Tagged: दुर्गाशक्ती

रुक्साना कौसर 0

कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याचा बहादुरीने खात्मा करणारी रुक्साना कौसर

रुक्साना कौसर ही ह्याच जम्मू काश्मीर इथल्या रेजौरी जिल्ह्यात राहणारी एक साधी पहाडी गुज्जर कुटुंबातली एक मुलगी. तिचं घर हे जम्मू काश्मीर मधल्या अतिशय संवेदनशील भागात होतं. कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याचा बहादुरीने खात्मा करणाऱ्या रुक्साना ची रोमहर्षक कहाणी या लेखात वाचा.

चंद्रयान २ 0

मंगळस्वारी असो कि चंद्राची वारी इस्रो मधली नारीशक्ती जगात भारी!!

भारतीय संस्कृतीचं प्रतिक असलेल्या साड्या घालून अगदी केसात गजरा माळून मंगळयान मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करताना इस्रो च्या स्त्री वैज्ञानिकांना बघून पूर्ण जग अवाक झालं होतं. चूल आणि मुल ह्यात अडकलेली भारतीय नारी भारताच्या मंगळ मोहिमेत आपला सिंहाचा वाटा उचलताना बघून पूर्ण जगाने तोंडात बोटे घातली होती.

मेरी कोल्विन 0

सीरियामध्ये युद्धकाळात राहिलेली निडर युद्ध संवाददाता, ‘मेरी कोल्विन’

‘मेरी कोल्विन’ जगातील एक अग्रगण्य वृत्तपत्र ‘द संडे टाईम्स’ मध्ये युद्ध संवाददाता म्हणून नोकरीला होती. मेरी प्रसिद्धीला आली ती १९८६ साली. लिबिया चे प्रमुख ‘मुआमार गद्दाफी’ ह्यांची मुलाखत घेणारी मेरी पहिली पत्रकार होती. ह्या मुलाखतीत गद्दाफी ह्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रेगन ह्यांना ‘मूर्ख, वेडा आणि इस्राईलचा कुत्रा म्हटलं होतं.

कार्नेलिया सोराबजी 0

भारतातल्या पहिल्या महिला वकील असलेल्या नाशिकच्या कार्नेलिया सोराबजी

स्त्रियांना कोणी वाली नाही अशी समाजाची स्थिती असताना या स्त्रियांसाठी ती देवदूतासारखी होती. या काळात आपल्या समाजात वारसाहक्क, इस्टेटीच्या वाटण्या, गादीचा हक्क, दत्तक व सावत्र मुलं यांचे प्रश्न मोठय़ा प्रमाणावर असत. अश्या स्त्रियांसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम करायचा निर्णय कार्नेलियाने घेतला.

प्रियंका योशिकावा 0

कोण आहे वंशवादाचा बळी ठरलेली प्रियंका योशिकावा

६ सप्टेंबर २०१६ ला ‘मिस जपान’ चा किताब मिळवणारी प्रियांका वंशवादाची शिकार होत जपानमध्ये लहानाची मोठी झाली. वंशवाद किंवा racism म्हणजे एका वंशाच्या लोकांकडून दुसऱ्या वंशाच्या लोकांबरोबर भेदभाव केला जाणं. जगभर चालणाऱ्या या वंशवादाला प्रियंकाला तोंड द्यावं लागलं याचं कारणही काहीसं वेगळंच होतं.

नजत बेल्कासम 0

शेळ्या चारत मोठी झालेली नजत बेल्कासम वयाच्या ३७ व्या वर्षी शिक्षण मंत्री होते?

नजत बेल्कासम, फ्रांस मधल्या एका गरीब कुटुंबातली मुलगी. शेळ्या मेंढ्या चारत नजत लहानाची मोठी झाली. गरिबीतही आई वडिलांनी शक्य तसे शिक्षण दिले. आणि आपला अभ्यास एकाग्रचित्त होऊन नजत करत गेली. आणि हीच नजत बेल्कासम मोठी होऊन फ्रान्सची शिक्षण मंत्री झाली.

मन कौर 1

१०३ व्या वर्षी धावण्याच्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या मन कौर कोण आहेत?

मन कौर’ ह्या एका भारतीय धावपटूनेही आपल्या जिद्दीने वयाला लाजवलेलं आहे. १४ मुलांची पणजी, ९ मुलांची आजी, ३ मुलांची आई असणाऱ्या ‘मन कौर’ ह्यांनी वयाच्या १०३ व्या वर्षी ‘वर्ल्ड मास्टर’ स्पर्धेत, स्पेन इथे सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. आजवर ३० पेक्षा जास्त सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या मन कौर ह्यांनी आपल्या कर्तृत्वाने सर्वांपुढेच एक आदर्श ठेवला आहे.

दिक्षा दिंडे 0

अपंगत्वावर मात करून जगाच्या पटलावर आपलं नाव उमटवणारी दिक्षा दिंडे

व्यवसायाने काळी रिक्षा चालवणारे वडील आणि शिवणकाम करणारी आई अशी अगदी बेताची परिस्थिती असताना पण तिच्या आई- वडिलांनी सगळ्या समाजाकडून येणारे टक्के टोमणे आणि सहानभुतीच्या नजरांना झेलत दिक्षाला तिच्या पायावर उभं करण्यासाठी तिची साथ देण्याचा पण केला.

सालूमरडा थिमाक्का 0

पोटचं मूल नसल्याचं दुःख दूर करून झाडांचीच आई झालेली सालूमरडा थिमाक्का

आई बनण्याचा क्षण आपण अनुभवू शकत नाही हे शल्य कुठेतरी त्यांना आत्महत्येचा विचार करायला प्रवृत्त करत होतं. पण थिमाक्का च्या जोडीदाराने त्यांना आजूबाजूच्या निसर्गाची आई बनण्याचा सल्ला दिला. मग सुरु झाला एक असा प्रवास ज्याने सालूमरडा थिमाक्काचं आयुष्य तर पूर्ण बदललंच पण त्यासोबत निसर्गाला जोपासण्याची एक चळवळ सुरु झाली.

राहीबाई सोमा पोपेरे 0

जगातल्या १०० प्रभावशाली महिलांमध्ये नाव असलेल्या अशिक्षित राहीबाई कोण आहेत?

राहीबाईंच्या कामाची नोंद दस्तुरखुद्द भारत सरकार ते बी.बी.सी. ह्या सर्वांनी घेतली आहे. बी.बी.सी. ने २०१८ सालातल्या जगातल्या सगळ्यात प्रभावशाली पहिल्या १०० महिलांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. तसेच भारत सरकारने २०१९ चा नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरव केला आहे.