काही वर्षांपूर्वी जेव्हा मी माझे पहिले मासिक बजेट तयार केले होते तेव्हा फक्त दरवर्षी किती रक्कम मी मिळवतो हे साधारणपणे माहिती होते. परंतु माझ्या खर्चाचा व गुंतवणुकीचा ताळमेळ काही उत्पन्नाशी बसत नव्हता. थोडक्यात पैसे खर्च करताना मी आपल्याला परवडते की नाही याचा विचार न करता केवळ खर्चच करत होतो. आर्थिक चणचण आणि क्रेडिट कार्ड चे पठाणी व्याज तसेच दंड भरावा लागल्यावर मी जागा झालो आणि माझे पहिले बजेट मांडले.
बरे झाले…. उद्या एकदाचा जाईल तो. दरवर्षी कमीतकमी पाच दिवस खूप ताप असतो डोक्याला. ही कोकणातील लोक त्याच्यासाठी बिनपगारी रजा घेतील पण गावी जाणारंच. आज इतकी वर्षे हा उद्योग संभाळतोय पण यांच्यावर कंट्रोल नाही करू शकलो मी. या दिवसात किती ओव्हरटाईम होतात… अनुपस्थिती आहेच. नुकसान होतेच.
रात्रीचे दोन वाजले होते. तो खाली उतरताच भुंकणारी कुत्री अचानक शांत झाली होती. तो हसला. च्यायला…. ह्यांना बरोबर कळते कोण सज्जन आणि कोण वाईट आहे ते. पण ती कुत्री लांब उभी राहून परत भुंकू लागली. हे जरा जास्त धोकादायक आहे असे मनात म्हणत त्याने हातात काठी घेतली. आजूबाजूला भयाण काळोख पसरला होता. इथेच झोपायचे की चालत जायचे याचा विचार करू लागला.