Home Blog Page 116

१५२ वर्षांनंतर बघूया “सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स”

भारतातून जरी पूर्णवेळ चंद्रग्रहण दिसणार नसलं तरी आपल्याला ह्या अदभूत घटनेच साक्षीदार होता येणार आहे. सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स हे ग्रहण आपण आरामात उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. त्यामुळे ग्रहणाचा आनंद अजून चांगल्या पद्धतीने घेता येणार आहे.

गो इस्ट- अनोखं पूर्व भारत!!

निवडणुका ते देशात घडणाऱ्या घटना असो. आपण कधी अरुणाचलप्रदेश किंवा मिझोरम मध्ये लागलेल्या आगीची बातमी ऐकतो का? तिथल्या संपाची बातमी येते का? मिडियामधील एक तरी जण तिथल्या लोकप्रतिनिधी ची बाईट घेतो का? किंवा तिथल्या लोकांना काय वाटते हे कधी समोर येत पण नाही.
Investment Wisdom

तूच आहेस तुझ्या गुंतवणुकीचा शिल्पकार!

आपले दीर्घकालीन धेय्य लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लवलरात लवकर गुंतवणुक केली जावी.  हे करीत असतांना चलनवाढीवर मात करणारा परतावा मिळावा म्हणून जोखिम स्वीकारायची गरज असते. आपण जीवनात अनेक गोष्टीकडे अगदी बारीक सारीक गोष्टींकडे काटेकोर लक्ष देतो. मात्र ज्यावर आपले ध्येय अवलंबून आहे त्याकडे अधिक डोळसपणे पहायला हवे ते विसरतो.

६००० वर्षापूर्वीचे दोन सूर्य- सुपरनोव्हा (Supernova)

सुपरनोव्हा म्हणजे काय? तर जन्म होतानाच कोणत्याही ताऱ्याचा अस्त हा ठरलेला असतो. अणुप्रक्रियेमुळे निर्माण झालेली उर्जा किंवा बल आणि आपल्या वस्तुमानामुळे असलेल गुरुत्वीय बल हे जोवर समान तोवर ताऱ्याचं आयुष्य!!
करनियोजन

सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन

आणखी थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितिचा अंदाज  घेवून वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेवून करबचत करणे शक्य असून आपण त्याना मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेवू
ISRO-100-satelite

१२ जानेवारी २०१८ ला I.S.R.O लॉन्च करणार १०० वा सॅटेलाईट

उद्या म्हणजेच १२ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी Indian Space Research Organisation (ISRO) आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करत आहे. एकेकाळी चाचपडणारी अवकाश एजन्सी ते जगातील अद्यावत स्पेस एजन्सी मधील एक हा इस्रो चा प्रवास थक्क करणारा असाच आहे. आपला पहिला उपग्रह बैलगाडीतून आणि रॉकेट सायकल वरून नेणाऱ्या इस्रो अर्थात "इंडिअन स्पेस एजन्सी" आज सूर्यावर, चंद्रावर, मंगळावर, शुक्रावर जाण्यासाठी मोहिमा आखत आहे.
Oyumuamua

आपल्या सौरमालेत प्रवेश करणारा पहिला एलिअन ऑब्जेक्ट- “ओयुमुआमुआ”

आपल्या विश्वाचा पसारा इतका मोठा आहे की खूप कमी गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. ओयुमुआमुआ सारखे ऑब्जेक्ट कधीतरी एकदाच आपल्याला अभ्यासाची संधी देतात. त्यामुळे अनेक ज्ञात नसणाऱ्या गोष्टी ज्ञात आणि एकूणच विश्वाच्या जडणघडणी बद्दल अधिक माहिती मिळते. माणूस खूप सूक्ष्म प्राणी आहे. पण आपल्यासारखं कोणीतरी अजून आहे का ह्या शोधासाठी आत्ता कुठे तो आपल्या घराच्या आजूबाजूला बघायला लागला आहे.
Higgs Boson

माहित आहे का, हिग्स बोसॉनच्या शोधात भारताचे योगदान!!

आपल्या भारतीयांना हे माहित नसेल की पूर्ण विश्वाच्या निर्मितीच्या मागे असणाऱ्या कणाच्या शोधामागे एका भारतीय  शास्त्रज्ञाचे खूप मोठे योगदान आहे. सत्येंद्रनाथ बोस ह्यांनी प्रथम मांडलेल्या कल्पनेवर पुढील संशोधन झाल आहे.

सेबीने सुचविल्याप्रमाणे म्यूचुअल फंडांच्या योजनांचे नविन वर्गीकरण 

गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी ६ ऑक्टोबर २०१७ रोजी सेबीने सर्व फंड हाउसना एक परिपत्रक पाठवून त्यांच्याकडील सर्व निरंतर योजनांची (open ended scheme) विभागणी पाच प्रकारांत करण्यास सूचवले आहे. त्यांचे ठळक उपप्रकारही सूचवले आहेत.
जुने कॅमेरे

फोटोंचा बदलता जमाना आणि बदलत्या जमान्यातले आपण!!

फोटो कसा आला ते कळायला काही मार्गच नसायचा. फोटो जेव्हा धुवून येतील तेव्हा कळायचं आपण नक्की काय बंदिस्त केल. त्यात कोणाचं डोक कापलं की कोणाचा हात! लहानपणी आपल्या आठवणी कुठेतरी सांभाळून ठेवणे हे दुय्य्म असायचं. कोणताही क्षण मनसोक्त जगून त्याची मज्जा घेऊन मग कधीतरी आठवण झाली तर त्या जपवून ठेवाव्या अस वाटायचं. एखाद भावंड, कुटुंब, किंवा मित्र – मैत्रिणींचं गेट टू गेदर असून दे अथवा मे महिन्याची किंवा दिवाळीची सुट्टी असू दे. सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ते क्षण अनुभवणं.