Tagged: BIO

मॅराडोना

मॅराडोनाच्या खेळाला उतरती कळा केव्हा आणि का लागली?

१९८६ चा वर्ल्ड कप माराडोनाला दैवत्व देऊन गेला. वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या इंग्लंड आणि अर्जेंटिनाचा सामना संस्मरणीय ठरला तो माराडोना च्या दोन गोलमुळे. ह्या स्पर्धेला इंग्लंड आणि अर्जेंटिना मध्ये झालेल्या युद्धाची पार्श्वभूमी होती. त्यामुळे एकमकांचे उट्टे काढण्याचा चंग दोन्ही संघांनी बांधला होता. पहिल्या गोलच्या वेळी माराडोना च्या हाताला लागून फुटबॉल इंग्लंडच्या जाळ्यात शिरला.

संजीव कुमार

हरीहर जेठालाल जरीवाला म्हणजे, संजीव कुमार चा चित्रपट प्रवास वाचा या लेखात

हरीहर जेठालाल जरीवाला हे त्यांचे मूळ नाव. हे गुजराती कुटूंब मुंबईचेच. वडील जरीचा व्यवसाय करीत म्हणून जरीवाला. त्यांच्या कुटूबांत काही विचित्र योगायोग घडले होते….. ‘कुटूंबातील मोठ्या मुलाचा मुलगा १० वर्षांचा झाला की वडीलांचा मृत्यू होत असे’ त्यांच्या आजोबा, वडील आणि भावा सोबत असे घडले होते. जरीवाला कुटूंब तसे गरीबच होते.

उंबरठा

उंबरठा!

एका पुरुषाने घालून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडली कि स्त्रीची कशी वाताहत होते हे आपण रामायणापासून पाहतोच आहोत कि. अशा स्त्रीची परवड रावण, राम वगैरे सोडा साधा धोबी सुद्धा करू शकतो, करतोच. स्त्रीने  तिच्या घराचा, समाजाच्या बंधनाचा, रूढी परंपरांचा उंबरठा ओलांडून बाहेर पडलं  कि उंबऱ्याच्या आतील जगाला ती पारखी होते. पण हा उंबरठा स्त्रीच्याच मनाला हि पडलेला आहे. तो ओलांडणं हे किती अवघड आहे.

चार्ली चॅप्लिन

निराशाजनक वातावरणात राहून जगाला हसवणाऱ्या चार्ली चॅप्लिनची जगावेगळी कहाणी

तो संशयी होता. रागीट होता एकलकोंडा होता, बाईलवेडा होता. पडद्यावर साधाभोळा सज्जन सहृदय वाटणारा चार्ली प्रत्यक्ष स्वत:च्या पोटच्या मुलांशी क्रूर पणे वागायचा, तो धनाढ्य होता आणि विलासी आयुष्य जगत होता हा सगळा पैसा त्याने भांडवलशाही अमेरिकेत कमावला पण तो कम्युनिझमचा समर्थक आणि स्टालिनचा चाहता होता.

श्रीदेवी!! अभिनेत्रीच्या आतली एक भावुक स्त्री

श्रीच्या घरात दंगा झाला तो मुलींंच्या मैत्रिणींचा! त्याही शाळेतल्या मैत्रिणी. स्टार-कीड्स नव्हेत! पार्ट्या झाल्या त्या मित्र-मैत्रिणींच्या गप्पांसाठी ! अन्न शिजलं ते तिने स्वत: रांधलेलं. मासे शिजले ते तिने स्वत: सात बंगल्याच्या कोळणींकडून घासाघीस करून आणलेल्या ‘बाजारा’तले!

error: © Copyrights 2022. All rights reserved!