स्नायूंमध्ये बळकटी आणण्यासाठी हे घरगुती उपाय करा

स्नायूंमध्ये कमजोरी जाणवणे, ही एक सामान्य समस्या असली तरी, हेवी वर्क आउट केल्या नंतर सुद्धा स्नायूंमध्ये कमजोरी वाटणं किंवा दुखणं हे त्रास जाणवतात. पण थोड्या आरामानंतर बरं वाटायला लागतं. आणि दुखणं थांबतं.

पण जर नेहमीच स्नायू अशक्त झाल्याचं, दुखत असल्याचं जाणवत असेल तर या त्रासाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं ठरतं.

यामुळे हळूहळू शरीराच्या एखाद्या भागात जळजळ होणे, स्नायू दुखणे, स्नायू आखडणे, चक्कर आली नाही तरी अचानक पडणे असे त्रास सुद्धा होऊ शकतात.

अशा वेळी मात्र डॉक्टर कडे जाऊन तपासणी करून घेणं महत्त्वाचं. कारण समजून वेळेवर इलाज केला गेला तर पुढील त्रासापासून बचाव करता येतो.

हे डॉक्टरी इलाज करण्या बरोबरच आपण काही काळजी घेऊन, घरगुती इलाज म्हणजेच नैसर्गिक इलाज सुद्धा सुरू केलेच पाहिजे. ते काय याबद्दल बोलू आजच्या लेखात.

स्नायूंना बळकटी देण्यासाठी करता येण्यासारखे घरगुती उपाय

१) अंडी: अंडी खाल्ल्याने स्नायूंमध्ये आलेला अशक्तपणा आणि थकवा दूर व्हायला मदत होते.

अंडी खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळून चांगले पोषण होते. व्हिटॅमिन ‘ए’, व्हिटॅमिन ‘बी-२’, व्हिटॅमिन ‘डी’, फॉलिक ऍसिड, प्रोटीन, ९ उपयुक्त अमिनो ऍसिड, योग्य प्रकारचे फॅट्स हे सर्व घटक स्नायूंच्या पोषणा साठी गरजेचे असतात.

स्नायूंच्या बळकटीसाठी रोजच्या नाश्त्यामध्ये १ किंवा २ उकडलेले अंडे घेतले पाहिजेत.

२) चीज: चीज आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये असलेले Casein Protine पचनासाठी जड नसल्याने स्नायूंच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. चीज मुळे व्हिटॅमिन ‘बी-१२’ कॅल्शियम यासारखे उपयुक्त अन्न घटक शरीराला मिळतात.

कच्च्या हिरव्या भाज्यांचे सलाड करून त्यात, चीजचा उपयोग रोजच्या नाश्त्यात केला तर खाण्यात एक स्वादिष्ट आणि आरोग्यपूर्ण पर्याय सुद्धा समाविष्ट करता येतो.

३) आवळा: आवळ्यात असणारे कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ‘बी’, प्रोटीन स्नायूंच्या बळकटीसाठी उत्तम असतात.

आवळ्यात नैसर्गिकरित्त्याच असलेल्या ऍनाल्जेसिक गुणधर्मामुळे स्नायूंमधले दुखणे कमी व्हायला मदत होते.

स्नायूंमध्ये बळकटी येण्याबरोबरच आवळ्याच्या रसाने थकवा कमी होऊन तरतरी येते.

४) पाणी भरपूर पिणे: शरीरात पाण्याची कमतरता असली तरी सुद्धा स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवतो. भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने स्नायूंना बळकटी येते.

यासाठी रोज ८ ते १० ग्लास पाणी नेहमी प्यावे. त्याच बरोबर पाण्याचे भरपूर प्रमाण असलेली फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात खावीत. यात काकडी, टरबूज यांचा समावेश होतो.

तुम्हाला किडनीचा त्रास असल्यास मात्र आधी याबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

५) तेलाची मसाज: नियमितपणे तेलाने मसाज केल्याने, रक्ताभिसरण सुरळीत व्हायला मदत होते. चांगल्या मसाज मुळे तेलातले पोषक तत्व त्वचेमध्ये खोलवर जिरून स्नायूंना बळकटी देते.

मसाज साठी निलगिरीचे, तिळाचे, बदामाचे, मोहोराचे तेल, किंवा नारळाचे तेल उत्तम.

या तेलाच्या मसाजने स्नायूंमधले दुखणे कमी होऊन स्नायूंना बळकटी मिळते.

६) स्नायूंच्या बळकटी साठी व्यायाम प्रकार: स्नायूंच्या बळकटीसाठी वेट लिफ्टिंग, resistance bands चा वापर करून केलेले वर्क आउट, गार्डनिंग करताना खोदणे, खुरपणे हे प्रकार सुद्धा स्नायूंच्या मजबुती साठी फायदेशीर ठरतात.

याशिवाय जीने चढणे, सायकलिंग, ट्रेकिंग, पुश अप्स, सीट ऍप्स, स्क्वाट्स या सारखे व्यायाम प्रकार नियमितपणे केल्याने स्नायूंना बळकटी मिळते.

स्नायूंच्या बळकटी साठी व्यायाम प्रकार

स्नायूंची कमजोरी कमी करण्यासाठी काही टिप्स:

१) व्यायाम सुरू करण्या आधी वॉर्म अप एक्सरसाईझ करणे सर्वात महत्त्वाचे. त्याचबरोबर सर्वात शेवटी स्ट्रेचिंग करणारे व्यायाम प्रकार करावेत.

२) शरीर आणि अशक्त स्नायूंना आराम देण्यासाठी रोज ७-८ तास झोप घेतली पाहिजे.

३) धूम्रपान, मद्यपान, तंबाखू, ड्रग्ज यांसारख्या आमली पदार्थांचे सेवन टाळावे.

४) कडक उन्हात जाणे टाळावे.

५) रोज कमीत कमी १५ ते २० मिनिटे पायी चालावे.

६) चेरी चा रस, अंडी, अंडी बदाम हे घटक नैसर्गिकरित्या स्नायूंना आराम देतात.

या काही गोष्टी ध्यानात ठेऊन आपल्या आहार-विहाराचे नियोजन केले तर बळकट स्नायू, सुदृढ शरीर आणि निरामय जीवन यावर तुमचा जन्मसिद्ध हक्क असेल हे लक्षात ठेवा.

लेख कसा वाटला ते कंमेंट्स मध्ये सांगा. तुमच्या आहार तज्ञाने किंवा जिम ट्रेनर, डॉक्टर यांनी याबाबतीत काही महत्त्वाचे सल्ले दिले असतील तर तेही सांगायला विसरु नका. आणि लेख आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. कारण, Sharing is caring…

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “स्नायूंमध्ये बळकटी आणण्यासाठी हे घरगुती उपाय करा”

  1. खूप छान माहिती मिळाली। उपयोगी माहिती मिळाली।

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय