Category: पालकत्व

नाते बालक आणि पालकांमधले…. लहान मुलं, पौगंडावस्थेतील मुलं वय वाढत असतांना पालकांशी त्यांचे नातेसंबंध यांवर प्रकाश टाकणारी लेखमाला

पालकत्व 0

मुलांना आपली कामं हाताने करायला लावण्याची योग्य वेळ कोणती?

सहा वर्षांचा मुलगा शाळेसाठी तयार होत असतो. म्हणजे आई त्याला दात घासून देते, बाथरूममध्ये नेऊन आंघोळ घालते. कपडे चढवते, सॉक्स-बूट घालून देते आणि नंतर त्याची bag आपल्या पाठीवर घालून त्याला वर्गापर्यंत पोहोचवते.

पालकत्व 1

प्रगल्भ पालकत्व …

आपले पंख त्यांना देऊन मग आयुष्याच्या वादळात सगळं उध्वस्थ झाल्यावर असं का झालं ह्याची उत्तर शोधण्यापेक्षा त्यांच्या पंखाना अनुभवाचं बळ देणं हेच खरं प्रगल्भ पालकत्व आहे.

आजी-आजोबा 0

पालकत्त्व आणि आजी-आजोबा….

आजी-आजोबा आणि नातवंड हे नातं सगळ्यात सुंदर नातं असावं. आपले आई-बाबा म्हणून जे आपल्यावर ओरडलेले असतात, ज्या गोष्टींसाठी ओरडलेले असतात, त्याच गोष्टी ते नातवंडाना अत्यंत प्रेमाने सांगत, समजावत असतात. आपली मुलंही ज्या गोष्टींसाठी आपल्याला पळवतात त्या गोष्टी आजीकडून अगदी शांतपणे करून घेतात.

सावजी ढोलकिया 0

खरा बापमाणूस!! जगायला शिकवणारे करोडपती सावजी ढोलकिया

पैश्याने करोडपती आणि मनाने इतके उदार असणारे सावजी ढोलकिया जर आपल्या कर्मचाऱ्यांवर इतक्या कोटींची उधळण करू शकतात तर आपल्या मुलांसाठी त्यांनी किती केली असेल असा प्रश्न कोणाच्याही मनात येणं स्वाभाविक आहे. पण आयुष्य जगायला शिकवणारा हा करोडपती वेगळाच आहे.

होमस्कूलिंग 0

आम्ही होमस्कूलिंग का करतोय…

त्यांची पहिली प्रतिक्रिया होती “नाही… हे काही बरोबर वाटत नाही. आपल्या मुलासाठी आपण होमस्कूलिंग करावं असं मला नाही वाटत. यात बरेच धोके असु शकतात” तो विषय तेव्हा तिथेच संपला मग मुलगी झाल्यावर ती वर्ष भराची होर्इपर्यंत आमची या विषयावर चर्चा झाली नाही. पण तोपर्यंत त्यांनी एका वेगळ्या दॄष्टीने शाळा या विषयाकडे बघायला सुरूवात केलेली होती.

agneya-chikte 0

वाट वेगळी…

अनेक वर्षांपूर्वी माझाही मुलगा म्हणाला होता कि त्याला गिटार वादक व्हायचंय. मी स्पष्ट सांगितलं, हि असली थेरं करायची असतील तर माझ्या घरातून बाहेर हो आधी. नाहीतर माझ्या सारखा इंजिनियर हो. त्यानी माझं म्हणणं ऐकलं आणि आज तो एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे.”…….. त्यांचा सल्ला ऐकून आम्हाला एक गोष्ट पटली, ती हि, कि कोणालाही सल्ला मागायला जायचं नाही! ‘ज्याचं जळतं त्याला कळतं’ म्हणतात ते उगाच नाही.

friendship day 0

फ्रेंड्स आणि फ्रेंडशिप…. (Friendship Day Special)

“Friendship Day” जवळ येत होता आणि इकडे रावी ची तयारी सुरु झाली होती. ती फार उत्सुक होती फ्रेंड्सशिप डे साजरा करण्यासाठी… हातांनी कार्ड्स आणि फ्रेंड शिप बेल्ट सुद्धा बनवणं सुरु होतं तीच.

mihika 0

दत्तकप्रक्रियेतले वास्तव….

मूल दत्तक घेणे हा एक मूर्खपणा खरंतर नाही. पण तयारी नसताना मूल दत्तक घेणे हा ठार मूर्खपणा आहे. म्हणजे समुद्रात पोहायला जाणे हा मूर्खपण नाही पण पोहायला येत नसताना पोहायला जाणे हा नक्कीच मूर्खपणा आहे. आमच्या आयुष्यात मिहिका आल्यापासून ती आमची जैविक (कसला भंगार शब्द आहे का – Biological Child जरा तरी बरं आहे.) मुलगी नाही हे जणू विसरूनच गेलो आहोत.

teens and sexting 0

पाल्यांचा Sexting चा विषय हाताळतांना….

जेंव्हा Sexting चा प्रकार आई-वडिलांच्या लक्षात येतो, तेंव्हा खूप टोकाची भूमिका घेतली जाते. क्लास, शाळा बंद केली जाते. नाही-नाही ते बोलले जाते. त्याऐवजी, मुलं (मुलगा/ मुलगी) जेंव्हा स्मार्टफोन्स वापरायला सुरुवात करतात, तेंव्हा ह्याविषयांवर बोलणे. त्यांना धोके सांगणे फार आवश्यक ठरते.

maza-bal 0

माझं बाळ !…

नाळ तुटली कि होतोच तो एक वेगळा जीव ! स्वतंत्र श्वास घेणारा….

स्वतः डोळ्यांनी पाहणारा ! आपले हात पाय हलवत ….

मोठा होणारा ! मोठा होताच … आपल्याला जाणवणारा !