श्रीमंती, समृद्धीच्या मार्गावर नेणारे हे दहा गुण तुमच्यात आहेत का?

जगण्याचा दर्जा हा माणसाच्या परिस्थितीवर अवलंबून नसून त्याच्या मध्ये असलेल्या काही विशेष गुणांवर अवलंबून असतो. असेच, काही गुण आहेत जे तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरवतात.

आज या लेखात मी तुम्हाला असे दहा गुण सांगणार आहे जे तुम्ही तुमच्यात आत्मसात केले तर समृद्धी, श्रीमंतीकडे तुमची वाटचाल निश्चित होईल.

मित्रांनो, एकविसाव्या शतकात माणूस प्रगतीच्या शिखराकडे चाललाय. रोज नवीन नवीन कला, कौशल्य, ज्ञान, मिळवायची साधनं खूप झाली आहेत, त्यामुळे हे सगळं ज्ञान मिळवणं, कौशल्य आत्मसात करणं, कला शिकणं, हे अतिशय जरुरीचं झालंय ना!!

ही जगाची प्रगतीची गती खूपच वाढलीय हे आपल्याला सगळ्यांनाच जाणवतंय.

त्यात भर म्हणजे, सोशल मीडिया, व्हाट्सएप, फेसबुक ह्या माध्यमांतून तर रोज नवीन नवीन ज्ञानाची खैरातच चालू आहे.

म्हणजे जसे दगडाच्या खाणीतून वेगवेगळ्या आकाराच्या खडी चे डंपर जसे एखाद्या बिल्डिंग च्या कामाच्या ठिकाणी एकामागून एक रिकामे केले जातात तसे व्हाट्सएपच्या आणि फेसबुक च्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानाचे डंपर च्या डंपर जगभर ओतले जातायत.

हा एवढं मात्र आहे कि त्यातले खडे कोणते आणि मोती कोणते हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे..

जग इतकं फास्ट पळतंय, ह्यात आपण कुठे आहोत?

आपल्याकडे कोणती कौशल्ये आहेत?

कोणत्या कला आपण आत्मसात केल्या आहेत, आपल्या आयुष्यात त्या कला आणि कौशल्यं ह्यांचा आपण काय, आणि कसा उपयोग करून घेतोय, ह्याचा विचार आपल्याला करायला वेळच पुरत नाही.

आणि नक्की कोणती कौशल्ये आपल्याला आयुष्यात सतत उपयोगी पडणार आहेत हेच आपल्याला कळत नाही. आता या लॉकडाऊन मध्ये आहे ना आपल्याकडे वेळ!

मग स्वतःला ओळखा, हिऱ्यासारखे पैलू पाडा म्हणजे लॉकडाऊन संपून बाहेर निघताना या देशासाठी चांगले प्रॉडक्टिव्ह नागरिक कामाला लागतील. नुसते दिवे लावून ‘भारत माता कि जय’ म्हणून काम भागणार नाही.

या काळात देशाची आर्थिक परिस्थिती खराब असताना आम्हाला सरकारने मदत केली पाहिजे या आशेवर राहून चालणार नाही. येणाऱ्या काळात ज्याच्या अंगी कौशल्य आहेत तोच तग धरू शकेल.

आणि म्हणून हा लेख खास तुमच्यासाठी….

आपल्याकडे काही कौशल्ये आहेत, काही कला आहेत, पण ती वापरायला आपल्याला संधी मिळत नाही. किंवा कळत नाहीत की ती कोणती कौशल्ये आपल्याकडे आहेत.

पण असा वेळ घालवून चालणार नाही. फटाफट शिकून घ्या जी कौशल्ये तुमच्याकडे नाहीत ती, कारण तुम्ही मागे पडाल, ह्या फास्ट जगात मागे पडून चालणारच नाही.

म्हणून जाणून घ्या, मग कोणती कौशल्ये तुमच्याकडे आहेत, कोणती नाहीत, कोणती शिकणं जरुरीचं आहे, कोणती कौशल्ये तुम्हाला आयुष्यभर चांगली कमाई करून देतील, तुमचं आयुष्य समृद्ध करून देतील.

ही दहा कौशल्ये तुमच्यात असली पाहिजेत.

१०:- शिकण्याचं कौशल्य

ह्या कौशल्याचा जरा नीट विचार केला तर तुम्हाला ह्या कौशल्याचं महत्व कळेल. सध्याच्या काळात शिकायला एवढं मिळतंय की शिकायचं काय ह्याची कमतरताच नाही.

कारण रोज सोशल मीडिया आणि इतर इलेक्ट्रॉनिक मीडियातून आपल्याला अपेक्षे पेक्षा जास्त काय काय शिकायला मिळतं आहे, की नको त्या गोष्टी सुद्धा आपण शिकून घेतल्यात.

त्यामुळे आपल्या मेंदूची परिस्थिती ट्राफिक जॅम झालेल्या चौका सारखी झाली आहे. सगळीकडून जॅम. त्यामुळं होतंय काय? जे शिकायचं त्यापेक्षा जे नकोय ते जास्त जमा होतंय.

ह्यासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवा.

१- जे डोक्यात भरलंय त्यातलं नकोय ते डिलीट करायचंय. म्हणजे Unlearn करायचं. म्हणजे तुम्हाला जे काही शिकायचं आहे त्यासाठी जागा रिकामी होईल.

२- नंतर Learn करायचं. जी कौशल्ये तुमच्याकडे नाहीत ती शिकून घ्यायची. त्यासाठी वेळ खर्च करायचा, पुस्तकं वाचून ती कला शिकायची. सेमिनार मध्ये जाऊन शिकायचं, इंटरनेट चा फायदा करून घ्यायचा. आणि

३- जी स्किल्स तुम्हाला उपयुक्त आहेत ती परत परत शिकायची (Relearn), आत्मसात करायची. कारण तीच तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहेत. ही शिकण्याची कला आयुष्यभर, अविरत चालू राहणारी प्रोसेस आहे. जो जास्त शिकेल, तो जास्त प्रगती करेल हे लक्षात ठेवा. असं हे शिकण्याचं कौशल्य तुमच्यात असायलाच पाहिजे.

९:- पुढचं कौशल्य म्हणजे तुमचं म्हणणं, तुमचा पॉईंट, तुमचं मत, तुमचा विचार तुम्हाला लोकांसमोर मांडता येणं

एक महत्वाचं कौशल्य, किंवा कला म्हणून ह्याच्याकडे पहा. बरेच लोक चांगले विचार करणारे असतात, त्यांच्याकडे लोकांसाठी योग्य असे विचार असतात, पण त्यांना आपले विचार लोकांमध्ये मांडायचे कसे ही कलाच अवगत नसते.

मोठ्या ग्रुप मध्ये जाऊन ते हे विचार मांडू शकत नाहीत, चार माणसात सुद्धा बोलायची भीती वाटते. मीटिंगमध्ये सुद्धा हे लोक कधीच बोलत नाहीत.

फक्त लोकांच्या हो ला हो करतात. संकोच, आत्मविश्वास नसणे, फक्त घरातच राहणारे. बाहेरच्या विश्वाशी संबंध न ठेवणारे लोक असे असतात. त्यामुळे त्यांच्या मनात भीती, न्यूनगंड तयार होतो आणि आत्मविश्वास कमी असतो.

ह्या फास्ट जगात वावरताना तुमच्याकडे स्वतःचा विचार मांडायचं कौशल्य पाहिजेच, तुमच्याकडे बोलण्याची कला असायला पाहिजे.

मीटिंगमध्ये, मग हळू हळू ५०/१०० लोकांशी स्टेजवर तुम्हाला सहज बोलून तुमचे विचार लोकांना पटवून देता आले पाहिजेत.

प्रत्येकामध्ये काही कमतरता असतात. तुमच्यात पण त्या असतील. पण त्यावर ओव्हरकम करण्याचा निश्चय करा.

सेलिब्रिटीज ना पाहतो आपण, बरेचदा ते खूप तळागाळाच्या बॅकग्राउंड मधून आलेले असतात पण पुढे जाऊन ते वेगवेगळ्या देशातल्या मीडियाशी आत्मविश्वासाने बोलताना पहिले असेलच ना!!

मग त्यांनी ते कौशल्य आत्मसात केलेलं असतं. म्हणजे ते अशक्य नाही, हे लक्षात घ्या!!

तुमचे विचार तुमच्या लेखनातून मांडा, भाषणातून मांडा, तुमचा व्हिडीओ तयार करून मांडा, किंवा छोट्या मीटिंग मधून मांडा. हे कौशल्य तुमच्यात असायलाच पाहिजे.

न लाजता सुरुवात तर करून बघा!!

८:-विक्री कौशल्य

तुमच्या प्रत्येकामध्ये विक्री कौशल्य असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही सेल्स चं काम करत नाही, कोणती ही गोष्ट विकायला जात नाही, मग आम्हाला ही कला काय उपयोगाची?

सगळ्या कौशल्यात विक्री कौशल्य सतत तुम्हाला उपयोगी पडणारं कौशल्य आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तर प्रत्येक काम देताना, किंवा मिळवताना तुम्हाला निगोसीएशन्स करावी लागतात, वाटाघाटी कराव्या लागतात.

ह्यात तुमचा योग्य फायदा तुम्हाला मिळवून कमीत कमी भावात ते काम मिळवणे, किंवा देणे जरुरीचे असते. ह्या वाटाघाटीत तुम्ही माहीर असायला पाहिजे, एक्स्पर्ट असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमची प्रगती सहज करता येते.

हे विक्री कौशल्य तुम्हाला सगळीकडेच उपयोगी पडतं म्हणून हे तुमच्याकडे असायला पाहिजे.

यावर एक गम्मत वाटावी अशी गोष्ट काय आहे सांगू?? आयुष्यात प्रत्येकाने काही काळ तरी विमा विकण्यात घालवावा…

ज्याला विकणं जमलं, त्याच्यासाठी काहीही अवघड नाही!!

७:- अनेक भाषांचं ज्ञान

तुम्हाला फक्त तुमचीच मातृभाषा येत असेल तर तुमचं कार्य क्षेत्र मर्यादित राहतं. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात इतर राज्य, किंवा इतर देशात जाऊन तुमची प्रगती करू शकणार नाही.

पूर्वी चीन हा देश फक्त त्यांचीच चिनी म्हणजे ‘मँडरिन’ भाषा बोलत होते. पण जेव्हा त्यांनी चिनी भाषे व्यतिरिक्त इंग्लिश, स्पॅनिश भाषा शिकल्या तेव्हा त्यांची व्यावसायिक प्रगती प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली.

“अलिबाबा” च्या मालकाने इंग्लिश शिकून त्याच्या व्यवसाय चीन शिवाय जगभरात सगळीकडे पसरवला. आज अलिबाबा ऑनलाइन मार्केटिंग मध्ये एक नंबरवर आहे.

म्हणून एकापेक्षा जास्त भाषा आपल्याला यायला पाहिजेत. जेवढ्या जास्त भाषा तुम्ही शिकाल तेवढे वेगवेगळ्या संधी तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडून ठेवतील. नोकरी असो किंवा व्यवसाय.

६:- भावनिक दृष्टीने मजबूत व्हा

व्यवसाय करा किंवा नोकरी. घरातून बाहेर पडलात की तुमच्या भावना घरातच ठेवल्या गेल्या पाहिजेत.

बाहेर तुमच्या भावना कोणालाही कळू देऊ नका. पर्सनल गोष्टी बाहेरच्या लोकांशी शेअर करू नका..

नोकरी किंवा व्यवसाय करताना तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग असायला पाहिजे. कोणी तुम्हाला भडकवलं, त्रास दिला, तरी तुमच्या चेहेऱ्यावर कोणत्याही भावना दिसू द्यायच्या नाहीत. तुमच्यावर त्याचा परिणाम होऊच द्यायचा नाही.

हेच कौशल तुमच्यात असेल तर लोक तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी पसंती देतील. तुमच्या कामात तुम्ही १००% देऊ शकाल. इमोशन किंवा भावनेचा काहीही परिणाम तुमच्या कामात दिसणार नाही.

५:- तुमची स्वतःची काळजी घेणं

बहुतेक लोक एकदा का कुठलं काम करायला लागले की भूक, तहान, झोप, विश्रांती सगळं विसरून जातात.

कधीही जेवण करतात, कधीही चहा पितात. मिळेल ते खातात पण सतत कामातच असतात. ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे.

पण हे सांगायला कोण असतं तिथं? वेळी अवेळी जेवण, खाणं, पिणं ह्यामुळे हळू हळू त्याचा परिणाम शरीरावर होतो.

आणि हृदय रोग, ऍसिडिटी, मधूमेह असले नको ते आजार पाठीमागे लागतात. काम आणि घर दोन्हीकडे मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात, जर तुम्ही आजारी पडलात तर.

म्हणून खाताना, पिताना, बोलताना, वागताना, तुम्ही तुमची काळजी घेणं जरुरीचं आहे. बोलताना वागताना रागावर नियंत्रण असले पाहिजे. तुमच्या शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही ह्याची काळजी तुमची तुम्ही घ्यायची आहे. तुम्ही स्वस्थ तर तुमचं घर स्वस्थ.

४:- स्टेज प्रेझेन्टेशन स्किल

तुम्हाला स्टेजवर येऊन तुमचं प्रेझेन्टेशन करता आलं पाहिजे. तुम्ही उत्तम वक्ते असाल तर तुम्हाला सगळीकडे मानाचं स्थान मिळत जातं. तुमचा मान सन्मान केला जातो. तुम्हाला लोक तुमच्या नावाने ओळखायला लागतात. तुम्ही ह्या कौशल्या मुळे प्रसिद्धीच्या झोतात येता. तुमचा सल्ला घेतला जातो.

तुम्ही उत्तम वक्ते असाल तर तुम्हाला सगळीकडून आपोआप निमंत्रण मिळत राहते. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला सगळ्या कार्यक्रमात वक्ता म्हणून निवडलं जातं. लोक तुमचे फॅन होतात. म्हणून ही कला तुमच्याकडे असायला पाहिजे.

३:- अनुभवी लोकांकडे सल्ला मागण्याचं कौशल्य

तुमची कामं वेगानं व्हावीत म्हणून तुम्ही काय करता? त्या त्या क्षेत्रात अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन कामाला दिशा देता?

आपण आपल्या मित्रपरिवारात अनेक क्षेत्रातले अनुभवी लोक जोडून ठेवावेत. त्यांच्याशी संबंध वाढवावेत. आणि जपावेत. त्यांची मदत आपल्याला केंव्हाही लागू शकते. त्यांचा सल्ला घेणं हे तुमच्या कामाची गती वाढवायला उपयोगी पडू शकतं.

जी व्यक्ती सल्ला मागायला पुढे येत नाही किंवा काचकूच करते, त्यांची कामं अडून राहतात. म्हणून हे कौशल्य तुमच्याकडे असायला पाहिजे ते तुमच्या प्रगतीला गती मिळवून देणारं आहे.

२:- बचतीचं कौशल्य

व्यवसायात किंवा नोकरीत तुम्हाला ध्येयाकडे वाटचाल करताना तुमची मिळकत किती? तुमचे खर्च किती? आणि तुमची बचत किती?

ह्या गोष्टींचा ट्रॅक ठेवायचा असतो. हे एक कौशल्यच आहे.

ज्याची मिळकत आणि खर्च सारखाच असतो त्याची बचत होत नाही. मग हेच कौशल्य तुम्हाला उपयोगी पडेल.

तुम्हाला खर्चावर कुठे नियंत्रण मिळवायचं हे कळलं की झालं. आवश्यक खर्च तर करावेच लागतात. पण जिथे काही खर्च टाळता येत असतील तर ते टाळून बचत करायला पाहिजे.

बचत हाच प्रगतीचा मार्ग आहे हे लक्षात यायला काही लोक आयुष्य घालवतात.

ज्यांना ध्येय, उद्दिष्ट असतात त्यांना बचतीची कला यायलाच पाहिजे. जो बचत करू शकतो तो आयुष्यात सगळी उद्दिष्ट पार करू शकतो.

पैसा कुठे खर्च करायचा आणि कुठे वाचवायचा हे कळलं की बचतीकडे वाटचाल करणं सोपं होतं. “अगदी छोट्या छोट्या बचतीतून मोठी संपत्ती तयार करता येते”. हे कायमचं लक्षात ठेवा. हे कौशल्य तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी खूपच महत्वाचं ठरतं.

१:- आणि शेवटचं कौशल्य म्हणजे निर्णय घेण्याचं कौशल्य

तुम्ही आम्ही आज ज्या ठिकाणी आहोत तो आपण आजपर्यंत घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आहे. आणि इथून पुढे आपण जे जे निर्णय घेणार आहोत त्याचा परिणाम आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे.

आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला रोज छोटे मोठे असे खूप निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय योग्य निर्णय असतील तर आपली प्रगती, उन्नती होत जाते, ह्याच्या उलट जर एखादी व्यक्ती रोज चुकीचेच निर्णय घेत असेल तर. त्याची अधोगती ठरलेली आहे.

म्हणून आयुष्यात योग्य निर्णय घेण्याची कला आत्मसात करून घेतली पाहिजे. आणि रोज अनुभव घेत घेत आपलं निर्णय घेण्याचं कौशल्य अगदी स्ट्रॉंग होत गेलं पाहिजे.

पुढे पुढे जो निर्णय घेऊ तो परफेक्टच असायला पाहिजे. अशी निर्णय क्षमता झाली पाहिजे.

निर्णयक्षमता वाढवण्याबद्दलच्या एका लेखाची लिंक शेवटी दिलेली आहे. जिज्ञासूंनी वाचायला हरकत नाही.

हीच दहा कौशल्ये तुम्ही तुमच्या अगदी नसानसात भिनवली तर तुमच्या आयुष्यात सतत कमाई करून देतील याची तुम्हाला खात्री बाळगायला हरकत नाही. फक्त तुमच्या कोणत्या स्किल मुळे तुमच्या प्रगतीची सुरुवात झाली हे आम्हाला कळवायला विसरू नका.

लेखातील प्रत्येक मुद्द्यावर मनाचेTalks मध्ये लेख उपलब्ध आहेत.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

7 thoughts on “श्रीमंती, समृद्धीच्या मार्गावर नेणारे हे दहा गुण तुमच्यात आहेत का?”

  1. मनाचे talks खूप छान ब्लॉग आहे, मला तुमच्या सोबत काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे, मला तुम्ही संपर्क करू शकत असलात तर नक्की करा, किंवा मला तुमचा संपर्क क्रमांक द्या.
    माझा 7798868888 हा आहे, धन्यवाद
    तुमच्या रिप्लाय ची अपेक्षा…

    Reply
  2. Hi, every individual is capable of doing anything, everything comes from inside deep inside is full of treasure . Sit calm dive inside and become master our ownself, when mind and heart unite together every thing is possible

    Reply
  3. उत्तम लेख आहे त्याने आपल्या जीवनात अनेक गोष्टींमुळे फायदा होईल.

    Reply
  4. मनाचे Talks ने हा जो उपक्रम घेतला आहे व लेखा द्वारे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे ते म्हणजे आपल्या मनासाठी उत्तम खाद्य आहे, त्यामुळे आपल्या मनाची स्वछता व बुद्धीला धार लावायला रोज सकाळचा लेख उपयोगात येतो.
    मनःपूर्वक धन्यवाद व खुप साऱ्या शुभेच्छा.🙏.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय