Home Blog Page 174
money market

जाणून घेऊ नाणेबाजार (Money Market ) बद्दल

वित्तीय बाजाराचे नाणेबाजार, भांडवल बाजार आणि विदेशी चलन बाजार हे महत्वाचे घटक आहेत. यांपैकी नाणेबाजार या घटकाची माहिती करून घेवूयात. सामन्यतः बाजार म्हटले की वस्तुची देवाण घेवाण होत असणारे मंडई सारखे ठिकाण डोळ्यासमोर येते. अर्थशास्त्राच्या दृष्टीने बाजार म्हणजे वस्तु आणि सेवा यांची देवाणघेवाण, यासाठी विशिष्ठ ठिकाण हवेच असे नाही.
Aabachi Thali

पुण्यातल्या लक्ष्मीरोडवरची “आबाची थाळी”

मी फारसा फुडी, फूड फ्रिक वगैरे नाही. पण रसिक आणि आस्वादक आहे. समोर आलेली थाळी प्रेक्षणीय असावी एवढाच आग्रह! आणि या कसोटीवर आबाच्या थाळीने बाजी जिंकली!! थाळी टेबलवर येताक्षणी धनगरी चिकनने भरलेल्या छोट्या डिशवर दरवळणाऱ्या सुगंधाने दिल खुश केलं. आणि पहिली खात्री पटली की अगदीच काही अंदाज चुकलेला नाहीये.
Neptune Uranus

नेप्च्यून आणि युरेनसवर पडणारा हिऱ्यांचा पाऊस आणि प्रयोगशाळेत हिरेनिर्मिती!!

"हिरा है सदा के लिये" असं म्हणत आपण त्याची स्वप्न बघतो. हिऱ्यांचा पाउस खरे तर स्वप्नवत गोष्ट पण ती प्रत्यक्षात आपल्या सौरमालेत घडते हा शोध नक्कीच एक सुखद धक्का देणारा आहे. जरी नेप्च्यून आणि युरेनसवर आपण जाऊ शकलो नाही तरी अश्या पद्धतीने हिऱ्यांची निर्मिती करणे शक्य आहे, हे ही नसे थोडके.
rbi

बँकांकडून केली जाणारी एकतर्फी शुल्कवसुली

रिझर्व बँकेने सेवांवर शुल्क आकारणिस सर्व बँकांना परवानगी दिली आहे, त्याचे दर आणि संख्या ठरवण्याचे स्वातंत्र दिले आहे. ज्या ग्राहकांच्या ठेवींवर आपण सर्वाधिक नफा मिळवतो त्यांना त्यांच्या गरजेच्या सेवा या विनामूल्य मिळायलाच हव्यात नव्हे किंबहुना त्याचा तो हक्कच आहे या गोष्टींकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे.

१५२ वर्षांनंतर बघूया “सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स”

भारतातून जरी पूर्णवेळ चंद्रग्रहण दिसणार नसलं तरी आपल्याला ह्या अदभूत घटनेच साक्षीदार होता येणार आहे. सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स हे ग्रहण आपण आरामात उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. त्यामुळे ग्रहणाचा आनंद अजून चांगल्या पद्धतीने घेता येणार आहे.

गो इस्ट- अनोखं पूर्व भारत!!

निवडणुका ते देशात घडणाऱ्या घटना असो. आपण कधी अरुणाचलप्रदेश किंवा मिझोरम मध्ये लागलेल्या आगीची बातमी ऐकतो का? तिथल्या संपाची बातमी येते का? मिडियामधील एक तरी जण तिथल्या लोकप्रतिनिधी ची बाईट घेतो का? किंवा तिथल्या लोकांना काय वाटते हे कधी समोर येत पण नाही.
Investment Wisdom

तूच आहेस तुझ्या गुंतवणुकीचा शिल्पकार!

आपले दीर्घकालीन धेय्य लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लवलरात लवकर गुंतवणुक केली जावी.  हे करीत असतांना चलनवाढीवर मात करणारा परतावा मिळावा म्हणून जोखिम स्वीकारायची गरज असते. आपण जीवनात अनेक गोष्टीकडे अगदी बारीक सारीक गोष्टींकडे काटेकोर लक्ष देतो. मात्र ज्यावर आपले ध्येय अवलंबून आहे त्याकडे अधिक डोळसपणे पहायला हवे ते विसरतो.

६००० वर्षापूर्वीचे दोन सूर्य- सुपरनोव्हा (Supernova)

सुपरनोव्हा म्हणजे काय? तर जन्म होतानाच कोणत्याही ताऱ्याचा अस्त हा ठरलेला असतो. अणुप्रक्रियेमुळे निर्माण झालेली उर्जा किंवा बल आणि आपल्या वस्तुमानामुळे असलेल गुरुत्वीय बल हे जोवर समान तोवर ताऱ्याचं आयुष्य!!
करनियोजन

सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन

आणखी थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितिचा अंदाज  घेवून वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेवून करबचत करणे शक्य असून आपण त्याना मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेवू
ISRO-100-satelite

१२ जानेवारी २०१८ ला I.S.R.O लॉन्च करणार १०० वा सॅटेलाईट

उद्या म्हणजेच १२ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी Indian Space Research Organisation (ISRO) आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करत आहे. एकेकाळी चाचपडणारी अवकाश एजन्सी ते जगातील अद्यावत स्पेस एजन्सी मधील एक हा इस्रो चा प्रवास थक्क करणारा असाच आहे. आपला पहिला उपग्रह बैलगाडीतून आणि रॉकेट सायकल वरून नेणाऱ्या इस्रो अर्थात "इंडिअन स्पेस एजन्सी" आज सूर्यावर, चंद्रावर, मंगळावर, शुक्रावर जाण्यासाठी मोहिमा आखत आहे.