आपल्या ध्येयाचे ऍनालिसिस करून, ते सत्त्यात उतरवण्यासाठी हे करा

आपल्या ध्येयाचे ऍनालिसिस करून ते सत्यात उतरवण्यासाठी हे करा

ध्येय ठरवणे आणि ते गाठणे, त्यात यशस्वी होणे, ही एक आनंद देणारी गोष्ट आहे.

पण त्या त्यासाठी जो तुम्ही प्लान बनवता त्याचे मूल्यांकन, ऍनालिसिस योग्य रीतीने करणेही महत्वाचे आहे.

या लेखात जाणून घेवूयात ध्येयाचे मूल्यांकन करण्याच्या काही सोप्या टिप्स.

ध्येय गाठण्यासाठी एक प्रक्रिया असते. नुसतं ठरवून ते होत नाही तर त्यासाठी आराखडा बनवावा लागतो, त्यासाठी अनेक टप्पे असतात त्या प्रमाणे परिश्रम घेवून काम करावे लागते.

पण आपण जे काही करतोय आपले ध्येय गाठण्यासाठी त्याचे मूल्यांकन करणेही तितकेच महत्वाचे आहे.

त्यासाठी, ते करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आपण आज पाहणार आहोत.

या टिप्समुळे तुमची प्रगति तुम्हाला साधता येईल आणि तुमच्या ध्येयसाठी अधिक तत्परतेने काम करता येईल.

सुरुवातीलाच मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझा मित्र नुसता ठरवतोय की त्याला घर घ्यायचंय.

पण, आता तो जी नोकरी करतोय त्या पगारात त्याला त्यासाठी पैसे साठवता येत नाहीत. त्याचे ध्येय घर घेणे आहे.

त्यासाठी त्याला प्रथम प्लान बनवावा लगेली की त्यासाठी किती रक्कम लागणार? ती कशी उभी करणार? कर्ज काढायचे तर ते किती मर्यादेपर्यंत काढायचे?

त्याचा हफ्ता त्याला परवडेल का? त्याला अधिक पैसे मिळवण्यासाठी काय करावे लागेल?

त्याचे परिणाम काय होतील? याचा संपूर्ण आराखडा आपण जर तयार केला तर यामध्ये त्याला सध्याची नोकरी सोडून चांगल्या पगाराची नोकरी शोधली पाहिजे, हे प्राथमिक ध्येय आहे.

त्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतील आणि मगच त्याचे मोठे ध्येय ‘घर’ पूर्ण होईल. या मार्गात आणखी एक टप्पा महत्त्वाचा असतो, तो म्हणजे आपण करत असलेल्या कामाचे मूल्यांकन करणे, ऍनालिसिस करणे!!

ध्येयाचे मूल्यांकन म्हणजे काय?

ध्येयाचे मूल्यांकन करताना काही गोष्टींची आपल्याला जाणीव होते.

आपण आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जे काही प्रयत्न करतोय, जे काम करतोय त्याची दिशा नेमकी योग्य आहे की अयोग्य? हे आपल्याला समजते.

आता जाणून घेवूयात की मूल्यांकनाचे फायदे काय आहेत.

मूल्यांकनाचे फायदे- ध्येय गाठण्यासाठी आपण करत असणार्‍या मूल्यांकनाचे फायदे खूप आहेत.

त्यात तुमची प्रगति, त्यातील येणार्‍या अडचणींवर होणारी मात आणि तुमचा ध्येयाशी असणारा प्रामाणिकपणा आणि त्याची निष्ठा परखता येते.

तुमच्या ध्येयाशी तुम्ही किती प्रामाणिक आहात? त्याच्यासाठी काय करता? त्याविषयी किती कष्ट घेता?

याची शहानिशा होते.

ध्येयाच्या मूल्यांकनाचे फायदे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

1) तुमच्या इच्छित ध्येयावर लक्ष केन्द्रित होणे

2) तुमच्या ध्येयाच्या प्रगतीसाठी आवश्यक बाबी काय आहेत, हे लक्षात येते.

3) तुमच्या ध्येयातील किती टप्पे तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केलेत त्याची माहिती ठेवता येते.

4) कोणत्या गोष्टींसाठी काय हारायला हवे? याची दिशा ठरवता येते.

5) तुमच्या कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक ध्येयासाठी कोणत्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुमची मानसिकता कशी तयार ठेवावी, याचे ज्ञान मिळते.

6) त्यासाठी करावयाच्या तडजोदींची कल्पना घेता येते, आणि त्याप्रमाणे तुम्ही तयार होऊ शकता.

7) तुम्ही तुमच्या ध्येयाच्या किती जवळ आहात याचे मोजमाप होऊन. तुम्हाला योग्य ती कल्पना येते.

ध्येयाच्या मूल्यांकनाचा वापर कसा करावा?

आपण पाहिले की ध्येयाचे मूल्यांकन कसे करावे, त्याची गरज काय?

आता आपण पाहुयात की त्याचा वापर प्रत्यक्षात कसा करायचा?

लक्षात ठेवा की तुम्ही ठरवलेल्या उद्दिष्टानुसार तुम्ही जे प्रयत्न करता आहात त्याचे परिणाम तुम्हाला हवे तसे मिळत आहेत की नाही?

समजा, तुम्ही ठरवताय की तुम्हाला वर्षाला काहीतरी रकमेची गुंतवणूक करायची आहे. तर ती रक्कम आपण वर्षकाठी जमवू शकलो का?

किंवा एखादा व्यापार करत असाल तर महिन्याला तुम्हाला हवे असलेले आर्थिक उद्दीष्ट तुम्ही गाठले का?

याचा विचार करा.

त्यासाठी जर तुम्ही ठरवलेल्या गोष्टी केल्या नाहीत, त्याचे मूल्यांकन नाही केले तर पुढच्या वेळी त्याची तुम्हाला गरज वाटेल आणि तुम्ही त्यापद्धतीने मूल्यांकांनाचा वापर करून तुमचे उद्दीष्ट गाठू शकाल.

समजा तुमच्या मुलाला किंवा मुलीला चांगले शिक्षण देण्याची तुमची इच्छा आहे आणि तिला/त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला आधीपासून त्यासाठी ध्येय ठरवावे लागेल.

त्यासाठी लागणारे पैसे, शैक्षणिक तयारी आणि त्यासाठी मानसिकता तयार करावी लागेल.

या सर्व गोष्टींसाठी आधीपासूनच तयारी केली, त्याचा वेळोवेळी आढावा घेतला तर ते सोपे होऊन जाईल.

ध्येयाच्या मूल्यांकनाचा परिणाम

ध्येयाच्या मूल्यांकांनाचा वापर करताना त्यामध्ये दोन गोष्टींचा समावेश होतो.

एक म्हणजे कमी काळासाठी असणारे उद्दीष्ट आणि दुसरी म्हणजे दीर्घकालीन उद्दीष्ट.

या दोन्हीमध्ये आपण काम करत असतो. यासाठी काम करताना त्यांच्या मूल्यांकनाच्या चांगल्या- वाईट परिणामांची कधीकधी प्रचिती येते.

पण त्यासाठी आपण कुठे कमी पडलो आहोत? याचाही लेखाजोखा आपण घ्यायला हवा.

केवळ दोष देत बसण्यात अर्थ नाही. त्यावर मात करून पुन्हा मूल्यांकन करून त्यात बदल व्हायला हवा.

कमी काळासाठी जी ध्येय असतात ती आधी पूर्ण करण्याकडे आपला कल असला पाहिजे.

जसे की मला फ्लॅट घ्यायचा आहे. तर त्यासाठी मला आधी चांगल्या पगारची नोकरी किंवा चांगला किफायतशीर व्यवसाय निवडला पाहिजे.

त्यातून प्रगति करुन मग मी फ्लॅटसाठी पैसे उभे करून तो घेईन.

फ्लॅट घेणे हे माझे दीर्घकालीन ध्येय आहे पण त्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी मला नोकरी शोधणे हे कमी काळाचे उद्दीष्ट प्रथम पूर्ण करावे लागेल.

जर मी यात अपयशी झालो, तर पुन्हा त्यासाठी प्रयत्न करणे हे माझे नवे ध्येय असेल.

अश्या रीतीने मूल्यांकांनाचा परिणाम ध्येयाच्या पूर्ततेसाठी होतो.

त्याचप्रकारे वजन कमी करणे, निवृत्तींनंतरची आपली वाटचाल, पर्यटन, परदेश प्रवास आदींचा समावेश असू शकेल.

जर तुम्ही अपयशी झालात तर काय करायचे

बर्‍याचदा मूल्यांकन न करता आपण ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो. पण अपयशी होतो.

लहान-सहान उद्दिष्टही गाठता येत नाहीत. तुमच्या ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा पॅटर्न आणि परीक्षेचा पेपरही ठरवता आला पाहिजे, त्याच्यामध्ये मिळणार्‍या गुणांचाही लेखाजोखा मांडता आला पाहिजे.

त्याच्या परिणामांमधून शिकून, तयार होऊन पुन्हा नव्या दमाने ध्येय पूर्ण करण्यासाठी काम केले पाहिजे.

म्हणजे पहा, की आपण अभ्यास करतो, पण त्या विषयात कधीतरी आपल्याला कमी मार्क मिळतात, तर कधी चक्क नापास होतो.

पण पुन्हा नव्याने अभ्यास करून तो विषय आपण सोडवतो आणि त्यात पास होतो.

त्यावेळी मागे आपण ज्या चुका केल्या त्या टाळतो. तसंच ध्येयाच्या मूल्यांकांनाचीही पद्धत आहे.

Hindi Motivational

सकारात्मक विचारने ते ध्येय पूर्ण केले पाहिजे.

स्वतःची क्षमता वाढवा, ध्येय पूर्ण करा

मूल्यांकन करताना आपण पाहिले की परिणामांची शक्यता काय आहे.

अडचणी तर येणारच पण त्यासाठी तुमची मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवा.

अपयशाने खचून ना जाता पुन्हा प्रयत्न करा. एखादे काम पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी पूर्वतयारी करा, आलेल्या अडचणींची किंवा अचिव्हमेंट्सची नोंद ठेवा.

तुम्ही किती जास्त परिणामकारक काम करून, तुमचे ध्येय प्राप्त करू शकता, याचा अंदाज घ्या. ती शक्ति वाढवा.

अधिक प्रभावी परिणाम मिळवण्यासाठी कार्यक्षम बना. त्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील, ते करा.

स्वतःची पात्रता वाढवा. मोठी स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी काम करा.

आपण आपल्या ध्येयापासून नेहमी काहीतरी नवीन शिकतो आणि त्यातून शहाणे होतो. प्रत्येकवेळी येणारी अडचण ही काहीतरी नवीन शिकण्याची संधि घेऊन येते.

त्यातूनच आपण घडत जातो, येणार्‍या काळासाठी सज्ज होतो.

माजी राष्ट्रपति डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम असे म्हणतात की, ’स्वप्ने ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, मोठी स्वप्ने ती असतात की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत’.

त्यामुळे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, ध्येय पूर्ततेसाठी कार्यमग्न रहा आणि तुमच्या यशाचा सोनेरी, लक्ख सूर्योदय पहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!