पाच वर्षांचा मुलगा गाडी ड्राइव्ह करताना पकडला जातो तेव्हा, अर्थात अमेरिकेत!

लहान मुलं घरात काही तोड-फोड करतात, सांड-लवंड करतात. आता सुट्ट्यांचे दिवस चालू आहेत तर या वात्रटपणाचे प्रकार पण बरेच सांगता येतील.
बरं, पाच वर्षाचं मूल आई- वडिलांनी एखादी गोष्ट करायला किंवा त्याच्या हट्टासाठी विकत घ्यायला मज्जाव केला तर काय करू शकतं?
आपल्या मते ते आर्धा किंवा एक तास रुसून बसेल आणि पुन्हा आई बाबाच्या मांडीवर येऊन खेळायला लागेल किंवा पुन्हा नवा काहीतरी लाडिक हट्ट करायला सुरुवात करेल.
आणि पाच वर्षाचं मूल आपल्याकडे हट्ट तरी काय करेल? खेळण्यातली गाडी घ्यायचा किंवा बाहेर फिरायला जायचा….
आता हि गोष्ट झाली आपल्याकडची…
पण अमेरिकेतल्या उटाह स्टेटच्या पोलिसांनी पाच वर्षाच्या ऍड्रिन ला चक्क कार घेऊन रस्त्यावरून फिरताना पकडलं!!
पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी ताशी ५० किलोमीटर वेगाने नवशिका ड्रॉयव्हर असल्यासारखी वळणं घेत-घेत जाणारी एक SUV थांबवली. गाडी थांबवण्याआधी ड्रॉयव्हर नशेत असू शकतो असाही पोलिसांचा अंदाज होता.
गाडीचा ड्रॉयव्हर बघून पिट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना धक्का बसला. कारण गाडीचा ड्रॉयव्हर होता एक लहानगा मुलगा.
हात स्टिअरिंग व्हीलपर्यंत पोहोचत नसल्याने तो सीटच्या अगदी टोकाला बसला होता.
पट्ठ्याचं नाव होतं ‘ऍड्रिन’. शिवाय तो सबब अशी देत होता कि, तो लॅम्बोर्गिनी आणण्यासाठी कॅलिफोर्नियाला चालला आहे.
पुढे तो पोलिसांना सांगतो कि त्याच्या आईने त्याला लॅम्बोर्गिनी घेऊन देण्यासाठी मनाई केली म्हणून त्याने घरातून SUV ची चावी घेतली आणि तो लॅम्बोर्गिनी घेण्यासाठी कालिफिर्नियाला निघाला.
काय म्हणता विश्वास बसत नाही…
बरोबर आहे. पण Utah Highway Patrol च्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डल वर या लहानग्याचा प्रताप कथन केलेला आहे.
One of our Troopers in Weber Co. initiated a traffic stop on what he thought was an impaired driver. Turns out it was this young man, age 5, somehow made his way up onto the freeway in his parents’ car. Made it from 17th and Lincoln in Ogden down to the 25th St off-ramp SB I-15. pic.twitter.com/3aF1g22jRB
— Utah Highway Patrol (@UTHighwayPatrol) May 4, 2020
पण पोलिसांनी पुढे चौकशी केली असता ऍड्रिनच्या पाकिटात त्यांना तीनच डॉलर सापडले.
पुढे पोलिसांनी पालकांना असाही सल्ला दिला कि पालकांनी गाड्यांच्या चाव्या लहान मुलांच्या हाती लागतील अशा ठेऊ नये.
ही झाली अमेरिकेतली कथा आपल्याकडे पुढची किमान दहा वर्षे तरी इतक्या सुधारित आवृत्तीची पिढी जन्माला येणार नाही असा अंदाज वाटतो… नाही का!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा