दूध आवडत नाही! ही समस्या असल्यास अशा प्रकारे दूध प्या

‘दूध-दूध-दूध पियो ग्लासफुल दूध’ ही 90 च्या दशकातली जहिरात जवळ जवळ सर्वांच्याच खूप आवडीची, पण दूध मात्र सर्वांनाच तितके आवडते असे नाही.

दुधाचे पेय कसे बनवावे

बऱ्याच आयांना मुलं दूध पित नाहीत, काय करावं ही समस्या असते…

शहाणे- सुरते समजदार लोक दूध न आवडण्याचं किंवा न पचण्याचं कारण शास्त्रीय भाषेत देतात ते असं की ‘लॅक्टोज इंटोलरन्स’.

आता काही जणांच्या बाबतीत लॅक्टोज इंटोलरन्स ची आनुवंशिक समस्या सुद्धा असते. या समस्ये बद्दल आपण नंतर एखाद्या लेखात बोलू.

पण आज या लेखात दूध आवडत नसताना इतर काही पौष्टिक गुण असलेले पदार्थ मिसळून आपल्याला आवडणारा स्वाद आणि आरोग्य याचं संतुलन कसं राखायचं ते बघू…

आपण लहानपणा पासून ऐकत आलेलो असतो की, दूध प्यायल्याने आरोग्य सुधारतं, शरीर धष्ट पुष्ट होतं.

दुधामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, व्हिटॅमिन ‘के’ आणि व्हिटॅमिन ‘बी-१२’ मुबलक प्रमाणात असतं. शिवाय कॅल्शियम सारख्या शरीराला आवश्यक असलेल्या मिनरल्स ची कमतरता सुद्धा दुध प्यायल्याने भरून काढता येते.

दातांच्या मजबुती साठी सुद्धा दूध पिण गरजेचं आहे.

पण असं हे बहुगुणी दूध आवडत नाही हा प्रश्न बरेच जणांचा असतो.

म्हणून बघा दूध आवडत नसेल तर ते कसं प्यावं:

१) दुधा बरोबर खजुर आणि खारीक यांचा उपयोग: खजुरमध्ये शरीराला आवश्यक असे लोह आणि खनिज तत्व मोठ्या प्रमाणात असतात.

खजूर ची मिक्सरमध्ये पेस्ट करून किंवा खारकेची पावडर दुधात मिसळून एक खूप उत्तम पेय बनवता येते. याने येणारा गोडवा हा नैसर्गिक असतो त्यामुळे मधुमेहींना सुद्धा असे दूध पिता येते.

२) दुधा बरोबर मल्टिग्रेन पावडर: नाचणी, बाजरी, ओट्स यांपासून अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतात. बाजारात मिळणाऱ्या दुधाबरोबर घेण्याच्या स्प्लिमेंट्स मध्ये सहसा या मल्टिग्रेनचाच समावेश केलेला असतो.

अशी मल्टिग्रेन पावडर बनवून दुधाला गोडी यावी म्हणून योग्य प्रमाणात गूळ किंवा खजूर ची पेस्ट, वेलची वापरून पौष्टिक आणि चविष्ट पेय बनवता येऊ शकते.

३) बदामाची पेस्ट: रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेल्या बदामाची पेस्ट दुधात एकजीव करून त्यात गूळ किंवा खारीक पावडर घालुन स्वादिष्ट एनर्जी ड्रिंक तयार केले जाऊ शकते.

४) हळदी बरोबर दूध : हळद आणि आल्याचा बारीक तुकडा दुधा बरोबर उकळवून ते दूध घेण्याची सवय कोरोना काळात बरेच जणांनी लावून घेतलेली आहे.

असे दूध घेतल्याने प्रतिकार शक्ती वाढते बरेच हळद अँटी बायोटिक असल्याने विषाणूंना प्रतिरोध करण्यासाठी सुद्धा उत्तम आहे.

या शिवाय वेगवेगळे ड्राय फ्रुटस, केशर याचा वापर करून सुद्धा दूध चविष्ट बनवले जाऊ शकते.

याशिवाय तुमच्याही, दुधाला स्वादिष्ट बनवण्याच्या काही रेसिपीज असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगायला विसरू नका.

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय