रात्री झोपेत खूप तहान लागत असल्यास हि कारणं तपासून बघा

‘खूप तहान लागते’, कितीही पाणी प्यायला तरी तहान काही भागात नाही.. सतत घसा कोरडा पडतो… असे तुमच्या बाबतीत घडते का…?? असे घडत असल्यास ते धोकादायक आहे, का दुर्लक्ष करण्यासारखे..?? हे कसे ठरवता येईल.? जाणून घेऊयात आजच्या लेखात..

तहान कधी लागते..?

शरीरातील पाणी कमी झाल्यास आपल्याला आपोआप तहान लागते.. तहान लागण्याची क्रिया ऋतू अनुसार बदलू शकते..

म्हणजे थंडीत जास्ती तहान लागत नाही.. पावसाळयातही कमीच तहान लागते.. मात्र उन्हाळ्यात कितीही पाणी प्या तहान काही भागात नाही.. उन्हाळ्यात जणू सगळेच लिक्विड डाएट वर असतात..

पण आपण जेवढे दिवसा पाणी पितो तेवढे तरी रात्री कधीच लागत नाही..

वयस्क माणसे मात्र जवळ तांब्या भांड घेऊन झोपताना दिसतात.. रात्री थोडे पाणी लागते म्हणून…

म्हणजे रात्री तहान लागू शकते मान्य आहे..

पण इतकी तहान अगदी दिवसा लागते तशी..?? आणि ही काय शरीराची तक्रार असू शकते का..?? ह्यासाठी डॉक्टरांकडे जावे लागू शकते..??

तुम्हालाही असे प्रश्न पडत असतील ना..?

आज ह्याचीच उत्तरे आपण मिळवणार आहोत.. चला तर थोडे मंथन करू.. काही प्रश्न स्वतःलाही विचारू..

१. मी झोपतो/ते त्या खोलीत मला शांत झोप लागते का??

ह्यावर विचार जरूर झाला पाहिजे. शरीराला किमान आठ तास शांत झोप मिळाली पाहिजे. त्यासाठी खोली शांत आणि थंड देखील असली पाहिजे. पण थंड असले तरी खूप कोरडे वातावरण नको.

हवेतला गारवा आणि आर्द्रता दोन्ही संतुलित असेल तर शरीरातील पाणी बाष्पीभवनाने उडून जात नाही.. त्यामुळे रात्री तहान तहान होणे कमी होऊ शकते.

२. माझ्या शरीरातील पाणी कमी होऊन मी तहानलेला राहतो/ते का..?

सतत तहानलेले वाटणे म्हणजे डिहायड्रेशन होणे..

शरीरातील पाणी काही करणांमुळे खूप कमी होते तेव्हा तहानलेपण जाणवते..

तसेच उलट्या, जुलाब ह्या आजारांमुळे देखील शरीर डिहायड्रेट होते.. रोज हेवी वर्कआऊट करत असाल, शारीरिक कष्टाची कामे असतील तर शरीरातील पाण्याची लेव्हल कमी होते.

त्यामुळे दिवसभर आपण पाणी किती पितो ह्यावर लक्ष दिले पाहिजे..

जर एखादा दोन ग्लास पाणी प्यायलं असेल तर आपल्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण होत नाही..

लहान मुले, तरुण मंडळी आणि वयस्क सगळ्यांनाच किमान 8 ग्लास पाणी पिणे जरुरीचे आहे..

शरीरातील पाणी कमी झाले तर घशाला कोरड पडते, अंग गळून जाते, थकवा येतो आणि रात्रीची देखील खूप तहान लागते. म्हणून दिवसा पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे..

३. मद्याच्या हाँगोवर तर नाही..?

ज्यांना ड्रिंक्स घ्यायची सवय असते किंवा कधी जास्ती प्रमाणात मद्य घेतले गेले तर सतत लघवीला जाऊन शरीरातील पाणी खूप कमी होऊ शकते. त्यामुळे रात्री हमखास तहान लागते.

त्यामुळे मद्याचा हँग ओव्हर असेल आणि शरीरातील सोडियमदेखील कमी झाले असेल तर

  • ग्रीन टी
  • भरपूर लिंबू पाणी
  • एनर्जी ड्रिंक
  • सूप

अशी काही पेये पिऊन पहा नक्कीच तहान भागेल.

४. झोपताना तोंड उघडे ठेवून झोपायची सवय आहे का..??

काही जण झोपेत खूप घोरतात किंवा नाक चोंदल्याने तोंड उघडे ठेवून झोपतात. काहींना इतकी गाढ झोप लागते की कधी तोंड उघडे पडलंय हे कळतच नाही..

अशामुळे श्वासोच्छ्वास तोंडावाटे केला जातो.. आणि तोंडातील लाळ वाळून जाते.. तोंड कोरडे पडते..

सकाळी उठल्यावर घसा देखील कोरडा पडल्यामुळे दुखायला लागतो.. त्यामुळे अशी सवय कटाक्षाने सुधारावी.. नाहीतर सतत तहानलेलेच राहाल..

आता ह्या वरच्या कारणांमुळे डॉक्टरकडे जाणे गरजेचे नाहीये.. ह्यावर आपणच घरच्या घरी काही उपाय करू शकतो. उपाय केल्यावर तहान लागणे कमी झाले का ते पाहावे.. बरे झाल्यास उत्तम..

नाहीतर अजूनही काही कारणे असू शकतात. आणि त्यासाठी मात्र डॉक्टरकडे जाणे खूपच जरुरी आहे.

१. इतर औषधोपचार चालू आहेत का..?

आपल्यावर इतर काही रोगांसाठी ट्रीटमेंट सुरू असेल तर आपल्याला विविध प्रकारची औषधे घ्यावी लागतात..

जसे स्टिरॉईड, अँटी डिप्रेसंट, अँटीसायकोटिक किंवा इनहीबिटंन्ट्स ह्या औषधांमुळे शरीराला पाण्याची गरज जास्ती वाटू शकते..

अशी औषधे आपण घेत असल्यास डॉक्टरला भेटून एकदा ह्या औषधांना पर्यायी औषधे असतील तर घेतली पाहिजेत.. नाही तर पाणी तरी भरपूर प्यायला हवे..

२. प्री – मेनोपॉझ किंवा मेनोपॉझची लक्षणे तर नाहीत ना..?

शरीरातील रिप्रोडक्शन करण्यात मदत करणारे हॉर्मोन्स इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही शरीरातील फ्लूइड्स ची मात्रा समतोल ठेवण्यास मदत करतात..

मेनोपॉझ किंवा प्री मेनोपॉझ दरम्यान हे हॉर्मोन बदलायला लागतात.. ज्यामुळे शरीरात उष्णता वाढणे, रात्रीचे खूप गरम होणे, दरदरून घाम फुटणे असे त्रास होतात.. ह्या कारणाने आपल्याला रात्रीची खूप तहान लागते..

अशा परिस्थितीत आपल्या डॉक्टरकडे जाऊन मेनोपॉझ बद्दल माहिती घ्यावी. डायट घ्यावे आणि भरपूर पाणीही प्यावे.

मेनोपॉझ मध्ये स्वतःची काळजी कशी घ्यावी ह्याबद्दल तुम्ही मेनोपॉजवरील लेखात वाचू शकता. लेखाची लिंक शेवटी दिलेली आहे.

३. हे डायबेटीसचे लक्षण तर नाही..?

डायबिटीस झाला असेल तर आपले शरीर, साखर नीट पचवू शकत नाही. किडण्या सुद्धा लघवीतली साखर वेगळी करण्यासाठी अति परिश्रम घेतात.. ह्या प्रोसेस मध्ये सतत लघवी येते.. आणि त्या मार्फत शरीरातील बरेच पाणी उत्सर्जित होत राहते.. ह्यामुळे देखील आपल्याला खूप तहान लागू शकते..

जर डायबेटीस असेल तर भरपूर पाणी पीत राहावे. आणि जर डायबेटीसचे निदान केले नसेल तर एकदा डॉक्टरच्या सल्ल्याने सगळ्या टेस्टस करून त्याचे नियमिय उपचार करून घ्यावे..

४. ऍनिमिया झाला असल्यास:

ऍनिमिया झाल्यास शरीरात अत्यंत थकवा जाणवणे आणि खूप तहान लागणे अशी लक्षणे दिसून येतात.. कारण ऍनिमिया मध्ये आपल्या लाल रक्तपेशी खूप कमी होतात..

ऍनिमियाकडे दुर्लक्ष केले तर आपण अजूनही भरपूर रोगांचे शिकार होउ शकतो.. त्यामुळे भरपूर पाणी पिणे आणि डॉक्टरकडे जाऊन अनिमियाची योग्य ट्रीटमेंट घेणे खूपच गरजेचे आहे..

५. किडनी, हृदय किंवा लिव्हर खराब झाल्यास:

ह्या तिन्ही पैकी कशाचेही तंत्र बिघडल्यास शरीर ते स्वतः दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करते.. सतत तहान लागणे हे ह्याचे मुख्य लक्षण.. मात्र अश्या व्याधी घरात बसून दुरुस्त होत नाहीत..

ह्यासाठी डॉक्टरकडे जाऊन सगळी यथासांग ट्रीटमेंट घेणे फारच गरजेचे आहे.. उगाच जीवाशी खेळ नकोत..

६. इतर काही शारीरिक त्रास आहेत का?

स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये अजूनही काही शारीरिक अडचणी किंवा व्याधी शरीरातील पाणी कमी झाल्याचे संकेत देत असतात. जसे

  • सांधे दुःखी
  • योनीमार्गात कोरडेपणा असणे
  • त्वचा कोरडी असणे
  • अंगावरील सूज
  • अंगावर रॅश येणे

ह्या सगळ्यासाठी डॉक्टरकडे जाऊन अवश्य तपासणी करणे गरजेचे आहे.. प्रत्येकासाठी लागणारे औषध घेतल्यास आणि पाण्याची मात्रा वाढविल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखले जाईल. आणि रात्रीची तहान लागणे कमी होईल..

ही बरची कारणे घर बसल्या कशाची आहेत ह्याचा थांगपत्ता आपल्याला लागणे अशक्य.. शरीर नादुरुस्त झाले तर आपल्याला इशारे देते..

कधी खूप तहान लागते, तर कधी दृष्टी अधू होते, काही वेळेस शरीरावर झालेल्या जखमा बऱ्या होत नाहीत, तर कधी खूप लघवी होते..

कधी भूकच लागत नाही तर कधी ‘खा खा’ सुटते.. ही सगळी लक्षणे आपल्याला काहीतरी सांगत असतात.. ह्याला हलक्यात घेऊ नये..

ह्यांच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नये.. ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी इलाज सुरू करावेत..

अति तहान लागणे हे साधे लक्षण नक्कीच नाही.. त्यासाठी उपाययोजना त्वरित करावी..

जान है तो जहान है..!! म्हणून स्वतःची काळजी घ्या..!!

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय