आपला चेहरा सुंदर असावा असं कुणाला वाटत नाही? आज प्रदूषणयुक्त जीवनात चेहरा नितळ, तजेलदार ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्टची मदतही घेतली जाते. आज आपण स्वयंपाकघरातल्या अशाच काही मोजक्या पदार्थांविषयी माहिती घेऊया.
कपड्यांवरचे आंब्याचे, चहाचे डाग बघून फक्त जाहिरातीतलीच आई हसू शकते. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र असे चिकटून राहणारे, अजिबात न जाणारे डाग बघितले की कोणालाही टेन्शनच येईल, त्यात कपडे जर नवीन असतील आणि पहिल्यांदाच घातले असतील तर काही विचारायलाच नको.