Tagged: राजकारण

घरात घुसून मारू 0

घरात घुसून मारू; राज ठाकरे नि मोदींचे ब्रीदवाक्य

देशभरात 2019 ची लोकसभा निवडणूक खूप गाजली. ओम ने रोमचा पराभव केला अशी भावना लोकांमध्ये आहे. लोकशाही विरुद्ध राजेशाही अशीही ही निवडणूक होती व यामध्ये लोकशाहीचा विजय झाला. हा विजय अनेक लोकांच्या पचनी पडलेला नाही.

काँग्रेस 0

काँग्रेस आतातरी बोध घेणार का?

सतराव्या लोकसभेचे निकाल लागलेले आहेत. “प्रचंड’ या एकाच शब्दाने ज्याचे वर्णन करावे लागेल असा विजय मिळवून नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले आहे. तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पुन्हा साफ अपयशी ठरली आहे. २०१४ प्रमाणेच या वेळी ही काँग्रेस नुसती हरली नाही तर तिचे पानिपत झाले.

राजकारण 0

पडद्या ‘मागचं’ राजकारण

चित्रपटसृष्टीमधे सध्या चरित्रपटाची लाट आली आहे. हिंदी असो, मराठी असो कि दाक्षिणात्य फिल्म इंडिस्ट्री असो सगळीकडे ‘बायोपिक’ची धूम सुरु आहे. एकदा प्रयोग रसिकांच्या पसंतीला उतरला आणि व्यावसायिकदृष्ट्या त्याचे फलित समोर आले तर त्या प्रकारचे सिनेमे बनविण्याचा एक ट्रेंडच दिसायला लागतो.

जुमलेबाज 0

आता आश्वासनांच्या घोडदौडीत जुमलेबाज राजकारण्यांपासून सावध राहायला हवं!

भारतीय जनता पार्टीने भारतीय राजकारणात ‘जुमला’ या नव्या शब्दाची यानिमित्ताने भर घातली आहे. या पायंड्यानंतर आता तर कुठलीही भीडभाड न ठेवता राजकीय पक्षाचे नेते जनतेला भूलथापा देताना दिसत आहेत. कारण निवडणुका झाल्यांतनर तो एक जुमला होता असे म्हणायलाही ते आता मोकळे आहेत.

उर्जित पटेल 0

श्री. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याचे विश्लेषण

श्री. उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बॅकेच्या गव्हर्नरपदाचा राजिनामा दिला. आणि माध्यमांत ‘हडकंप’ (वृत्तवाहिन्यांचा आवडता शब्द) झाला.. बाजारांत तो आज होईल अशी ‘आशंका’ होती. या पार्श्वभुमीवर एक सामान्य गुंतवणुकदार म्हणुन माझे आकलन मला सांगावयाचे आहे.

उलगुलान 0

उलगुलान!

या भूमिकेतून शेतकरी वर्ग उलगुलान अर्थात विद्रोहाचा मार्ग स्वीकारू लागला आहे. मात्र तरीही सरकारची संवेदना जागृत होत नाहीये. सात महिन्यापूर्वी हजारो शेतकरी-कष्टकरी शेकडो मैलाचा पायी प्रवास करून राजधानीत आले. संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने त्यांनी आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

मराठा आरक्षण 0

मराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही संपूर्ण राज्याची इच्छा आहे. म्हणूनच या मागणीला कोणीही विरोध केला नाही. त्यामुळे सरकार मराठा आरक्षण घोषित करत असेल तर राज्य सरकरचे अभिनंदन करत संपूर्ण राज्य याचा आनंद साजरा करेल. फक्त हा निर्धोक असावा. लोकसभा निवडणूका जेमतेम सहा महिन्यावर आल्या असताना मराठा आरक्षणावर निर्णय घेतल्या जातोय, त्यामुळे फक्त निवडणुकांच्या अनुषंगाने निर्णय घेतला जाऊ नये.

देवेंद्र फडणवीस 0

चार वर्षाचा जमा-खर्च

लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शी कारभार, पायाभूत सुविधा, अच्छे दिन, महागाई कमी, भारनियमन बंद, रोजगार, आरोग्य, शेती सुधारणा आशा कितीतरी आश्वासनांची साखरपेरणी करीत सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारला पाहता पाहता चार वर्षे पूर्ण झाली.

भारनियमन 0

‘विकासा’च्या दिव्याखाली नियोजनाचा ‘अंधार’!

प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळी सणाच्या प्राश्वभूमीवर लोडशेडिंगमुक्त झालेल्या महाराष्ट्रातून ‘प्रकाश’ बेपत्ता करण्याचे षडयंत्र कुणाचे ? याचे उत्तर मुख्यमंत्री देणार आहेत का ? एकीकडे स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, अजून कितितरी भारदास्त नावाचे प्रकल्प राबविण्याच्या घोषणा सरकार करत आहे, महाराष्ट्राला देशातील सर्वात प्रगत राज्य बनविण्याच्या वलग्ना सरकारकडून करण्यात येत असताना राज्याला पुन्हा लोडशेडिंगच्या अंधारात जावे लागत असेल तर, हेच अच्छे दिन आहेत का?

गहाणखत 0

सत्ताधाऱ्यांचे बौद्धिक ‘गहाणखत’?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गोष्ट आहे, छत्रपतींना पैश्याची गरज होती. राजांनी विचार केला काय करावे? शेवटी सावकारकडे गेले आणि कर्जाची मागणी केली. सावकाराने छत्रपतींना काही तरी तारण ठेवण्याची मागणी केली. त्यावर राजे उद्गारले ‘अरे मी काय तारण ठेवणार, माझ्या मालकीचे काय आहे..