तु नेहमीच म्हणायचा, आपल्या प्रेमाचा गूलकंद कसा गं चाखायचा?

तु नेहमीच म्हणायचा,
आपल्या प्रेमाचा गूलकंद
कसा गं चाखायचा…….
तुझं सारखं वार्याशी भांडणं!
माझ्या केसांच्या बटा,
तुझ्या हातांनी सावरतांना माझं आपलं
गाली गूपीत लाजणं….
अन् आपल्या प्रेमाचा गूलकंद
कसा गं चाखायचा?
तुझा सारा आटापिटा
मला एक नजर बघण्यासाठी
तासन् तास गच्चीवर घुटमळणं…
अन् आपल्या प्रेमाचा गूलकंद
कसा गं चाखायचा?
माझं आपलं तुला चिडवायचं,
म्हणून खिडकीतुन चोरून बघणं,
अन् दिसणार म्हणून पडद्याआड दडणं…
अन् आपल्या प्रेमाचा गूलकंद
कसा गं चाखायचा?
तु समोर असतांना,
लटकेच भांडून अबोला धरणं,
अन् दुर जाताच इवल्याशा डोळ्यांत
तुला दिसेनासा होईपर्यंत न्यहाळणं…
अन् आपल्या प्रेमाचा……..

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
Nice one