Tagged: व्यवसाय मार्गदर्शन
एका व्यक्तीने किंवा तीन-चार जणांच्या ग्रुपने मिळून हा व्यवसाय सुरू केलेला असतो. स्टार्ट अप बिझनेस आयडिया ह्या नेहमीपेक्षा वेगळ्या, युनिक असतात. सुरुवातीला या व्यवसायाचे स्वरूप अगदी छोटेसे, घरगुती असे असू शकते. परंतु जसजसा जम बसत जातो तसतशी या व्यवसायात प्रगती होऊन भरपूर पैसे कमवता येतात.
प्रत्येक क्षण अमूल्य असतो, ओळखा त्याला, करोंडोंचा बिझनेस करतोय MBA चहावाला. आणि व्यवसायाच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी
मोत्यांची शेती हा असा एक व्यवसाय आहे ज्यात केवळ रुपये 25 हजार इतकी गुंतवणूक करून सुमारे तीन लाख इतका फायदा होऊ शकतो. त्याशिवाय या शेतीसाठी केंद्र सरकारकडून ५० टक्के सबसिडी मिळते.
इलेक्ट्रिकल किंवा हार्डवेअर वस्तूंचे दुकान, कपड्यांचे दुकान, किरकोळ वस्तूंचे दुकान असणाऱ्या व्यावसायिकांना आता त्यांची रोजची विक्री वाढवणे खूप गरजेचे आहे. ह्यासाठी नुसता दुकानाचा आकर्षक बोर्ड किंवा काय मिळते हे लिहिलेल्या पाट्या उपयोगी नाहीत. दुकानात आलेला ग्राहक रिकाम्या हाती परत जाता कामा नये म्हणून दुकानदाराने विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
सध्या आपला सगळ्यांचाच कल हा मुलांना ‘हेल्थी फूड’ देण्याकडे असतो. पण कुठलेतरी स्नॅक्स पाहिजेच, हा जो मुलांचा हट्ट असतो तो आपण सगळेच ‘स्नॅक्स’ आणि त्यातल्या त्यात हेल्थी म्हणून, केळ्यांचे वेफर्स देऊन पुरवणे यालाच पसंती देतो. आणि म्हणूनच केळ्यांच्या वेफर्सला शहरात मागणी वाढत चालली आहे.
नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात असणाऱ्या लोकांना आता एक खूप चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ह्या बँकेचे CSP म्हणजेच ‘कस्टमर सर्विस पॉइंट’ उघडून तुम्ही दर महिन्याला भरपूर पैसे मिळवू शकता.
सध्याच्या महागाईच्या काळात पैसे कमवण्याच्या निरनिराळ्या संधी शोधून काढणे आवश्यक बनले आहे. आज आपण अशीच एक चांगली संधी बघणार आहोत. होय, तुमची कार तुम्हाला दर महिन्याला चांगले पैसे मिळवून देऊ शकते.
भारतात दर दिवशी 27 करोड लिटर डिझेलचा वापर होतो. आणि त्यातलं 5 ते 10 टक्के डिझेल हे ‘डेड मायलेज’ म्हणून वाया जातं…. त्यावरून चेतन वाळुंज आणि आदिती भोसले यांनी या व्यवसायाची कल्पना सुचली.
शीर्षक वाचून एखाद्या सिनेमाची स्टोरी वाचायला मिळते की काय असंच वाटेल तुम्हाला. जे प्रसंग आपल्या आजूबाजूला सहसा घडत नाहीत ते सिनेमात काल्पनिक म्हणून दाखवतात. आणि अशीच एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडली आहे, हे जर तुम्हाला सांगितलं तर??? हो अशीच एक गोष्ट आपण पाहुया. या गोष्टीतला नायक हमखास आपलं लक्ष वेधून घेतो.
सध्या तरूण वर्गाला नाना प्रश्न भेडसावत आहेत. नोकरी उद्योग करण्याचं वय आहे, पण संधी नाही. अर्थार्जन होत असेल तर पुरेसं नाही. काम मिळालच तर ते टिकवता येईल याची शाश्वती नाही. दिवसेंदिवस जबाबदारीचा डोंगर मात्र वाढतोय. पण अशा वेळी खचून जाऊन कसं चालेल??