Category: कथा

manachetalks 0

‘तो म्हणाला, मला माझ्या आयुष्याची ट्रेन आत्ताच सापडली!’

असं म्हणतात की नशीब संधी एकदाच देतं ती स्वीकारून त्याचं सोनं करायचं असतं. पण, मी असं म्हणेन की तुम्हाला अनेक संधी मिळतील ती संधी स्वीकारून स्वत:ला हिऱ्याप्रमाणे लखलखीत करा. फक्त लखलखू नका तर जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संधी द्या की ते तुम्हाला पैलू पाडू शकतील.

वळवाचं प्रेम 2

वळवाचं प्रेम

वळवाचा पाउस जसा अनेक प्रश्न निर्माण करून पुढे जातो तशी अनेक उत्तरे हि देऊन जातो. एका पाण्याला तरसलेल्या जमिनीला हा वळवाचा पाउस जसं एक वेगळंच आयुष्य देतो तसचं वळवाच प्रेम. अचानक आयुष्याच्या वाटेवर ते कधी कोणाकडून मिळेल काही माहित नसते.

विक्रम वेताळ 0

विक्रम वेताळाची गोष्ट, माणसाला वाटणाऱ्या भीतीबद्दल

झाडावर लोंबकाळत असलेले प्रेत राजा विक्रमाने उचलले, पाठीवर घेतले आणि तो पुन्हां स्मशानाकडे जाऊ लागला. प्रेतात बसलेला वेताळ आज शांत होता… खरे तर विक्रमाला गोष्टी सांगून वेताळ कंटाळला होता.. एकूणच वेताळाचे शांत बसणे विक्रमाला नवीन होते..

मार्ग तिचा वेगळा 0

मार्ग तिचा वेगळा

थोड्यावेळाने आईची हाक ऐकू आली. हॉलमध्ये येताच समोर लहान बहीण आणि तिचे मिस्टर बसलेले दिसले. त्याची नजर शरीरावरुन फिरलेली तिला जाणवली. काही न बोलता समोर येऊन बसली. जणू ती आरोपी आणि समोर चार न्यायाधीश बसले होते. आई… कधीहि काही न बोलणारे बाबा

महापात्रा... कथा 0

महापात्रा… (कथा भाग – १)

तेवढ्यात तो तरुण म्हणाला, दुसर्‍या मुलीशी लग्न केलं तर तुम्ही तिच्यावर सुद्धा बलात्कार कराल… तीही मरेल… यजमानाचा पारा चढला आणि त्याने त्या तरुणाचे कान चांगलेच लाल केले. तो मगासचा समजूतदार माणूस मध्ये पडला आणि यजमानाला त्याने आवरलं… त्या तरुणाला एका जीपमध्ये बसवून कुठेतरी नेण्यात आलं.

त्याच्यानंतर 0

त्याच्यानंतर

त्याचे अचानक जाणे हा जणू तिचाच दोष धरला गेला होता. सोनूलीला कुशीत घेऊन शांतपणे गॅलरीत बसून होती ती. संपूर्ण आयुष्य तिच्यासमोर जणू रिकामे उभे होते. अचानक डोअरबेलने ती जागी झाली. दरवाजा उघडला तेव्हा समोर छोटा दिर उभा.

भास 0

भास

अंगणाला ‘अंगण’ न म्हणता तू ‘गार्डन’ म्हणायचास. माझ्या अंगणातल्या कमळाच्या छोट्या तलावाची हौस मी तुझ्या गार्डनमधल्या ‘स्विमिंग पूल’मध्ये भागवली होती. त्याबाजूला तू दोन खुर्च्या ठेवल्या होत्यास, झोपून बसल्यासारखं बसायला. तुला तिथे बसून राहायला आवडायचं आणि मला पूलमध्ये पाय टाकून.

घातपात 0

माझा संशय आहे, घातपात झाला असेल त्यांच्या घरात….

मिसेस खन्ना वि़चारात मग्न असतानाच दाराची बेल वाजली. तिची समाधी भंग झाली. पण चेहर्‍यावर हलकासा आनंद दिसू लागला. तिने दार उघडले तर दारात मिस्टर खन्ना उभा होता. रोजच्याप्रमाणे तिने हसत त्याचे स्वागत केले. तो हॉलमध्ये सोफ्यावर बसला. तिने पाणी आणून दिले आणि त्याच्याकडे आशेने पाहू लागली.

Marathi Story Ktha 0

क्षितीजापलिकडलेे प्रेम

तू हे काय चालवलं आहेस? शुद्धीत आहेस का तू? आजवर मधुराच्या वियोगात वेडा झाला होतास. आत्ता आत्ता कुठे थोडा सावरत आहेस. तर हे कुठलं नवीन खूळ डोक्यात घेतलं आहेस? हे मृगजळ आहे. भूत आहे हे मानवी वेशातलं. कोणतेही विचार, भावना नसलेली जीवरहीत बाहुली, एक अंगार आहे ही. हिला हिरा म्हणून धरायला जाशील तर नुसते हातच नाही तर सारं आयुष्य करपून जाईल. खर सांगू का? तर तू प्रेमात पडला आहेस तिच्या, तुझ्या ही नकळत.

8

प्रेम..की..वासनेचा बाजार??? (एक कथा)

आज च्या भेटीत जर त्याने आपल्या प्रेमाची कबूली दिली नाही तर आपणच स्वतः पुढाकार घेऊन त्याला आपला आजवरच्या अव्यक्त प्रेमाचा नजराणा पेश करायचा या अधीर निर्णयाप्रत ती आली होती. पण म्हणतात ना, अगदी मनाच्या अंतरंगापासून कुणी कसलीही इच्छा व्यक्त केली की ती पूरी होतेच होते. याची प्रचिती प्रिया ला आजच्या भेटीतच आली.