जर-तर च्या संभ्रमात पडून तुमचे आयुष्य नुसते पुढे चालले आहे का..??

मराठी प्रेरणादायी लेख

जर-तर चा सहारा घेऊन अपयशावर पांघरुण घालण्याची आपल्याला सवय लागून गेली आहे का? जर-तर करणाऱ्यांची स्वप्नं हवेतच विरून जातात. या जर-तर चा उपयोग कसा करायचा, त्याला एक्सक्युज कसे होऊ द्यायचे नाही ते वाचा या लेखात.

लहानपणी आपल्या भविष्याची आपण खूप सुंदर स्वप्न पाहतो.. ती सगळी पूर्ण करायचीच असे आपण तेव्हाच ठरवतो..

कालांतराने विसरूनही जातो.. त्या लहानपणीच्या स्वप्नांच्या दुनियेतून आपण खऱ्या दुनियेत प्रवेश करतो.. आणि मग सुरू होते जर तर ची खेळी..!!

जर माझ्याकडे तो भारी जॉब असता तर मी आत्ता खूप खुश असते..

जर मी तो बिझनेस करू शकलो असतो तर माझ्याकडे अगदी मोठा बंगला असता…

अशी बायको असती तर मी किती आनंदात असतो किंवा जर माझे सासर असे असते तर मी किती आनंदात असते..

माझ्याकडे अमुक इतका पैसा आला तरच मी तमुक करू शकेन.. नाहीतर मला चैनच पडणार नाही..

हे ‘जर तर’ चे संभ्रम आपल्या सगळ्यांच्या मनात सतत सुरू असतात.. हा जर म्हणजे आपला अंदाज असतो आणि तर म्हणजे आपलं एक्सक्यूज असतं. एकदाचं हे ‘तरचं’ एक्सक्यूज दिलं कि मग आपण मोकळे होते, बरोबर ना!!

आणि तिथेच अपूर्ण राहून जातं ते आपलं स्वप्नं. एखाद्याचं स्वप्नं असतं आपल्या दुकानातल्या एखाद्या सध्या प्रोडक्टला ब्रँड बनवण्याचं, एखाद्याचं असतं फॉरेन टूर करण्याचं तर एखाद्याचं असतं स्वप्नातला बंगला बांधण्याचं…

काही ‘हवे’ ते ‘असले’ तरच आपण आनंदी राहू शकतो अशी आपली धारणा असते.. पण ह्या ‘जर-तर’ च्या गोष्टी ज्यांच्याकडे आहेत ते तरी आनंदी असतात का..??

ज्यांच्याकडे हवे तसे जोडीदार, भरपूर पैसे, मोठे घर, हवी तशी नोकरी असली तरी त्यांचे ‘हे आहे पण ते हवे होते’ अशी मनात चलबिचल असतेच..

कुठे तरी सतत आपण कशात कमी पडतोय ही भावना मनात घर करून राहते.. दुसऱ्याकडे आहे पण मला नाही कमवायला जमले ह्यामुळे आपण निराश होत राहतो.. आतल्या आत कुढत असतो..

जे हवे आहे ते मिळाले तरी काहींना काही हवेच असते.. हा हव्यास कमी न होणे हा माणसाचा स्वभाव असतो..

यशस्वी होण्याची स्वप्ने तर आपण बघतो पण त्या दिशेने प्रयत्न करण्याऐवजी आपल्याकडे काय असते तर यशस्वी झालो असतो ह्याचेच पाढे आपण वाचत बसतो.

सक्सेस ची खरी व्याख्या आपण कधी समजूनच घेत नाही.. फक्त ‘जर-तरच्या’ भुलभुलैयात अडकून खेद मानत बसतो..

कित्येक गोष्टी कित्येक जणांकडे नसतात.. मग ते जर असेच रडत कुढत बसले तर कसे चालेल..??

मोठं मोठे वैज्ञानिक, इंजिनिअर, संशोधक, मोठ्या कंपन्यांचे मालक ‘जर-तर’ च्या गप्पात रंगले असते तर ते जिथे होते तिथेच राहिले असते नाही का..??

त्यामुळे सगळे असताना कोणीही यश मिळवेल पण प्रतिकूल परिस्थितीतून वर येण्यासाठी तुम्हाला तुमच्यावर भरोसा असला पाहिजे.

तुमच्या विश्वासाची गुंतवणूक तुमच्या स्वतःमध्ये करा.. तुम्ही स्वतः काहीही करण्यास सक्षम आहात.. आणि जर असे असते तर म्हणण्या पेक्षा ते कसे मिळवता येईल ह्या दिशेने बुद्धीचे वारू दौडवा..!! मग यश तुमचेच..

२. हे ‘जर-तर’ चे खूळ कुठून आले त्याच्या नोंदी करा

तुम्हाला ‘हे असते तर मजा आली असती’ ही भावना कशामुळे येऊ लागली..??

तुम्हाला नक्की काय हवे आहे..?? कधीपासून हा विचार तुमच्या मनात घोळत आहे..

ह्या सगळ्या गोष्टी एक वहीत लिहून काढा.. का गरज वाटतेय हे करण्याची त्याच्या नोंदी ठेवा.

हे लिहिता लिहिता तुम्ही तुमच्या मध्ये आलेल्या नाकारात्मतेला हळू हळू लिहून संपवत असाल.. काही गोष्टी मनातून बाहेर पडल्या की तिथे दुसऱ्या नवीन उत्तम गोष्टींसाठी जागा बनते..

नवनवीन आयडियांसाठी आपले मन फ्रेश होते.. कधी कधी आपली स्वप्न पूर्ण करण्याचा मार्गही असाच सापडतो.. म्हणून लिखित नोंदी असल्या की त्या दिशेने काम करणे सोपे जाते..

३. तुमची भीती आणि शंकांना मनात दाबून ठेवू नका

भीती आणि शंका मनात राहिल्या तर त्या फक्त आपल्याला पोखरून काढतात.. त्यांचे निरसन झाले तर आपल्याला जे मिळवायचे आहे त्याचा मार्ग सुकर होतो..

विद्यार्थी दशेत जर आपण शिक्षकांना शंका विचारल्या नसत्या तर आपण काहीच शिकू शकलो नसतो.. नाही का..?? हे असे ‘जर तर’, मनात भीती आणि शंका असत्या तर काहीच करता आलं नसतं..

त्यामुळे शक्य असलेले काम आपण स्वतःहून अवघड करतो आणि मग जर-तरच्या गप्पा मारतो.. ह्यातून काहीच मिळणार नसते..

त्यापेक्षा आपापल्या भीतीचे निवारण करून घ्या.. शंकांबद्दल माहिती काढून त्यांचेही निरसन करून घ्या.. आणि मग आत्मविश्वासाने पुढची वाटचाल सुरू करा.. तुमची इच्छा तुम्ही स्वतः लवकरच पूर्ण करू शकाल..

४. स्वकर्तृत्वावरही विश्वास ठेवा

आपण कोणतेही कार्य हाती घेतले की त्यात ‘जर-तर’ येतातच.. मी जर इतके पैसे गुंतवले तर इतका फायदा होईल.. मी जर ह्याचा अभ्यास केला तर हे मला फायदेशीर होईल..

हे जरतर नुसते बोलून सोडून देण्याचे नसतात तर त्यावर नीट काम करून प्रत्यक्षात आणायचे असतात..

म्हणजे या जर-तर चा उपयोग काम हातात घेण्या आधी त्याचा अभ्यास करण्यासाठी जरूर करा.

म्हणजे काम संपल्यानंतर अपयशावर पांघरुण घालण्यासाठी त्याचा वापर करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.

आपल्या भावतालचे लोक असतातच आपल्याला पाठिंबा द्यायला किंवा पाय खेचायला.. मात्र आपला अभ्यास आणि त्यावरचा आपला विश्वास कमी होता कामा नये.

आणि हो यश मिळाले नाही तरी लगेच कोलमडून जाता कामा नये.. त्या अपयशातूनही आपण बरेच काही शिकत असतो… कारण जर अपयश आले नाही तर यशाची किंमत कशी कळेल..?? नाही का..?

त्यामुळे हे जर-तर येतच राहणार.. कारण ते म्हणतात ना ‘Life is not a bed of roses’. म्हणजे सगळे काही तुम्हाला घरबसल्या, बिना कष्टाचे प्राप्त होणार नाहीये. मग आधीच जर-तर चे मुद्दे लक्षात घेऊन कामाला लागलेले उत्तम..

५. थांबू नका, आपले स्वप्न पूर्ण करा

‘जर-तर’ च्या गप्पा फक्त गप्पाच राहू देऊ नका. त्यांना सत्यात उतरवण्यासाठी त्यांचेवर खोलवर रिसर्च करा. स्वतःपुढे त्या स्वप्नांचे मोठे लक्ष्य ठेवा. तुम्हाला मनापासून काही हवे असेल तर त्याचा पाठलाग सोडू नका..

तुम्हाला जे हवे आहे ते करताना स्वतःला बघा आणि तिथवर पोहचा.. मध्ये थांबुच नका..

कारण आपल्याला जे पाहीजे ते मिळवण्यासाठी जर आपण अथक प्रयत्न केले तर ही अद्भुत दुनियादेखील आपल्या प्रयत्नांना यश देण्याच्या मागे लागते..

मला माहितीये हे असं सांगून फरक पडणार नाही.. म्हणून अशा वेळी तुम्हीच मोठ्ठ्याने म्हणा…

कहेते हैं, अगर किसी चीज़ को दिलसे चाहो,
तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती हैं

म्हणून जर तर च्या गप्पा मारताना भान ठेवा की ह्या हवेत विरून जाणाऱ्या गप्पा बनून राहायला नकोत.. एक दिवस त्या सत्यात उतरल्या पाहिजेत..

स्वप्न जरूर पहिली पाहिजेत, तीच आपल्याला यशाचा रस्ताही दाखवतात.. आपल्याला नक्की काय हवे आहे ते मानला विचारा.

स्वतःच्या मनाला काय वाटतेय ते समजून घ्या.. परीकथा सत्यातही उतरू शकतात ह्याचाही अनुभव घ्या.. फक्त स्वतःवर विश्वास असला पाहिजे.. आपण कुठे कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्या.. म्हणजे सगळेच शक्य होते..!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

6 Responses

 1. Arun says:

  खुपच छान माहिती

 2. Sagar says:

  One of the best page in marathi. Thank u for many beautiful articles. I read many an I love them

 3. Gangaram Tukaram Sawant says:

  Chhan

 1. September 18, 2020

  […] जर-तर च्या संभ्रमात पडून तुमचे आयुष्य … […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!