल्ली इतकीही वाईट परिस्थिती नाही राहिलीय. प्रत्येकजण आपल्यापरीने शांततेत राहायला बघतो. पण कधी कधी सुटतो कंट्रोल….” विनायक हसत म्हणाला. “माझ्यासमोर तरी सगळे मुकाट रांगा लावून येत होते. सर्वच जण काहीतरी मागत होते. त्यांचे ऐकता ऐकता दिवस कधी सरायचा कळलेच नाही.

मनुष्यबाधा 0

भुतांनी स्थापली ‘मनुष्यबाधा निर्मुलन समिती’

माणसांनी जंगलात अतिक्रमण केले, घरे बांधली, उद्योग उभारले आणि वन्यप्राण्यांना पिंजर्‍यात कैद केले. आता ही माणसं स्मशान सुद्धा ताब्यात घेऊन तिथेही अतिक्रमण करणार की काय अशी भिती भुतांना वाटत होती आणि त्यांच्यातील एक बाळ-भूत प्रचंड घाबरलेलं दिसत होतं.