खराब वाटणारा दिवस चांगला करण्याच्या तीन टिप्स

आपल्या भारतात अशी आपल्याला विचित्र वाटणारी सर्वेक्षणं केली जात नाहीत म्हणून हा विषय तसा कधी बोलला जात नाही.
पण अमेरिकेत २०१८ साली केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार अमेरिकन लोकांचे वर्षभरातले सरासरी साठ दिवस हे वाईट जातात.
ऐकायला गम्मत वाटेल पण, होतं ना बरेचदा असं कि सकाळी उठल्यापासून काहीतरी पनवती लागल्यासारखं अख्खाच्या अख्खा दिवसच खराब जातो.
किंवा कदाचित असंही असेल ना, कि दिवस आपला जायचा तसा जातोय पण सुरुवातीला काहीतरी आपल्या मनाविरुद्ध घडल्यामुळे आपलाच पर्स्पेक्टिव्ह बदलून जातो.
आणि आपण नकळत अशी काही पावलं उचलतो कि ज्याने तो दिवसच खराब वाटायला लागतो.
आता काहीतरी चुकीचं किंवा विपरीत होणं याला तर आपण थोपवू शकणार नाही. पण पुढच्या दिवसाला टोटल फेल्ल्युअर होण्यापासून तर वाचवू शकतो…
हा आता त्यासाठी नारायण नागबली किंवा पूजा अर्चा वगैरे करायला आम्ही तुम्हाला सांगणार नाही… 😅
तर असा खराब वाटणारा दिवस चांगला करण्यासाठी काय करायचं ते बघा…
१) सर्वात आधी त्या दिवसाला वाईट म्हणणं थांबवा
एकदा का तुम्ही त्या दिवसाला वाईट असण्याचं लेबल लावलं कि मग तुमचं सबकॉन्शस माईंड ते तुमचं वाटणं बरोबर सिद्ध करण्याच्या मागे लागतं.
यामुळे नकळतच तुम्ही वाईट गोष्टींचा विचार करायला लागता आणि सगळं काही ठीक असूनही दुर्लक्ष झाल्याने चूक होते.
आता बघा, आपणच सकाळी वेळेवर अलार्म लावायला विसरलो म्हणून जर ऑफिसमध्ये जायला उशीर झाला तर दिवसाची सुरुवात काही चांगली नाही झाली, असं म्हणत घाई घाईत गाडी काढून तुम्ही निघालात पण त्या घाईतच कधी कधी गाडी स्लिप होते आणि तुम्ही पुन्हा म्हणता आजचा दिवसच खराब…
म्हणून दिवसाची सुरुवात खराब झाली तरी काही हरकत नाही… होऊ शकतंच ना कधी असं… मग सरळ शांतपणे पुढच्या कमला लागायचं…
२) चांगल्या गोष्टींचा विचार करा
सकाळीच काहीतरी चुकीचं होऊन दिवसाची सुरुवात झाली असं जर वाटलं तर आधी तो विचार मनातून काढून टाका आणि अशा दहा गोष्टींची यादी करा ज्या आज चांगल्या झाल्या आणि आजचा दिवस संपेपर्यं होऊ शकतात.
३) भरपूर हसा
Image Credit: Pixels
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा