आंतराष्ट्रिय दर्जाचे मानक सोने भारताकडून विकसित- भारतीय निर्देशक द्रव्य
जगातील दुसरी चीननंतरची सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ असलेला भारतातील सोनार आजपर्यंत शुद्ध सोन्याच्या तपासणीसाठी स्विझर्लेंड आणि कॅनडा येथून आयात केलेल्या शुद्ध सोन्यास आधारभूत मानत असत. आता इंडीया मिंटकडून विकसित ‘९९९९'(९९.९९%) शुद्ध सोन्याच्या बारचा संदर्भ म्हणून आधार घेवून त्यावरून खरेदी केलेले सोने, नाणी, दागिने यातील सोन्याची शुद्धता निश्चित करता येवू शकेल.