Daily Archive: March 9, 2019
अंगाला निळा रंग फासून…. गळ्यात रबराचा नाग गुंडाळून ….डोक्यावर जटांचा टोप आणि हातात त्रिशूल घेऊन तो दारोदारी फिरत होता. नेहमीचे होते ते त्याचे. कोणाचा दिवस असेल तर त्याचे वेषांतर करायचे . शनिवार मारुती… तर मंगळवारी गणपती.. हीच तर कला होती त्याच्या अंगात.
“परदुःख शितल असतं गं! तुझ्या मुली सांभाळुन घेतात म्हातारपणी तुला काय कळणार सुनांचं वागणं.” माई उसळलीच. सुमतीबाईंनाही वाटलं ताडकन् बोलावं, सांगावं, ” बायांनो, मला पण तडजोडी कराव्याच लागतात तुमच्यासारख्या…”
कधी असं होतं, की फोन बेल वाजते आणि तो फोन कुणाचा आहे, याचा आधीच एक अंदाज येतो आणि तो फोन त्याच व्यक्तीचा असतो? ज्याच्या आपण अधिकाधिक संपर्कात असतो, त्या व्यक्तीच्या मनातल्या भावना राग, द्वेष, प्रेम आपल्याला नुसतं त्याच्या नजरेत बघुन, त्याने कितीही लपवलं तरी, न सांगता, आपोआपच कळु लागतात?