कमी खर्चात सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्रातली १० पर्यटनस्थळे
नवीन वर्षाचे कॅलेंडर बघताना तुम्ही त्यातील लॉन्ग वीकएंड हेरून ठेवलेच असतील ना? या वीकएंडचे नियोजन सुद्धा तुम्ही सुरु केले असेलच. लॉन्ग वीकएंड म्हटले की फिरायला जायचे डोक्यात येते आणि फिरायला जायचे म्हटले की आपल्या जवळपासची काही ठराविक ठिकाणेच आपल्या डोळ्यासमोर येतात. कमी खर्चात सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्रातली १० पर्यटनस्थळे
मूक गोष्टींचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा : एक गुरूमंत्र
जेव्हा कोणी एखाद्या गटाचं प्रतिनिधित्व करत असेल, कुटुंब प्रमुख असेल, एखाद्या मोठ्या हुद्द्यावर असेल तर अशा व्यक्तीला त्याला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती हवीच. कोणाला अडचण येणार नाही अशी व्यवस्था न सांगता करता आली पाहिजे. भांडण तंटे, वादविवाद न होता सुरळीतपणा जपता आला पाहिजे.
मार्क जुकरबर्ग – संघर्ष आणि यशाची एक कहाणी
प्रत्येक व्यक्तिला आयुष्यात काहीतरी वेगळं करावसं वाटतं. वेगवेगळी स्वप्न असतात. बरेचजण त्याचा पाठपुरावा करतात. पण प्रत्येकाला यश मिळतंच असं नाही. काही जणांना कदाचित उशीरा यश मिळतं. काहीजण लहान वयात खूप काही कमवतात. प्रत्येकाला मिळणारी संधी, कष्ट, चिकाटी अशा बऱ्याच गोष्टी जुळूनही याव्या लागतात.
आयुष्याच्या एका नव्या कोऱ्या वर्षाची सुरुवात करताना या गोष्टी लक्षात ठेवा
मित्रमैत्रिणींनो, एका वर्षातून दुसऱ्या वर्षात पदार्पण करताना जसे अनेक पण केले जातात तसे यंदा तुम्हीही केले असतील. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातच साधारण पुढच्या वर्षात काय करायचे याचे आराखडे केले जातात.
तोंड आल्यामुळे त्रस्त आहात का?? करा हे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय
आपल्यापैकी बहुतेकांना मसालेदार चमचमीत खायला आवडतं. पण कधीतरी असं होतं कि ते खात असताना तोंडात एखाद्या बाजूला खाणं अचानक झोंबायला लागतं. पुढचा घास खाऊ की नको असा प्रश्न पडतो. असं बहुतेकांना होतं. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. पण अशा परिस्थितीत आपल्या समोर एखादा आवडता पदार्थ आला, तोंडाला पाणी सुटलं तरी संयमच ठेवावा लागतो. या लेखात आपण जाणून घेऊ की, असं होण्याची कारणं काय आणि त्यावर घरगुती उपाय काय
ओव्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
तब्येतीच्या अनेक छोट्या-मोठ्या तक्रारींवर उपाय हे आपल्या घरातच दडलेले असतात. आपल्या रोजच्या वापरात असे अनेक घटक असतात जे तब्येतीसाठी केवळ फायदेशीरच नसतात, तर अनेक समस्यांवर उपाय सुद्धा असतात. पोटदुखी, घसादुखी, खोकला, मळमळ अशा त्रासांवर तर हे उपाय हमखास यशस्वी ठरतात. अशाच आपल्या नेहमीच्या वापरातला, काही पदार्थात आवर्जून घातला जाणारा पदार्थ म्हणजे ओवा.
जबाबदारीचं ओझं होऊन ताण येतोय का तुमच्यावर?? मग ताणाशी दोन हात करा
'अरे भैय्या ऑल इज वेल' गाणं आठवतय का?? तुम्ही जर तणावाखाली असाल तर ते नक्की गुणगुणत रहा. आयुष्य म्हटल्यावर नातेसंबंध, नोकरी, घरची जबाबदारी, एकंदर कामाचा ताण हा येणारच. म्हणून काही या गोष्टी सोडून देता येत नाहीत. धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय, हे होणारच.
प्लॅस्टिकच्या भांड्यावरचे चिवट डाग आणि दुर्गंधी घालवण्यासाठी उपाय
ठराविक पदार्थ सतत त्यातच ठेवल्यामुळे पदार्थाचा वास त्या भांड्याला येतो. दुसरा पदार्थ त्यात ठेवता येत नाही. इतकंच नाही तर काही पदार्थांचे चिवट डाग भांड्याला लागतात. त्यामुळे काही दिवसांनी प्लास्टिकच्या वस्तू खराब दिसू लागतात. प्लॅस्टिकच्या भांड्यावरचे चिवट डाग आणि दुर्गंधी घालवण्यासाठी उपाय वाचा या लेखात.
तिळाचे आहार आणि तब्येतीच्या दृष्टीने होतात हे १५ फायदे
तिळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या औषधांमधे तिळाच्या अंशाचा वापर होतोच. विशेषतः संधिवात, मधुमेह, ह्रदयरोग यासाठी तिळाचं महत्त्व खूप आहे. अशा दुर्धर आजारांची तीव्रता कमी करण्यासाठी दररोज ठराविक प्रमाणात तिळाचे सेवन उपयुक्त आहे. म्हणूनच या लेखात आपण तिळाचे १५ उपयोग काय आहेत ते पाहुया.
तुमचा उत्स्फूर्तपणा आणि आयुष्यातला रस हरवत चालला आहे का ??
खरंच गेल्या वर्षभरात आपण वेगळ्याच अवस्थेतून जात होतो. कारणं बरीच आहेत, परिणाम मात्र सर्वसाधारण एकच. सतत घरात बसून राहणं, कित्येकजण सुशिक्षित बेरोजगार, आर्थिक चणचण, कुणाची आजारपणं थोडक्यात काय तर प्रत्येक जण कुठेतरी हरवलेला.