आर्थिक चुका टाळण्यासाठी गुंतवणूक आणि बचत यातला फरक समजून घ्या
मी सहावीत असताना हिंदीच्या क्रमीक पुस्तकात ' शेखचेल्ली ' चा धडा होता. तो झाडाच्या ज्या फांदीवर बसला होता तीच तोडत होता. पैशाचे महत्व आपल्याला माहीत आहेच यावर वेगळे सांगण्याची गरज नाही. तरीही आपण या शेखचेल्लीसारखे वागून आपल्याच विनाशास कारणीभूत ठरत आहोत. आर्थिकबाबिंतील खालील त्रुटी आपण नक्कीच टाळू शकतो.
प्रिमार्केट ओपनिंग आणि पोस्ट क्लोजिंग
भागबाजारा (Stock Market) मधे व्यवहार करताना आपण सर्वसाधारणपणे बाजारांच्या वेळेत आपला व्यवहार होइल असे सौदे (Orders) टाकतो . ह्या ऑर्डर्स आपण प्रचलित बाजारभावाप्रमाणे (Market Orders) किंवा विशिष्ट भावाने (Limit Orders) टाकतो हे आपल्याला माहीत आहेच .BSE /NSE सकाळी ०९:१५ ते दुपारी ०३:३० या वेळात सुरू असते.
जमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी – ७/१२ उतारा कसा पाहावा
जमीन खरेदी करणे हा बराचसा किचकट व्यवहार आपण समजतो. पण त्यातील काही आवश्यक नियमांची माहिती खरेदी करण्याआधी घेऊन आपण खात्रीशीर व्यवहार नक्कीच करू शकतो. आज आपण जमीन खरेदी करण्याआधी कुठली प्रार्थमिक काळजी घ्यावी याविषयी बोलू.
बाजारातील गतिरोधक आणि थांबे… (Circuit filter/breaker)
भागबाजारात इतर कोणत्याही बाजाराप्रमाणे समभागांचे भाव वर खाली होत असतात. एकाच वेळी अनेक हेतूने येथे गुंतवणूक केली जाते आणि कमीत कमी तोटा आणि अधिकाधिक फायदा, असा येथे भाग घेणाऱ्या प्रत्येकाचा हेतू असतो. सर्वसाधारणपणे मागणी आणि पुरवठा या तत्वाप्रमाणे -- म्हणजे मागणी अधिक आणि पुरवठा कमी असेल भावात वाढ व पुरवठा अधिक आणि मागणी कमी असेल तर भावात घट होते. भागबाजारात वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार एकाच वेळी व्यवहार करीत असल्याने त्यांच्या सामूहिक मानसिकतेवर बाजार वरखाली होत असतो आणि तो कोणतीतरी एक दिशा पकडतो.
महाराष्ट्र शासनाची “लेक माझी भाग्यश्री – सुधारीत योजना “
मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींचे शिक्षण व आरोग्याचा दर्जा वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणारी " माझी कन्या भाग्यश्री योजना" १ ऑगस्ट २०१७ पासून सुधारीत स्वरूपात राबविण्यात येणार आहे. आता वार्षिक उत्पन्न साडेसात लाखांपर्यंत असणाऱ्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
सोन्यात गुंतवणूक करण्याच्या विविध योजना
अनेक जण परंपरेप्रमाणे सणासुदीला, वाढदिवसाला, लग्नाला सोने किंवा दागिने खरेदी करतात अडीअडचणीस उपयोगी येईल म्हणून ही खरेदी केली जाते. आपल्या उत्पन्नातील सरासरी तेरा टक्के रक्कम यात अडकवली जात असून प्रत्यक्षात अगदीच नाईलाज झाला तरच त्याची विक्री केली जाते. सहसा यातून पैसे मिळवावे हा हेतू नसतो.
भारतातील गुंतवणूकदारांचे प्रकार कोणते आणि आपण त्यातील कोण?
येथे भाग घेणारी प्रत्येक व्यक्ति वेगळी आहे त्याच्या गरजा, गुंतवणुक करण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे त्याची मानसिकता वेगवेगळी आहे या सर्वांचा एकत्रित सामूहिक परिणाम हा बाजारातल्या किंमतीवर होत असतो. बाजारात आपणास किंमत दिसत असते परंतू त्याचे मूल्य शोधून नफा मिळवणे ही येथे येणाऱ्या व्यक्तीगत अथवा संस्थात्मक गुंतवणूकदाराची इच्छा असते.
प्रधानमंत्री आवास योजना – होम लोन व्याज दरावर सब्सिडी २०१७
आपले स्वतःचे हक्काचे घर ? असावे हे मध्यमवर्गीय किंवा गरीब माणसाचे आयुष्यातले एक महत्वाचे स्वप्नच असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजे घर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घेतलेल्या होम लोनवर सब्सिडी वाढवून देण्याची घोषणा केली आहे. कल्याण येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत साधारण २.५० लाख ते ३ लाख सबसिडी देणारे गृहप्रकल्प सध्या बांधकाम चालू स्तिथीत आहेत. साधारण १ वर्षापर्यंत याचे हस्तांतरण होऊ शकेल. याबद्दल माहितीसाठी खालील अभिप्रायात किंवा Contact Us आपण संपर्क साधू शकता. यातील एक प्रकल्प येथील Image मध्ये आपण पाहू शकता.
गूगलचे नवे पेमेंट अॅप “TEZ”
ऑनलाईन जगात अग्रस्थान पटकावणाऱ्या गूगलने पेमेंटच्या दुनियेत मोबाईलवरून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तेज (हिंदीतील तेझ हा शब्द, जो ' वेग' या अर्थाने वापरला जातो) या नावाचे अॅप भारतीय बाजारात आणले आहे .१८ सप्टेंबर २०१७ रोजी या अॅपचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक छोटा व्यवहार करून केले. हे वॉलेट नाही, नॅशनल क्लिअरींग कॉरपोरेशने UPI (Unified Payment Interface) ही प्रणाली एक वर्षापुर्वी विकसित केली होती.
बिगर शेती म्हणजेच, एन.ए. प्लॉट विकत घेताना! प्रामुख्याने घ्यावयाची काळजी
जमीन विकत घेणे हे वेळखाऊ व महागडे प्रकरण आहे. ती विकत घेण्याच्या पहिल्या टप्प्यापासून किचकट तर असतेच, पण जागा विकत घेणे व त्याची देखरेख करणे यासाठी जरा जास्तच पैसे मोजावे लागतात. पुन्हा स्वच्छ व स्पष्ट नामाधिकार अहवाल याबाबत काही वाद असण्याच्या शक्यता तसेच अन्य बाबींची पूर्तता या सर्व गोष्टी कंटाळवाण्या असतात.