महीला दिन ना आज…

सकाळपासुन शूभेच्छांचा
पाऊसचं पडत होता,
महीला दिन ना आज…
म्हणुन स्रियांचा आदर व्हावा,
असं सगळेच सांगत होते.
आजच हं सारं! मग मात्र पुन्हा,
तुझ्याशी सारे जैशे थे चा पाढा
वाचणार होते…
महीलादिन ना आज….
शुभेच्छांसोबत किचनमधला कुकर,
शिटी देवून बोलावणे देत होता…
गॅसवरची भाजी हळुचंच खदखदत होती,
अन् म्हणत होती सूटका नाय हो तुझी..
महिलादिन ना आज….
अंगणातील कचरा ऊडून अस्तित्वाची,
जाणिव करून देत होता…
स्वच्छतेची लढाई तेथे माझा हात,
झाडुशी खेळत होता…
महिलादिन ना आज…
अग! चहा? आई डबा? या आर्त आरोळ्या,
माझ्या नसलेल्या स्व’वर घाला
घालीत होत्या अन् मन मात्र,
उंच आकाशात पंख पसरून
महीलादिनाच्या आनंदात ऊडत होतं…
महिलादिन ना आज…
दहा दहा ची बस तोल सांभाळत,
गाठायची होती अन् हसत आॅफिसात…
एंट्री मारयची होती.. जमलंच तर एक,
मिठी मैत्रिणीला द्यायची होती…
महिलादिन ना आज..,
नवर्याचं भांडण, सासूचा जाच अन् बाॅस ने
लावलेली माझी वाट या सार्यात,
महिलादिनाची दिलेली खोटीखोटी मुलाखत
सगळंच कस खास वाटत होतं…
महिलादिन ना आज …
संध्याकाळी ओसरलेला पुर सावरत,
पुन्हा घर गाठायचं होतं,
अन् किचनओट्यावरच्या पसाऱ्यातल्या,
भांड्यांशी दोन दोन हात करायचे होते….
महिलादिन ना आज …

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
Superwoman war kahi kavita post kara na. Hi women’s day chi kavita wachlyavar kashala stree cha janm asava ase vatayla laglte.