Tagged: आकर्षणाचा सिद्धांत
जुन्या चित्रपटांची गाणी खुपच कर्णमधूर असायची. त्या गाण्यांचे शब्द, त्या गाण्याचं संगीत काळजाचा ठाव घ्यायचं. आजकाल मात्र तशी आवर्जून ऐकावीत, पुन्हा पुन्हा गुणगुणावीत अशी श्रवणीय गाणी खुपच कमी बनतात. आजकाल अर्थहीन आणि धांगडधिंगा गाणी बनवण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
रोजच्या जगण्यामध्ये पाण्याला किती महत्व आहे? सकाळी उठल्यावर पहिली कृती आपण काय करतो. जोपर्यंत आपण आपल्या चेहऱ्यावर पाण्याचे फटकारे मारत नाही तोपर्यंत आपला दिवस सूरूच होत नाही. पाण्याचे तुषार, पाण्याच्या थेंबांचा स्पर्श माणसामध्ये चैतन्य निर्माण करतो.
कुठल्याही मोठ्या आणि असामान्य कामाचा उगम एका छानशा कल्पनेतूनच होतो. कल्पना येणं फारसं आव्हानात्मक आणि अवघड नसतं. पण त्या कल्पनेला वास्तवात साकारण्यासाठी न थकता प्रयत्न करत राहणं यासाठी एक अत्यावश्यक गोष्ट म्हणजे ज्वलंत इच्छाशक्ती.